मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

Blog

view:  full / summary

Story of Shravan Fridays in Marathi

Posted on August 22, 2015 at 12:05 AM


This artcile/ story is shared by Ms. Sadhana Bendrey  Los Angeles

शुक्रवारची कहाणी...

जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. जिवती पूजनाचे हे व्रत श्रावण महिन्यात दर शुक्रवारी करतात. जिवती या व्रताची देवता आहे . ही लहान मुलांचे रक्षण करणारी आहे.

पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात. हल्लीच्या काळात छापील चित्रांचीही पूजा केली जाते.घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवतीमातेने त्यांचे रक्षण करावे अशी तिला मनोभावे प्रार्थना करायची अशी प्रथा आहे.

श्रावणी शुक्रवार व जिवती पुजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे.श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सवाष्णींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो.श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संतती रक्षणार्थ मानली जाते.

जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार येईल त्या दिवशी देव्हा-याच्या भिंतीवर लावावा. श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा करावी.फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला २१ मण्यांचा कापसाचा चौसर तिला घालावा. गंध, हळदि-कुंकू, अक्षता लावाव्यात. जिवतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दुध्-साखरेचा व चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. स्वयंपाक वरण्-भात्-तूप, लिंबू, भाजी, पुरण, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, वाटली डाळ, आमटी असा करावा.ह्या दिवशी मुलांना वाण म्हणून "आरत्या" देतात त्या कराव्या.(आरत्या- कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकेरीत तळलेया पु-या.)देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा.सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी.जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षीणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी.

जिवतीची पुजा करून तिला दिवा उतरावा.तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना पण दिवा उतरावा. .कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाण्याचे व आरत्याचे वाण द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, व दिर्घायुश्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी.परगावी जर मुलं असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्या सारखे होईल.

पुर्वी श्रावण महिन्यात दररोज त्या दिवशीच्या वाराची कहाणी वाचली जात असे. काही लोक अजूनही वाचत असतील. त्या वाराच्या दैवताची आराधना केल्यामुळे तो (किंवा ती प्रसन्न झाला (किंवा झाली. त्यांची कृपा कोणा भक्तावर झाल्यामुळे त्याला कशाची प्राप्ती झाली याची सुरस गोष्ट त्या कहाणी मध्ये असते.

शुक्रवाराची जिवतीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. “ अग अग सुईणी, मला नाळवारीसुद्धां एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन.” सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली.

गांवांत एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हां ही सुईण तिच्या घरीं गेली, तिला सांगूं लागली कीं, “बाई बाई, तूं गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखूं लागेल तेव्हां मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन.”

तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली, “बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरांत एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचींच दिसताहेत. तेव्हां आपल्या घरापासून तों तिथपर्यंत कोणास कांही कळणार नाहीं असं एक गुप्त भुयार तयार करावं.

आपल्यास कांहीं दिवस गेल्याची अफवा उठवावी. “मी तुम्हांस नाळवारीचा मुलगा आणून देईन.” असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला, तिने जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरितां त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखूं लागलं. सुईणीला बोलावणं आलं त्याबरोबर “तुम्ही पुढं व्हा, मी येतें,” म्हणून तिने सांगितलं. ती धांवत धांवत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग कर म्हणून सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरीं आली. “बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहींस, नाहीं बांधलेस तर भय वाटेल.” असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला.

सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला, आणि तिच्यापुढें ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगूं लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्यें दुःखी झालीं. सुईण निघून राजवाड्यांत गेली.

राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊं लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणामासीं दर शुक्रवारीं जिवतीची पूजा करावी, आणि नमस्कार करून म्हणावं कीं, ‘जय जिवती आई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो.” असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमीं वागूं लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशीं बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशीं ही न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हां याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्रीं तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्रीं तिच्या घरीं आला. दारांत गाय-वासरूं बांधली होतीं. चालतां चालतां राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला. वांसराला वाचा फुटली. तें आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला?” तेव्हां ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाहीं, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हें ऐकून राजा मागं परतला आणि घरीं येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली.

काशीस जाऊं लागला. जातां जातां एका ब्राह्मणाच्या इथें उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होतीं. पण तीं पांचवी-सहावीच्या दिवशीं जात असत. