Blog
Dhundur Month
Posted on January 16, 2018 at 11:30 PM |
धुंदूर मास
मराठी कॅलेंडर प्रमाणे संक्रांतीच्या साधारण एक महिना आधी ,सूर्य धनु राशीत प्रवेश करतो आणि संक्रांतीच्या वेळी तो मकर राशीत प्रवेश करतो .या दरम्यानच्या एक महिन्याच्या काळाला धनुर्मास म्हणजेच धुंदूर मास असे म्हटले जाते. कडकडून थंडी असल्याने आपलं शरीर उष्णता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ह्या मुळे खूप भूक लागते. सकाळी कडकडून भूक लागलेली असताना दुसरे तिसरे काही खाण्यापेक्षा पौष्टीकच आहार घ्यावा या हेतूने या महिन्यात सकाळी लवकर मुगाची गरम खिचडी ,त्यावर भरपूर तूप,वांग्याचे भरीत आणि भाकरी खाण्याची पद्धत आहे, जोडीला तिळगुळ तर असतोच! भरपूर भाज्या एकत्र कापून भोगी ची भाजी सुद्धा बनवायची पद्धत आहे.
Month of December and January are winter months in India. January month especially from Sankrant festival known as “dhundur” month. Due to dry and cold weather, our skin gets dry, and our body needs extra calories to keep warm. In this month, there is a tradition to eat a heavy brunch in the morning that includes Bharit, bhakri, khichadi and sweets made up of sesame seeds and a mixed vegetable called “Bhogi”. This indicates that our ancestors were very well informed on overall ecosystem and effects of various seasons on human body and came up with the solutions in the form of traditions!
Share pictures of your bhakri- bhrit dish.
Aarti
Posted on August 27, 2017 at 5:00 PM |
आरती !
Â
सध्या गणपती चे दिवस आहेत व रोज विविध आरत्या ऐकण्यास मिळतात ! इथे मांडावस वाटत की आरती या शब्दाचा अर्थ हा आर्त भावाने त्या ईश्वरास आळवणे असा आहे मग ती आरती एक म्हणा किंवा दोन पण आरती गाताना आर्त भाव हा हवाच ! पहा जरा आरतीतले शब्द ! सुखकर्ता , दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरी प्रेम कृपा जयाची ! काय सुंदर वर्णन आहे बघा ! तो गजानन सुखकर्ता असून दुःखांचे हरण करणारा आहे मग त्याच्या समोर विघ्नाची वार्ताही नुरवी म्हणजे उरणार नाही व तो प्रेम पुरवेल अर्थात प्रेमाने मातृत्व भावनेने तुम्हाला संकटातून सोडवून नेईल ! मग हे गाताना त्या ईश्वराला किती आर्ततेन शरण जायला हव बर !
शब्दही चुकीचे म्हणणार तुम्ही वर म्हणणार की तो दयाळू आहे त्याला समजत पण जरा विचार करा बर चुकीचे शब्द म्हणून आम्ही त्या मुळ रचनेतील मिळणारी स्पंदनेच हरवून टाकत नाही का ? जरा सलग स्पष्ट शुद्ध व शांततेने एकही शब्द मनाचा न घालता उदा. दर्शन मात्रे मनःकामना पुरती पण यात आणखी जोडले जाते ते स्मरणे मात्रे मान ! आता मान की मन ? बर मान हा अवयव आहे तर मन हे इंद्रिय आहे किती सहज चुकतो आपण ! मुळात जे मुळ रचनेतच नाही ते घालायच आणि वर तेही चुक म्हणायच !
समजा तुम्ही सत्यनारायण करता मग तो झाल्यावर केवळ गणपती व सत्यनारायण या दोनच आरत्या म्हणून समाधान होत नाही पाच , सात , अकरा आरत्या का म्हणाव्या लागतात ? गरजच नसते मुळात पण ती सवय लागली आहे आम्हाला ! बऱ्याच वेळा मी पहातो की यजमान देखील सर्व पुजा अगदी साग्रसंगीत करून दिली तरी केवळ आरत्या जास्त नाही घेतल्या म्हणून नाराज होतात व गुरूजींनी शाॅर्टकट मारला हा शिक्का मारून मोकळे होतात पण मुळ काय ते नक्की समजलेलच नसत त्यांना !
समजा शंकराची आरती म्हणतो आहोत तर यातील वर्णनानुरूप मुर्ती ती आरती गाताना डोळ्यासमोर उभी रहायला हवी खरे तर पण नाही होत तसे कारण आम्ही सुरूवातच चुकीची करतो ! लवथवती विक्राळा तर लवलवती विक्राळा म्हणतो , वाळा च्या जागी बाळा म्हणतो आता मस्तकी बाळा जरा कल्पना करा बर ! हसायला आल ना ! मग सांगा ती आरती म्हणता का तुम्ही ? नाही ती मस्करी होते कारण ज्याला काहीच येत नाही तो हेच अनुकरण करतो !
बऱ्याच जणांना मी इथे अश्या चुकीच्या आरत्यांच समर्थन करताना पाहील पण खरच सांगतो जरा विचार करा युद्धाच वर्णन सुरू आहे पण त्यात वीर सरच नाही म्हणजे वक्ताच ते वर्णन करूण रसात करतोय तर कस वाटेल ऐकायला ? किंवा आय अॅम अ डीस्को डान्सर हे गीत शास्त्रीय सुरात ऐकायला कस वाटेल ? हसायला येईल ना ? बस तेच आरत्यांचही असत ! तुम्ही आरती म्हणताय कडव सुरू असत निढळावरी कर$$$$$$$$$$€$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$ हा कर इतका वाढवलेला असतो की गाणाऱ्याचा आवाज चिरकतो अक्षरशः पण तो घामाघूम होऊन म्हणतच असतो ! आणखी एक भयानक उचेचर ऐकतोय मी गेली अकरा वर्ष तो म्हणजे शेवटी साधुसंत मनु वेधला माझा ! बाप रे ! सेवीती साधु संत आणि शेवटी साधु संत यात किती फरक आहे ! कसा तो बाप्पा समजाऊन घेईल बर ! जे संत महंत ( बाबांजींसारखे नाही हं ) त्या देवाला प्रिय होते व आहेत तेच शेवटी म्हटल्यावर त्यान नक्की काय समजावून घ्याव ही अपेक्षा करायची ?
देवीच्या आरतीतील गमतीदार कडव पहा जे गाताना स्त्री असेल तर पडले म्हणते व पुरूष असेल तर पडलो म्हणतात पण मुळ अर्थ कोणीच समजाऊन घेत नाहीत ! त्रिभूवनी पहाता तुज ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही , साही विवाद करीता पडले प्रवाही आता यात त्या देवीची स्तुती करताना कवि म्हणतो की संपूर्ण त्रिभूवनात तुझ्या समान कोणीही नाही व चारी श्रमले म्हणजे चारही वेद थकले व सहा शास्त्रेही थांबली पण तुझ स्वरूप कोणालाच उमगले नाही ! आता सांगा इथे कुठे स्त्रियांनी पडले व पुरूषांनी पडलो म्हणायचय ? पण नाही आम्ही तेच म्हणणार कारण तो समजाऊन घेईल अरे पण तो काय काय समजावून घेईल बर ? आणि का ? पेक्षा फक्त जी पुजा आहे ती व गणपतीची आरती म्हणा व तीही शुद्ध पहा कस बर वाटत ते !
Â
स्वलिखीत
वैभव निर्मला नारायण जोशी
९६०४२८२१३३
Find out the name of this plant?
Posted on July 21, 2017 at 12:20 AM |
This plant is in our front yard, very pretty with glossy six to eight leaves. This has become famous in my circle of friends to replace " mango leaves" to be used in cultural celebrations. Wheneve they perform a puja at their home, they ask for these leaves to replace mango leaves which are rare to find in USA.
माझ्या घराच्या अंगणातलं हे झाड माझ्या मित्र- मैत्रींनी मध्ये खुपच प्रसिद्ध झालं आहे ! ह्या झाडाची पानं अगदी आंब्याच्या पानांसारखी दिसतात, म्हणून मी स्वत: हि पूजेला वापरायला सुरुवात केली आणि आतातर आमचे गुरुजी सरळ आंब्याची पानं माझ्याकडून आणा असं सगळ्यांना सांगतात. आता अमेरिकेत आंब्याच झाड काही लोकं लावतात पण ते खूप मोठ होत नाही आणि त्याची पानं काढून पूजेला वापरता येयील इतकी सोय तर नसतेच. तर ओळख बघू हे झाड तुम्हाला माहित आहे कां?
खाली उत्तर लिहा : Write your answer below
Story Behind Satyanarayan puja -Prasad
Posted on May 2, 2017 at 9:05 PM |
सत्यनारायण पुजेच्या कथेतील प्रसादाचे रहस्य !
Â
सत्यनारायण कथेत प्रसादाचा त्याग केल्याने साधुवाणी व अंगध्वज राजा यांना शिक्षा झाली असा उल्लेख आहे ! यावर अनेकांचा आक्षेप आहे ! काही लोक म्हणतात की देव का शिक्षा करेल सारखी सारखी ? देवाला श्रद्धा महत्वाची ! बरोबर अगदी बरोबर तुमच म्हणण ! एक उदाहरण देतो यावर . एक वर्ग असतो त्यात सत्तर ऐंशी मुले असतात ! त्यात हुशार मुले अगदी कमी असतात आणि नंबर मिळवणारी मुले तर अगदीट कमी असतात ! ही मुल कधी मस्ती करत नाहीत ! बर यांना मार्कस ही नव्वद पंच्याणव टक्के असे असतात ! परंतु वर्गात सर अगदी थोडी जरी चूक झाली तरी या हुशार मुलाला ओरडतात व कौतूकही करत नाहीत ! अगदी उलट एखादा चाळीस टक्केच मिळवणारा विद्यार्थी असेल आणि त्याला एके चाळीस टक्के जरी पडले तरी शाबासकी देतात !
अगदी परमार्थातही हेच घडत असते ! याचे कारण सरांना हुशार मुलगा वाया जाऊ नये ही अपेक्षा असते व बाकी लोक त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात ! मग जर ज्याचे अनुकरण करतो तोच चुकला तर ? बाकीचेही चुकच वागणार ना ? तसेच इकडे देवाचे जे भक्त असतात त्यांनाही हाच नियं लागू होतो ! हल्ली साधु संत यांना चुकताना पाहील की राग येतो ना ? तसच असत हे ! मग जर ते सर त्या हुशार विद्यार्थ्याची हुशारी वाया जाऊ नये म्हणून त्याला शिक्षा करत असतील तर ते चूक असते का ? नाही ना ? तसेच साधूवाणी आणि तो अंगध्वज राजा हे समाजातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत जर तेच चुकत असतील तर समाज बिघडायला वेळ कितीसा लागेल हो !
अगदी म्हणूनच वेळोवेळी शासन दिले गेले देवा कडून ! जरा व्यवहारी विचार करू ! साधुवाणी व्यापारी आहे . तो नवस करतो की मी पुजा करेन ! बर नवस करतो पण वेळोवेळी चालढकल करतो ! मग मला सांगा ही चालढकल वृत्ती व्यापारासाठी किती चांगली आहे ? लोकांचा विश्वास बसू शकेल का ? म्हणजे तो साधुवाणी वचनापासून परावृत्त होऊ नये म्बणून देवाने शासन केले असे असेल तर काय चुकीचे आहे ? जरा विचार करा की तुम्हाला कोणी देण लागतोय आणि तो रोज उद्या ये परवा ये अस करतोय आणि उधारीही चुकवत नाहीये तुम्हाला राग येईल की तुम्ही त्याला चहा पाजून सांगाल की जाऊ दे बुडव तू माझे पैसे बुडव ! हे घे अजून घे ! कराल का असे ? मग कथेतून हीच शिकवण द्यायची आहे हे लक्षात का नाही येत ?
आता प्रसादाचा त्याग ! पुजा म्हणजे आपण एखाद्या कार्यासाठी घेतलेली मेहेनत समजू व प्रसाद म्हणजे त्याचे फळ समजू ! मग विचार करा की अगदी मेहेनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आणि तुम्ही प्रयत्नच टाकले तर तुमची नौका बुडेलच ना ? आणि जेव्हा मनातील आवाज म्हणजे आकाशवाणी ही ऐकून तुम्ही परत गेलात आणि उरलेले प्रयत्न नेटाने केले म्हणजे प्रसाद भक्षण केला तर तुमची नौका तुम्हाला परत मिळणारच ना ? कोण रोखेल हो तुमचे यश ? कोणीच नाही ! मग काय वाईट शिकवते ही कथा ?
बर आता यात पाहू की जातीवाद आहे का ? तर नाही तोही नाहीये ! ब्राह्मण , वाणी , राजा , मोळीविक्या , हे समाजाचे चारही घटक यात आहेत व या कथेचा संदेश एकच की जो मेहेनत करेल आणि मला दारीद्र्यातून मूक्तच व्हायचे असा संकल्प करेल त्याला कोणीही यश मिळण्यापासून रोखू शकत नाहीमग तो मोळीविक्या असो वा राजा ! बर यात संतती म्हणजे स्त्री संतती होते यातही भेदभाव नाही ! उलटपक्षी स्त्री संततीचे महत्व व लिलावतीने एकटीने पुजा केली म्हणजे स्त्रीयांचे अध्कार यावर नकळत भाष्य होऊन ते सिद्ध केल गेल आहे की एकटी स्त्रीही पुजनादी स्रव कृत्य करू शकते !
तेव्हा सज्जन मित्रांनो आणि भगिनींनो हा कथेचा गाभा समजून घ्या ! आणि हो प्रसादाचे साहीत्य पहा काय आहे , रवा , साखर , गाईचे तु व दुध , केळी ! या सर्वांचा बनलेला शिरा ! या पदार्थात वीर्य वाढवण्याची ताकत असते असे आयुर्वेद सांगतो ! म्हणजे संतती साठी नवस केला पण त्यामुळे सतत हे पौष्टीक पदार्थ पोटात गेले व वीर्यसाठून आणि स्त्रीचे गर्भाशयही बळकट होऊन गर्भधारणा झाली म्हणजे नवस पूर्ण झाला !
इतक कोणी समजावणार नाही हो ! पण वाईट वाटत नाव ढेवली जातात तेव्हा ! जरा विचार करा यावर आणि केवळ ब्राह्मण सांगतोय म्हणून नाही तर वरील प्रमाणे विचार करून मग पुजा करा ! बर आणखी एक सांगतो जाताजाता ! एकटा ब्राह्मण यावर पोट भरत नाही बर का ! पुजेचे सामान जेथून आणता त्यालाही हा पैसा जातो , फुले , फळे , किराणा दुकानदार या सर्वांना यातून एक वाटा जातो आणि या निमित्ताने तुम्ही चार लोक घरी बोलावता ज्याने स्नेहसंबध वृद्धींगत होतात ! आता पहा बर या नजरेने सत्यनारायण पुजनाकडे !
Â
स्वलिखीत
वैभव निर्मला नारायण जोशी
Bhulabai / Navratri
Posted on October 4, 2016 at 12:20 AM |
हरवलेली भुलाबाई
भुलाबाई लेकी आल्यात या की ...
एक लिम्बू झेलू बाई दोन लिम्बू झेलू
अरडी ग परडी ग परड़ी एवढे काय ग? दारी उभा कोण ग .?.... साती दरवाजे लावा ग बाई आणि झाबरं कुत्र सोडा ग बाई ..
काही आठवले? मी भुलाबाई आणि भूलोजी बद्दल बोलतेय. भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यन्त घरोघरी भुलाबाई आणि भूलोजीचा मुक्काम असायचा आणि त्यांच्या बरोबर असायचा हळकुंड बाळा . भुलाबाई आणि भूलोजी म्हणजेच शंकर आणि पार्वती असं म्हणतात आणि हळकुंड म्हणजेच गणपति. त्यांची स्थापना झाली की मग पुढे छान आरास मांडली जायची .गल्लित जवळ पास राहणाऱ्या समवयस्क मुली एकत्र जमायच्या मग भुलाबाईची गाणी म्हंटली जायची , त्यांना खाऊ दिला जायचा आणि मग दुसऱ्या घरी गाणी म्हणायला निघायच्या. सर्वांकडे गाणे गाऊन आणि खाऊ खाऊन झाल्यानंतर सगळ्या आपापल्या घरी जायच्या. भुलाबाई देखील माहेरी येतात असं म्हणतात आणि त्यावेळी माहेरी आलेल्या माहेरवाशिणी आपल्या मैत्रिणींना आपले सासर कसे आहे , सासरची मंडळी , त्यांचे स्वभाव ,तिथले वर्णन गाण्याच्या माध्यमाने सांगायच्या.
आज माझ्या लेकीसाठी (प्रचितीसाठी भुलाबाई इंदौरहून मागावल्या , मुंबईत भोंडल्याची प्रथा त्यामुळे भूलोजी भुलाबाईची मूर्ति मिळणे अशक्य ,मग माझी मैत्रीण सौ सोनाली बापट हिने इंदौरहून भुलाबाईआवर्जून पाठवल्या. लहानपण आठवले. आई-वडिलांच्या मागे लागून लाल-हिरव्या रंगाचे टिपर्यांचे जोड पटेलच्या दुकानावरून आणले जायचे. उंच कोनाड्यात आरास करायची. गणपती हा मोठा सण तरी मला आणि माझ्या मैत्रिणींना ओढ लागायची ती -बाप्पांच्या विसर्जनानंतर घरात येणाऱ्या गुलाबाईची. पुराणिक आजी, केसकर काका यांच्याकडून गुलाबाईची मूर्ति आणायची, आम्ही मूली भुलाबाईची गाणी म्हणायला जायचो खूप मजा यायची ( इंदौर कड़े भुलाबाई ला गुलाबाई आणि भूलोजी ला गुलोजी असेही म्हणतात गाणी झाली की मग लपवलेला खाऊ ओळखावा लागत असे ती ही एक वेगळीच मजा. आमचा साधारण 15/20 मुलींच्या ग्रुप असे,प्रत्येकाच्या घरी जाऊन भुलाबाईची गाणी म्हणायची ,गोडा आणि तिखट पदार्थांची रेलचेल असायची इतके खाल्यावर घरी जाऊन जेवण नाहीच. महिनाभर हीच मजा. माझी आई भारी हौशी... हौस म्हणून माझी आई पण या उत्साहात सहभागी व्हायची. शाळेतून येताना रोज वेगळा खाऊ आणायची .माझ्या बहिणीही असायच्या. टिपर्यांच्या तालावर भुलाबाईची गाणी म्हणायची आणि दोन दोन मुलींची जोड़ी असायची टिपऱ्या खेळायला. दोघी -दोघी मुली हळकुंड बाळासाठी तळहाताचा पाळणा करायच्या. सगळे गाणे गाऊन निज निज माझ्या बाळा असा पाळणा म्हणून शेवटी पुष्पांजली म्हणायच्या "पुष्पांजली तुला अर्पिते प्रेम गुलाबाई अज्ञानाते दूर करुनी सन्मती मज देई". कोजागिरी पौर्णिमेपर्यन्त खूप मजा असायची .7 च्या आत घरात असं म्हणणाऱ्या आया गुलाबाई खेळण्यासाठी मात्र नियम बाजूला ठेवायच्या. कुठलं गाणं म्हटलं आणि कोणता खाऊ मिळाला हे विचारताना आई स्वतःच तिच्या बालपणीच्या भावविश्वात हरवून जायची. भुलाबाईची
स्थापना करण्याचा संबंध एकत्र कुटुंब पद्धतीशी निगडीत असावा असं मी कुठे वाचले होते, तरुण्यात येणाऱ्या मुलींमध्ये सर्जनशक्ति वाढावी संसार नेमकं काय याचे वर्णन ,नाती गोती म्हणजे काय? वैवाहिक जीवनाची पूर्वकल्पनाच म्हणा न ! तसेच आपली व्यथा गाण्यात मांडून सासुरवासाच्या दुःखाला महिलांनी वाचा फोडावी . दुःख सुसह्य व्हावे म्हणून ही प्रथा सुरु झाली असावी असे वाचण्यात आले होते .
कारल्याचे वेल लाव ग सूने मग जा आपल्या माहेरा माहेरा...
करल्याचे वेल लावले हो सासुबाई अता तरी धाड़ा माहेरा माहेरा,असे अनेक गाण्यांवरून सासुरवाशिणीची होणारी घुसमट सर्वांना कळायची. यादव राया राणी रुसुन बैसली कैसी खरंतर हे यादव कालीन गाणी आहे या गाण्यातही रुसलेली सून तिला मनवायला नथ घेवून गेलेली सासू. सुनेचे हटून बसणे यात ही आगळी गम्मतच आहे भुलाबाईच्या रुपात ती आपल्याला कळते .विदर्भ मध्यप्रदेश मध्ये अजून ही काही घरांमध्ये हा सण हौसेने साजरा करतात. काही वर्षापूर्वी या उत्सवाची कथा एका लेखात वाचली होती .एकदा शंकर पार्वती सारीपाट खेळतात सारीपाटाच्या डावात पार्वती जिंकते आणि शंकर पार्वतीवर रुसुन निघुन जातात ,पर्वती मग भिल्लीणीचे रूप घेऊन त्यांचा शोध घेते . शंकर भिल्ल रूपात तिला भेटतात भिल्ल शब्दाचा अपभ्रंश झाला आणि भिल्लीणीची भुलाबाई आणि भिल्लाचे भूलोजी झाले. हळूहळू काळमानानुसार भुलाबाईच्या स्थापना करण्याची प्रथा लोप पावत आहे .मनोरंजनाचे विपुल साधने आणि करिअर करण्याच्या नादात भुलाबाईची ही सुन्दर प्रथा खंडित झालेली दिसते .तरी देखील काही परम्परा व् संस्कृतीचा वारसा जपणारे लोकं अजुन 5 किंवा 10 दिवस भुलाबाईचा उत्सव साजरा करतात . इंदौर ला काही ठिकाणी भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्धा अजुनही असते. असो बरेच वर्षानंतर मला देखील प्रचिती मुळे आपले बालपण जगायला मिळणार आहे. इतक्या वर्षांनी हरवलेली भुलाबाई मला पुन्हा सापडली आहे आणि आज हे वाचल्या नंतर सगळ्या मैत्रिणींना देखील लहानपण आठवेल असं माझं ठाम मत आहे.
सौ धनश्री संकेत देसाई
नेरुळ
Ganapati
Posted on September 13, 2016 at 12:20 AM |
गणपती - माझा आणि तुमचा
त्याच्या मूर्तीकडे कितीही वेळा पाहून किंवा एकटक न्याहाळून समाधान झालंय असं सहसा घडत नाही. डोळे भरून पाहतच बसावं असं ते लोभस रूप, दिव्यत्वाची साक्ष देणारे ते ओजस्वी डोळे, भान हरपून जाईल असे तेजोवलय, नीटनेटकी ठेवलेली वळणदार सोंड, क्षणार्धात तुमच्या संकटांना हमखास नाहीसं करण्याची हमी देणारं ते स्मित, उदंड आशीर्वादाची उधळण करणारा तो गुबगुबीत हात आणि लहान मुलासारखा मोदकासाठी पुढे केलेला नाजूक हात, लाललाल मखमली पितांबर आणि मऊशार गादी. एका दृष्टिक्षेपातच 'सुखकर्ता' या विशेषणाला शंभर टक्के न्याय देणारा आणि संकटसमयी देवाचं नाव घ्यायचं झालंच तर डोळ्यासमोर सर्वप्रथम येणारा 'दुःखहर्ता', चौसष्ठ कलांचा अधिपती म्हणजेच माझा आणि तुमचा गणपती. त्याच्या मूर्तीरुपी अस्तित्वाने भारलेलं आणि मंगलमय झालेलं वातावरण म्हणजे आपल्या घरातला गणेशोत्सव.
हा गणपती आपल्या मराठी लोकांच्या फारच जवळचा असल्यासारखं मला नेहेमी वाटतं. बघा न, बोलता येऊ लागल्यावर ज्या पध्दतीने लहान मुलाला 'गंपती' बोलायला शिकवल्यापासून ते मोठे झाल्यावरसुद्धा आपणही कधी याला अहो जाहो केल्याचं आठवत नाही. तुमच्याकडे गणपती आणला का रे पासून त्याला वेळेवर नैवेद्य दाखव वगैरे सर्व एकेरीत. माझ्या माहितीप्रमाणे भारतातील इतर भाषिक गणपतीला गणेशजी, गणेश महाराज, श्रीगणेश असे संबोधतात. आपणच जणू गणपती हा आपल्या रोजच्या बैठकीतला असल्यासारखे अरेतुरे करत असतो. गणपती कधी आहे रे? याचा अर्थ गणेशोत्सव कधी आहे, गणपतीला कपडे शिवायचेत - म्हणजे या सणानिमित्त आपल्याला कपडे घ्यायचेत, गणपतीला रंग लावायचाय - म्हणजे घरी रंगकाम करावयाचे आहे, गणपतीची साफसफाई चाललीये - म्हणजे घर धुवायला काढलंय, गणपतीचं बुकिंग केल का? म्हणजे गावाला जायची तिकिटं काढली का हे सर्व अर्थ मराठी घरात अध्याहृतच असतात. काही दिवसांपूर्वी माझ्या ऑफिस मधले कामगार एकत्र पणे समोर येऊन ' सर, गणपतीला सुट्टी पाहिजे' असे म्हणताच ' घेऊन दे कि त्याला सुट्टी, गणपतीचं तो, मी कोण अडवणार' असला फालतू विनोद मी केल्याचं मला आठवतंय.
हिंदुस्थानात एकही चित्रकार असा नसेल कि ज्याला गणपतीचे नेहेमीपेक्षा वेगळे रूप चितारायचा मोह झाला नसेल. रझा नावाच्या एक मुस्लिम चित्रकाराने आपली बोटे रंगात बुडवून तबल्याच्या तालावर काढलेल गणपतीचं चित्र माझ्या घरी आहे. अगणित रंगाची उधळण करत काढलेली चित्रे असोत व कुंचल्याच्या एक फटकाऱ्याने काढलेले चित्र असोत पाहताक्षणी प्रेमात पडावे असे त्याचे रूप त्या कागदावर नक्कीच उमटलेले असते. सध्या काही उत्साही कलाकार तुमच्या नावाच्या किंवा आडनावाच्या अक्षरांनी गणपतीचे चित्र काढतात. मान खूपच तिरकी करून आणि अक्षरं जुळवत तुम्हाला ती वाचावी लागतात. "पै" किंवा जोंधळेगावकर अशा आडनावांचा गणपती कसा बनेल हा विषय माझ्या कुतूहलाचा आहे.
सार्वजनिक गणपतीची वेशभूषा हा एक वेगळा विषय. या गणेशोत्सवानिमित्त कोणत्यातरी देवाच्या किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या रूपात गणपतीची मूर्ती बनवणारे आणि ती बनवून घेणारे भक्त पण अति उत्साहीच म्हणावेत. कृष्ण आणि रामाच्या रूपात ठीक आहे हो, पण साईबाबांच्या रूपात अंगावर त्यांच्यासारखे कपडे घातलेला, स्वामी समर्थांच्या रुपातला बसलेला गणपती किंवा अण्णा हजारे सारखा दिसणारा टोपी घातलेला गणपती असले भयानक प्रयत्न केल्याचे मी याचीडोळे पहिले आहे आहे. या वर्षी अजूनही 'पर्शा' च्या रुपातला सैराट गणपती दिसण्यात आला नाही हे माझ्यासारख्या भक्ताचे नशीबच म्हणावे. सार्वजनिक मंडळांसाठी घडवलेला शंकराच्या रुपातला रागीट गणपती तुम्ही फेसबुकवर पाहिलाय का ? नसेल तर शोधून पहा . दणकट असे आठ हात, प्रत्येक हातात एक धारदार शस्त्र घेतलेला , त्वेषात उभा राहिलेला असा काही भयानक आणि रागारागानं पाहणारा बनवलाय कि विचारता सोय नाही. शत्रूंच्या नायनाट करणारा वगैरे असला तरी इतक्या रौद्र रुपातला बाप्पा नाही पाहावत आम्हाला. नवसाला पावणारा सार्वजनिक गणपती हा तर एक मोठा विनोद आहे. खरंच नवसाला पावत असेल तर लालबागच्या परिसरात चाळीत राहणारा माणूस आज बंगल्यात दिसला असता आणि तो गणपतीपण विसर्जनाच्या त्रासातून वाचला असता...नवसाला पावतो तर कायमस्वरूपी देऊळच बांधा की. काहीही करून व्हीआयपी पास मिळवून अशा गणपतीचे दर्शन घायचे हे फ्याड वाढत चाललंय हल्ली ...जाऊदे , सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने याच्या वर अधिक न बोलणेच चांगले.
