मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

अनेक कंपन्या माझ्या client आहेत. सर्व राजकीय पक्ष, अनेक नेते ह्यांच्या जाहिराती मी लिहिल्या, शूट केल्या आणि dubbing केलं.

हे सर्व करताना काही खूप चांगले, अविस्मरणीय अनुभव आले. त्यातील एक अनुभव आहे श्री. अमिताभ बच्चन ह्यांच्यासोबताचा. श्री. बच्चन ह्यांच्या अनेक मराठी जाहिरातींचे संवाद मी लिहिले. एकदा आम्ही सकाळी ८ वाजता जुहूच्या BR Studio मध्ये पोहोचलो.
श्री.बच्चन ह्याची खासियत म्हणजे ते दिलेल्या वेळेवर बरोबर पोहोचतात. ठरल्यानुसार ते सकाळी ८ वाजता studio मध्ये आले. जाहिरातीची स्क्रिप्ट त्यांनी हातात धरली. हिंदी आणि मराठीची लिपी देवनागरी असल्यामुळे त्यांना स्क्रिप्ट वाचता येत होती. मग मी एक एक ओळ वाचत गेलो आणि त्यांनी माझ्या पाठोपाठ ती ओळ म्हणून दाखवली. बर्याच ओळी ते बरोबर म्हणत होते.
आमची rehearsal चालली होती. पण ते "च " चा उच्चार हिंदी "च " सारखा करत होते. मग मी मराठी च म्हणून दाखवत होतो आणि ते follow करत होते.
शेवटी अचानक थांबले आणि मला विचारलं , " लोणचं वाला च बोलना हैं क्या ?"
मी होकार दिला. मग आम्ही ती जाहिरात त्यांच्या अस्सल दमदार आवाजात रेकोर्ड केली.
त्यांना मराठीतील काही शब्द माहित आहेत. त्यापैकी एक आहे लोणचं !!

श्री. बच्चन ह्यांनी अनेक चढ-उतार पहिले. आजारपणे सोसली, पण आजही त्यांचा कामाचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. त्यांच्या आवाजाची जादू आजही टिकून आहे. आपलं काम अचूक बजावतात. जराही तडजोड न करता.

एकदा श्री. नाना पाटेकर, अभिनय देव आणि मी एक dubbing करत होतो. take झाल्यावर studio मध्ये गप्पा मारत होतो. तेव्हा श्री. अभिनय म्हणाले, " बाबा ( रमेश देव ) सध्या एक स्क्रिप्ट लिहित आहेत. ह्या वयातही त्यांना काम करत रहावसं वाटतं. "
त्यावर नाना म्हणाले, "देवाला मरण नसत रे !! "

मी dubbing करतो तेव्हा अनेक कलाकार येतात. मराठी असूनही मराठी वाचता येत नाही. फक्त बोलता येत. अश्यावेळी त्यांना समोर बसवून rehearsal करावी लागते. राणी मुखर्जी ह्यानाही मला मराठी शिकवावे लागले. अश्या स्तिथीत माधुरी दिक्षित शुध्द मराठी बोलतील काय असा मला प्रश्न पडला होतं. कारण त्या विदेशात, अमराठी लोकांमध्ये राहतात. हिंदी सिनेमांचे संवाद सहज वाचतात असं असल तरी त्या मराठी सफाईदारपणे वाचतात आणि शुध्द मराठी बोलतात.
एकदा मराठीसह त्यांना इतर भाषेत रेकॉर्डिंग करायचं होतं. आधी आपण मराठी करूया असं त्यांनी सांगितलं आणि लगेच रेकॉर्डिंग रूम मध्ये गेल्या. दिलेली स्क्रिप्ट मला वाचून दाखवली. कुठेही चूक नव्हती. एका take मध्ये आम्ही रेकॉर्डिंग संपवलं.

असाच आश्चर्याचा धक्का दिला विद्या बालन ह्यांनी.
" Nirenji ...show me the script "
असं त्यांनी म्हटल्यावर मी स्क्रिप्टची एक प्रत त्यांच्या हातात दिली आणि एक माझ्या हातात ठेवली.
rehersal करायला सुरुवात झाली आणि मी काही बोलायच्या आधीच त्यांनी भराभर मराठी संवाद वाचून दाखवले.
आणि म्हणाल्या, " मी मुंबईकर आहे ना..मराठी येत"
मग take ३० मिनिटात पूर्ण झाला.

सर्वात गमतीशीर अनुभव आला एका आमदाराच रेकॉर्डिंग करताना. लोकसभा निवडणुकीत मी एकावेळी तीन पक्षाच्या जाहिराती केल्याची ख्याती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर मला संपर्क केला. मी ती assignment स्वीकारली. कारण त्याचवेळी मी त्यांच्या पक्षाच्याही जाहिराती बनवत होतो. आमदार महाशयांच्या आवाजात dubbing करायचं ठरवलं. ते studio मध्ये आले सोबत दोन body guard घेवून. अंगावर भरपूर दागिने होते आणि dubbing रूम मध्ये body gaurd सोबत शिरले. शेवटी मी त्यांना सांगितलं body guard ने नुसता पाय हलवला तर माईक तोही आवाज पकडतो. तेव्हा त्यांना बाहेर बसवा. पण महाशय ऐकायला तयार होईना.
त्यांनी body guard ला सांगितलं, " आवाज करायचा नाही बर का. गुमान बसायचं!"
शेवटी ते body guard गुमान बसले आणि आमदार महाशयांनी भाषण सुरु केल. शेवटी त्यांना थांबवावं लागलं आणि सांगावा लागलं की स्क्रिप्ट तयार आहे. आपली फिल्म फक्त ६० सेकंदाची आहे. मी जी स्क्रिप्ट देतो तेवढीच वाचा. कसेबसे ते तयार झाले.
रेकॉर्डिंग सुरु झालं आणि मागे बसलेल्या body guard ने त्यांचा mobile वर फोटो काढला. त्याचं क्लिक आवाज mike ने पकडला . मला आणि sound engineer ला कळलं पण त्यांना कळलं नाही. आम्हालाही त्या नंतर शूट ला जायच होतं. म्हणून आम्ही ती फिल्म क्लिक सह तशीच release केली.
ते संवाद म्हणत आहेत आणि मधेच क्लिक आवाज येत आहे असं tv वर दिसत होत.
क्लिक आवाज जितक्या सहजपणे येतो तितक्या सहजपणे ते निवडूनही आले.

मी लहान मुले, तरुण female artist , वयस्कर character असेल तर वयस्कर dubbing artist सोबत काम करतो. प्रत्येकजण अत्यंत सफाईने काम करतात. लहान मुले तर पहिल्या take मध्ये perform करतात.

वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. माझा यश पाहण्यासाठी माझे गुरुसम अभय परांजपे हयात नाहीत.
-निरेन आपटे