काही असो, गणपतीचा कोप होतो हे फारसे ऐकिवात नाही म्हणून किंवा गणपतीने मुबलक स्वातंत्र दिलय म्हणून त्याच्या रूपाचं काहीही करायचं हे मनाला पटत नाही. गणपती हा तोच आणि तस्साच असावा, लहानपणी गोष्टीत वाचलेला, शंकर पार्वतीने जन्माला घातलेला आणि आपल्या आजी आजोबानी आपल्या समोर मांडलेला, गुबगुबीत गादीवर लोड पाठीशी घेऊन मांडी ठोकून बसलेला, केविलवाणा चेहेरा करून मागणीची भली मोठी यादी मनात घेऊन नमस्कार करणाऱ्या भक्ताकडे पण मोहकपणे हसणारा, म्हटलं तर निरागस बाळासारखा आणि म्हटलं तर घरातल्या ज्येष्ठ पुरुषासारखा.
गणपतीच्या चरणी लीन होत, त्याच्या भक्तीत तल्लीन होत, त्याच्या रूपात एकरूप होत, त्याच्या ठायी असलेला एकतरी गुण आपल्याला स्पर्शून जावा आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याचे सार्थक व्हावे या पेक्षा दुसरं काय मागू याच्याकडे ?
समीर गुप्ते
samhere#sameergupte.blogspot.in#ganpati#mazaanitumcha#ganpatibappamorya#funwriting#enjoyreading#sameer6949@gmail.com
Warkari Parampara / About Pandharpur Pilgrimage
Posted on June 30, 2016 at 12:10 AM |
खालील माहिती श्री प्रशांत वोर्लीकार मुंबई ह्यांनी पाठविली आहे :
वारीची परंपरा ही श्री माऊलीच्याही पूर्वीपासून चालत
आलेली आहे. श्री माऊलींचे पणजोबा श्री त्र्यंबकपंत कुलकर्णी
हेसुद्धा आपेगाव ते पंढरपूर वारी करत. श्री माऊली, श्री
नामदेवमहाराज, श्री सांवतामाळी, श्री चोखोबा, श्री
तुकाराम महाराज आदी सर्व संतांची मांदियाळी त्यांच्या
काळात पंढरीच्या पांडुरंगाची वारी करीत असे. किंबहुना,
ज्या भागवत-धर्माची मुहूर्तमेढ श्री संतांनी रोवली त्याचा
विस्तार करण्यासाठी त्यांचे एकत्र भेटण्याचे ठिकाण व समय
म्हणजे पंढरीची आषाढ शुद्ध एकादशीची वारी असेच म्हणावे
लागेल.
आजच्या पालखी सोहळ्याची परंपरा ही जगद्गुरु संत तुकाराम
महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव तपोनिधी श्री नारायण
महाराज देहुकर यांनी इ.स. १६८५ साली म्हणजेच जगद्गुरु संत
तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनानंतर (इ.स. १६४९) ३६
वर्षांनी सुरू केली. तुकोबारायांच्या पादुका श्री देहू
क्षेत्रावरून पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीत येऊन श्री
माऊलींच्या पादुकांसमवेत पंढरीस घेऊन जाण्याची परंपरा
अशी सुरू झाली. तपोनिधी श्री नारायण महाराज देहुकर
यांनीच वारी सोहळ्यात आणि संप्रदायात ‘ज्ञानोबा-
तुकाराम’ या भजनाची प्रथा सुरू केली. हा ऐश्वर्यपूर्ण पालखी
सोहळा इ.स. १६८५ पासून इ.स. १८३० पर्यंत एकत्रितपणे सुरू
राहिला. त्यानंतर पुढे देहुकर मोरे यांच्या सांगण्यावरून थोर
भगवद्भक्त व पूर्वाश्रमीचे श्रीमंत शिंदे सरकार यांचे पदरी
सरदार असणारे; परंतु नंतर विरक्त होऊन आळंदीस वास्तव्यास
असणारे श्रीगुरु हैबतबाबा यांनी इ.स. १८३१ पासून श्री
माऊलींच्या पादुकांची स्वतंत्र आषाढ वारी सुरू केली. आज
जो पालखी सोहळा आपणास दिसतो त्याचे हे विशेष स्वरूप
श्रीगुरु हैबतबाबा यांनीच सिद्ध केले.
सातारा जिल्ह्यातील आरफळ हे श्रीगुरु हैबतबाबांचे मूळ गाव.
पुढे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या दरबारात श्रीगुरु
हैबतबाबांनी सरदार म्हणून मोठा लौकिक प्राप्त केला.
त्यानंतर, मूळ गावाची भेट घडावी या हेतूने लवाजमा व संपत्ती
बरोबर घेऊन श्रीगुरु हैबतबाबा गावी यायला निघाले. मात्र
सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये भिल्लांनी त्यांची सर्व
संपत्ती हरण करून त्यांना व त्यांच्या बरोबरच्या लोकांना
गुहेमध्ये कोंडून घातले. श्री ज्ञानोबारायांचे निस्सीम भक्त
असणार्या श्रीगुरु हैबतबाबांनी अहोरात्र चिंतन आणि
हरिपाठाचा घोष सुरू केला. योगायोगाने एकविसाव्या
दिवशी भिल्ल नायकाची पत्नी प्रसृत होऊन तिला मुलगा
झाला. त्या आनंदाप्रीत्यर्थ भिल्ल नायकाने गुहेवरील शिळा
दूर केली तेव्हा श्रीगुरु हैबतबाबा व अन्य लोक
अन्नपाण्याअभावी निश्चेष्ट पडल्याचे त्याला दिसले. त्या
अवस्थेतही श्रीगुरु हैबतबाबांच्या मुखातून हरिपाठाचे अभंग
उमटत होते. हे पाहून त्या भिल्ल नायकाने श्रीगुरु हैबतबाबांची
पूर्ण शुश्रुषा करून त्यांची संपत्तीसह सन्मानाने मुक्तता केली.
श्री ज्ञानोबारायांच्या कृपाप्रसादानेच आपला जणू
पुनर्जन्म झाला या भावनेने श्रीगुरु हैबतबाबा आरफळला न
जाता थेट आळंदीस आले व अखेरपर्यंत ते श्री माऊलींच्या सेवेत
मग्न राहिले. रात्रभर श्री माऊलींच्या समाधीसमोर उभे राहून
भजन करण्याचा परिपाठ श्रीगुरु हैबतबाबांनी अखंड जपला.
पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून श्रीगुरु हैबतबाबा
यांनी श्रीमंत शिंदे सरकार यांचे दरबारी सरदार असलेले श्रीमंत
अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे, हत्ती, तंबू वगैरे
लवाजमा, नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका आदी सरंजाम घेतला.
त्यातील हत्ती वगळता बाकीचा सारा सरंजाम आजतागायत
चालू आहे. श्रीगुरु हैबतबाबा यांचा मूळ पिंड सरदार
घराण्याचा असल्याने, त्यांनी वारी सुरू करताना संपूर्ण
सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखे शिस्तबद्ध स्वरूप दिले.
त्यांना सहकार्य श्री. वासकर, श्री. सुभानजी शेडगे,
खंडोजीबाबा वाडीकर, आजरेकर प्रभृतींचे होते. म्हणून आजही
या सर्व दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत. आजही वारी
सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम, भजनाची पद्धत
इतर प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत श्रीगुरु हैबतबाबा यांनी
इ.स. १८३१ पासून ज्या प्रकारे सुरू केली तशीच पाळली जाते.
पुढे, १८५२ साली पंच समितीची स्थापना झाली.
राम कृष्ण हरी
Ambarnath Shiv temple
Posted on March 7, 2016 at 10:05 AM |
This Informarion is sent by Mr. Prashant Worlikar Mumbai:
अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर
मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबरनाथच्या पुरातन शिवमंदिरात श्रावण महिन्यांत भक्तांची मोठी गर्दी होते. अंबरनाथ हे नाव बहुतेक अमरनाथ म्हणजेच शिवशंकर यावरुन पडले असावे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबरनाथच्या पुरातन शिवमंदिरात श्रावण महिन्यांत भक्तांची मोठी गर्दी होते. राज्यातील विविध भागांतून या ठिकाणी असलेल्या स्वयंभू शिव लिंगाचे दर्शन घेण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी श्रावणात भक्तांची रिघ लागलेली होती. अशीच गर्दी श्रावणातील प्रत्येक सोमवारीही होत असल्याचे भाविकांनी सांगितले. शिवमंदिराचा इतिहास हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी उगम पावणा-या ‘वालधुनी’ नदीने उल्हासनगर व अंबरनाथ शहरांना विभागले आह़े याच नदीच्या तीरावर इसवीसन पूर्व शके ९८२ च्या दरम्यान शीलाहार राजा चित्तराजा यांनी हे शिवमंदिर बांधल़े या मंदिराची पुनर्बाधणी चित्तराजाचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्वाणीने शके १०६० मध्ये केली़ हे शिवमिंदर हेमांडपंथी पद्धतीने बांधलेले असून कोकण प्रांतात आढळणा-या काळ्या दगडांत ते कोरण्यात आले आह़े या मंदिराच्या बाह्य व आंतरभागांवर देवादिकांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर आकर्षक वाटत़े या शिवमंदिरातील गाभा-यांत स्वयंभू शिवलिंग आह़े या गाभा-यांत जाण्यासाठी २० पाय-या खाली उतरावे लागत़े या शिवलिंगाला ‘अंबरेश्वर’ म्हणूनही ओळखले जात़े याच मंदिराच्या नावावरून शहराला अंबरनाथ हे नाव पडले आह़े या मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरत़े महाशिवरात्रीच्या काळात दर्शनासाठी भल्या मोठय़ा रांगा लागतात़ ठाणे, रायगड, पुणे भागातून लाखो भाविक स्वयंभू शिवपिंडीच्या दर्शनासाठी गर्दी करतात़ ही जत्रा तीन दिवस चालत़े अख्यायिका पांडवांनी एक मोठा दगड कोरून एका रात्रीत हे मंदिर बांधले असल्याची अख्यायिका आहे. या मंदिर परिसरातील एका गुंफेतून मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर पांडव या ठिकाणाहून निघून गेले.
हे मंदिर सर्वांत जुनं व ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखल जात. अंबरनाथचे शिवमंदीर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदीर जे अत्यंत कलात्मक आहे. शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर". शिल्प शास्त्रप्रमाणो अंबरनाथचे शिवमंदिर हे सप्तांग भूमीज पध्दतीत मोडते. या मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. एकावर एक असे सात भूमी(शिल्प रांगा रचण्यात आले होते. मात्र कालांतराने गाभा:यावरील शिखर नष्ट झाल्यामुळे तीनच भूमी (शिल्प रांगा शिल्लक आहेत. नष्ट झालेल्या भूमीचे अवशेष मंदिराच्या परिसरात सापडतात. या मंदिराचा गाभारा 13 -13 फूट चौरस आहे. या मंदिराच्या बाहेरील शिल्पांवर देवतांचे शिल्प कोरण्यात आले आहे. या मंदिरावर गरुडासन विष्णू, त्रिपुरावध मुर्ती, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची शोडशवर्षीय (सोळा वर्षाची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, लिंडोद्मव मुर्ती, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, मरकडेय कथेची मुर्ती, गणोश नृत्य मुर्ती, नृसिंह अवताराची मुर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे. मात्र त्यातील अनेक मुर्ती आज भग्ण अवस्थेत आहेत. काहींची झीज झाली आहेत. त्यांची देखरेख करण्याची गरज आहे. त्यांची योग्य निगा पुरातत्व खात्याने केल्यास हे मंदिर भावी पिडीसाठीही अभ्यासाचा विषय ठरेल. या मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून त्याशिवाय आणखीन दोन प्रवेशद्वारेआहेत.
प्रमुख प्रवेशद्वाराशी असलेली नंदीची पाषाणमूर्ती प्रथमत: आपलं लक्ष वेधून घेते. या मंदिराचे सर्व शिल्पकाम जसे आखीव-रेखीव आहे तसेच ते उभारताना भूमितीसह वास्तुशास्त्राचा निश्चितच विचार केल्याचे जागोजागी जाणवते. हेमाडपंताच्या काळाआधीपासून जी ‘भूपिज’ शैलीची मंदिर उभारली गेली या शैलीतील हे पहिले मंदिर म्हणून गणले जाते. मंदिरातील गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून तिथपर्यंत जाण्यासाठी आठ फुटी खोलीच्या दगडी पायऱ्यांवरून जावे लागते. लोखंडी कठडा घालून त्याचे आगमन-निर्गमनासाठी दोन भाग करण्यात आले आहेत. येथील प्राचीन शिवलिंग काळ्या पाषाणाचे आहे. या गाभाऱ्याच्या चौफेर भिंती भक्कम असून त्याची उंची २१ मीटर आहे. गाभारा आणि मंदिराला जोडणारे जे दालन आहे. त्यातून आपण मंडपाकडे येतो याला दक्षिण पश्चिमोत्तर अशी तीन मजबूत प्रवेशद्वारे आहेत. मंडपावरील चार खांबावरील शिल्प-नक्षीकाम खूपच आकर्षक आहे, तर मंडपावरचे छतावरील नक्षीकाम देखणे आहे. लोनाड मंदिरातील छताप्रमाणेच अनेक वर्तुळांची गुंफण करून अप्रतिम शिल्पकलेतून सौंदर्य वाढवले आहे. मूळच्या सुमारे १८ खांबांच्या भव्य मंडपात प्रवेश केल्यावर सध्या त्यातील चारच खांब स्पष्टपणे दिसताहेत. उर्वरित खांबाचे अस्तित्व फारसे जाणवत नाही.
वेरूळच्या विश्वविख्यात शिल्पाकृतीप्रमाणे जराही जागा न सोडता प्रत्येक खांब नक्षीकामांनी सुशोभित करून मंदिराचे सौंदर्य खुलवण्यात येथील अज्ञात कलाकार यशस्वी झालेत. सभामंडपाचे छत आणि कळसाचा भाग यामधील भाग पोकळ आहे. हा सभामंडप आणि गाभाऱ्याची बाह्य बाजू अनेक कोनांनी सुशोभित करताना भूमितीशास्त्राचा उपयोग केल्याचे जाणवते. त्यामुळेच मंदिरात दिवसभरात छाया -प्रकाशाचा खेळ अनुभवता येतो. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अनेक देव-देवतांच्या शिल्पांचे दर्शन घडते. हजारो वर्षांची नैसर्गिक स्थित्यंतरे आणि मानवनिर्मित प्रदूषणांनी यातील काही शिल्पांचे अस्पष्ट दर्शन घडते. या शिवमंदिराला अनेक हत्तींच्या कोरीव कामाची पाश्र्वभूमी आहे. जणू काही अनेक हत्तींच्या पाठीवरच या मंदिराचा डोलारा आहे. मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपणासह बाह्य़ांगावरील अनोखी शिल्पाकृती आपलं लक्ष वेधून घेतात. यात उजव्या सोंडेची गणेशमूर्ती, त्रिशूलधारी शिवमूर्ती, लक्ष्मीमाता यांचे दर्शन घडते. विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या कलाकृतीतून शिल्पकारांना मानवी जीवनाला आवश्यक असा संदेश द्यायचा आहे, असाच जणू त्यापाठीमागे गर्भित अर्थ आहे. हळेबीड-बेलूरची आठवण व्हावी असे एक महादेवाचं मंदिर इथे आहे. मंदिराचे प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आढळते. रॉयल एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ. स. १०६० चा शिलालेख छापला आहे. मंदिराच्या प्रवेशदारापाशी दोन नंदी आहेत. एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चारच खांब आता दिसतात ज्यावर सुरेख नक्षीकाम दिसते. बाकीचे खांब मात्र भिंतीत बुजले आहेत.
मंडपाचे छत व कळस यामझे पोकळी आहे.कोनात जोडून असलेल्या गाभाऱ्यामुळे ऊनसावल्यांचा वेधक दृष्य पहायला मिळते. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगाला चारी बाजूला विविध शिल्पे आहेत. त्यात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शिवपार्वती विवाह, हंसारुढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, नृत्यांचे आविष्कार, शृगांरिक कामशिल्पे आढळतात. काळाच्या ओघात त्यात बरीच पडझड झालेली आहे. मंदिराच्या उत्तरद्वारानजीक एक छोटेखानी कक्ष आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. हे बांधकाम मूळच्या मंदिरानंतरचे असावे. मंदिरासहीत साऱ्या परिसराचे दगडी बांधकाम असल्याने स्वच्छतेसह वातावरणात गारवाही आहे. गाभाऱ्यातील अभिषेकजल प्रथम कुंडात आणि नंतर ओढय़ात सोडण्याची व्यवस्था या मंदिर बांधकामात आहे. शिवाच्या जीवनाशी निगडीत असे ठळक प्रसंग या मंदिरातील कोरीव कामातून दिसतात. त्यात उत्पत्ती, स्थिती, आणि लय या शिवाच्या तीनही भावांचे दर्शन घडविणारी त्रिमूर्ती आहे. तर एका शिल्पात शिवपार्वती विवाह सोहळ्याचे दर्शनही घडते. याशिवाय आरसाधारी तरुण स्त्री, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, महिशासूर मर्दिनी, गणपती यांच्या मूर्ती शिल्पकाराने रेखीवपणे निर्माण केल्या आहेत. या साऱ्या मूर्तीतून त्यांच्या सहजपणामुळे त्या सजीव वाटतात. आणि या मूर्तीशी संबंधित त्या काळची वस्त्र, आभूषणे आणि वेशभूषेचीही कल्पना येते. मंदिराच्या बाहेरील बाजूवर आपल्या दृष्टीक्षेपात येईल अशी एक पट्टी कोरलेली आहे. त्या लहानशा जागेतून अनेक शृंगारिक शिल्पाकृती आपल्या नजरेत भरतात. सभामंडपातील कोरलेले खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय. सभामंडपाच्या मध्यभागावरील झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमट, त्यावरचे नक्षीकाम फारच सुरेख आहे. गाभारा दिवसाउजेडी पाहिला तर आतील भागात योगी शिव कोरलेला दिसतो. सभामंडपापासून दहाबारा पाय-या उतरल्यावर गाभारा दिसतो. त्यात एक स्वयंभू काळया पाषाणाचे शिवलिंग व दुसरे घडीव गारगोटीचे शिवलिंग आहे.
आंबा, चिंच यांची दाट राई इथे एकेकाळी असावी असं वाटतं. वढवाण नदीच्या ऐन काठावर हे मंदिर सहज लक्षात येत नसलं तरी प्रेक्षणीय नक्कीच आहे. अंबरनाथचे हे प्रख्यात शिवमंदिर या प्रदेशावर शिलाहारांची राजसत्ता होती. त्याकाळी बांधले गेले. आपल्या प्रदीर्घ राजसत्ताकाळात त्यांनी आपल्या प्रदेशात १२ अप्रतिम कलाकृतीची शिवमंदिरं बांधली. त्यातील हे अंबरनाथचे एकमेव शिवमंदिर आजही आपलं असित्व टिकवून आहे. येथील असामान्य कलाकृतीच्या पाषाणमूर्तीतून त्यांचे भावप्रकट करताना त्यातून तत्त्वज्ञान-संदेश देण्याची किमया वाखाणण्यासारखी आहे. या शिल्पातून मानवी जीवनाला पूरक असा जो संदेश दिला आहे. त्यातून भारतभूमीचे तत्त्वज्ञान आणि संस्कृती सांगण्याचाच जणू प्रयत्न आहे.. कोणतीही लिखित भाषा तथा शब्दाविना हे मंदिरशिल्प खूप काही सांगून जाते. अंबरनाथच्या या प्राचिन शिवमंदिराचा समावेश युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत झाला आहे. हे मंदिर पूर्ण दगडानी कोरलेलं असून, मंदिराची जमिन ही वाघाच्या कातडीपासून कोरलेलं आहे. अंबरनाथ हा तालुका शिवमंदिरामुळे प्रसिध्द झाला आहे.
Shri Ganesh--Beautiful Facts
Posted on December 18, 2015 at 9:00 AM |
This information is shared by Mrs. Radhika Tambe
||जय जय गणराज समर्थ||
गणेश हा शिवपुत्र आहे असे समजण्या बरोबरच लोक असेही समजतात कि त्याला प्रथम पूज्यत्वाचा मान अथवा वर शंकराने दिला आहे पण असे समजणे अधः पात आहे. शिव पुराणा मधेच लिहिले आहे कि शिव आणी पार्वती यांच्या विवाहामध्ये आदिपूजन श्री गणेशाचेच झाले होते जो आदिदेव आहे परमदेव आहे. शिव पार्वतीने तपः श्चर्या करून आदिदेव गणेशाकडून वर मिळवला कि त्याने त्यांच्याकडे पुत्र रूपाने येउन त्यांना त्याचे लालन पालन करण्याचे सौभाग्य प्राप्त करून द्यावे व आदिदेव गणेशानी त्यांचे मागणे मान्य करून त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या इथे अवतार धारण केला भगवान विष्णू सुर्य शिव शक्ती ब्रह्मा हे देव पण श्री गणेशाचेच ध्यान करतात आराधना करतात . खुद्द भगवान शंकर म्हणतात "गणेश देव देवेश ब्रह्म महेश मादरात । ध्यायामी सर्व भावज्ञ कुलदेव सनातनम ।" अर्थात भगवान गणेशच सर्वांचे कुलदेव आहेत तेच सनातन आहेत परमदेव आहेत आदिदेव आहेत. गणेश प्रभू हेच पूर्ण ओंकार स्वरूप आहेत. हेच गणेश प्रभू पंच देवांचे पिता आहेत हेच गणेश प्रभू पंच देवांना सत्ता आणि सामर्थ्य देणारे वरद मूर्ती आहेत. हे जे पूर्णब्रह्म गणेश प्रभू आहेत त्यांचे हे खरे स्वरूप जाणून सगळ्यांनी त्यांची विधीयुक्तं शास्त्रोक्त भक्ती केली पाहिजे अश्यानेच लोकांना परम मोक्ष जो कि स्वानंद लोक गणेश लोक आहे त्याची प्राप्ती होईल एकदा स्वानंद लोक मिळाला कि पृथ्वी वर परत कधीही यावे लागत नाही
गणेश गीते मधे श्री गणेश वरेण्य राजाला सांगत आहेत –
ब्रह्माविष्णुमहेंद्रार्द्योल्ल्कोंप्राप्यपुनःपतेत|
योमामुपैत्त्यसंदिग्धंपतनंतस्यनक्वचित्||
गणेशगीता अद्द्याय ६ श्लोक १९ गणेश पुराण
श्री गणेश, गणेश गीतेमध्ये सांगत आहेत -
ब्रह्मयाच्या ब्रह्म्लोकाला विष्णूच्या विष्णुलोकाला महेशाच्या शिवलोकाला सूर्याच्या सुर्यलोकाला किंवा शक्तीच्या शक्तीलोकाला जो जीव जातो त्याला तिथून अनेक वर्षांनी का होईना कोटी वर्षांनी का होईना परत पृथ्वीवर यावेच लागते परंतु जे कोणी श्री गणेशाची शास्त्रोक्त उपासना करतात त्यांना श्री गणेशाचा स्वानंद लोक प्राप्त होतो तिथून त्या जीवाला परत कधीही पृथ्वीवर यावे लागत नाही
गणेश भक्तांनी या खालील गोष्टी जर्रूर लक्षात ठेवाव्यात.=
१ गणेशाचे नाव घेताना स्वतःच्या कपाळाला शेंदूर जरूर लावावा कारण त्याचे नाव घेताना जर भक्ताच्या कपाळाला शेंदूर नसेल तर त्याला खूप राग येतो ते घेतलेले नाव त्याला मान्य होत नाही स्वतःला लावायची शेंदुराची डबी वेगळी ठेवावी आणि गणपतीला लावायची शेंदुराची डबी वेगळी ठेवावी
२ गणेशाला प्रिय आणि प्रसन्न करणारया गोष्टी –
दुर्वापत्र शमीपत्र लाल फुल पांढरा मंदार रक्त चंदन
3) गणेशाला अप्रिय निषिद्ध वस्तु - तुळस हींना अत्तर पांढर चंदन फूल
या गोष्टी गणेशाला कधीहि वाहू नयेत. गणपतीच्या मूर्तीला तुळशीचा कधिहि स्पर्श होऊ देवू नये त्याला तुळस निषिद्ध आहे अप्रिय आहे
4) गणेशाला नैवैद्य दाखविताना नैवैद्याच्या ताटावर दोन दुर्वा ठेऊन मगच त्याला नैवैद्य दाखवावा गणपतीच्या नेवैद्याच्या ताटावर कधीही तुळस ठेवू नये फक्त दुर्वाच ठेवाव्यात
5) त्याचे पुजेचे सामान वेगळे असावे त्याचे सामान दुसरया कोणालाही वापरू नये तो जेष्ठराज आहे श्रेष्ठ आहे
6) त्याचे निर्माल्य वाहत्या शुद्ध पाण्यात प्रवाहित करावे. त्याच्या निर्माल्याला पाय कधीही लागू देवू नये त्याने खूप मोठा दोष लागतो गणेश पुराणामध्ये त्याबाबत कथा आहे
7) घरात गणपतीची प्राण प्रतिष्ठा केलेली मूर्ती असेल तर तिला रोज कमीत कमी दोन दुर्वा तरी जरूर वाहाव्यात आणि शेदूर लावावा. दुर्वावाचून गणपतीची मूर्ती कधीही घरात ठेवू नये गणेशाला रोज रक्त्तचन्दन उगाळून लावावे पांढरे चंदन कधीही लावू नये रक्त्तचन्दन वेगळ्या सहाणेवर उगाळावे ते उगाळायची सहाण त्याच्यासाठीच वापरावी.
डॉ. श्रीमती राधिका श्रीकृष्ण तांबे,
गाणपत्त्य,
Scientific Relevance
Posted on October 6, 2015 at 10:25 AM |
22 Reasons To Believe ancient Bharat Is Based On Science
वृक्ष / Tree
People are advised to worship Neem and Banyan tree in the morning. Inhaling the air near these trees, is good for health.
योग / Yoga
If you are trying to look ways for stress management, there can’t be anything other than Hindu Yoga aasan Pranayama (inhaling and exhaling air slowly using one of the nostrils).
प्रतिष्ठान / Temple
Hindu temples are built scientifically. The place where an idol is placed in the temple is called ‘Moolasthanam’. This ‘Moolasthanam’ is where earth’s magnetic waves are found to be maximum, thus benefitting the worshipper.
तुलसी / Basil
Every Hindu household has a Tulsi plant. Tulsi or Basil leaves when consumed, keeps our immune system strong to help prevent the H1N1 disease.
मन्त्र / Mantra
The rhythm of Vedic mantras, an ancient Hindu practice, when pronounced and heard are believed to cure so many disorders of the body like blood pressure.
तिलक / Tilak
Hindus keep the holy ash in their forehead after taking a bath, this removes excess water from your head.
कुंकुम / Kumkum
Women keep kumkum bindi on their forehead that protects from being hypnotised.
हस्त ग्रास / Eating with hand
Eating with hands might be looked down upon in the west but it connects the body, mind and soul, when it comes to food.
पत्तल / Leaf Plate
Hindu customs requires one to eat on a leaf plate. This is the most eco-friendly way as it does not require any chemical soap to clean it and it can be discarded without harming the environment.banana; palash leaves
कर्णछेदन / Ear Piercing
Piercing of baby’s ears is actually part of acupuncture treatment. The point where the ear is pierced helps in curing Asthma.
हल्दी / Turmeric
Sprinkling turmeric mixed water around the house before prayers and after. Its known that turmeric has antioxidant, antibacterial and anti-inflammatory qualities.
गोबर / Cow Dung
The old practice of pasting cow dung on walls and outside their house prevents various diseases/viruses as this cow dung is anti-biotic and rich in minerals.
गोमूत्र / Cow unrine
Hindus consider drinking cow urine to cure various illnesses. Apparently, it does balance bile, mucous and airs and a remover of heart diseases and effect of poison.
शिक्षा / Punishment
The age-old punishment of doing sit-ups while holding the ears actually makes the mind sharper and is helpful for those with Autism, Asperger’s Syndrome, learning difficulties and behavioural problems.
दिया / Lamp
Lighting ‘diyas’ or oil or ghee lamps in temples and house fills the surroundings with positivity and recharges your senses.
जनेऊ / Thread
Janeu, or the string on a Brahmin’s body, is also a part of Acupressure ‘Janeu' and keeps the wearer safe from several diseases.
तोरण / Toran
Decorating the main door with ‘Toran’- a string of mangoes leaves;neem leaves;ashoka leaves actually purifies the atmosphere.
चरणस्पर्श / To touch feet
Touching your elder’s feet keeps your backbone in good shape.
चिताग्नि / Cremation
Cremation or burning the dead, is one of the cleanest form of disposing off the dead body.
ॐ / Om
Chanting the mantra ‘Om’ leads to significant reduction in heart rate which leads to a deep form of relaxation with increased alertness.
हनुमान चालीसा / Hanuman Chalisa
Hanuman Chalisa, according to NASA, has the exact calculation of the distance between Sun and the Earth.
शंख / Shell
The ‘Shankh Dhwani’ creates the sound waves by which many harmful germs, insects are destroyed. The mosquito breeding is also affected by Shankh blowing and decreases the spread of malaria.
must share it.. Very meaning full
This information is shared by our reader Shri Prashant Worlkar Mumbai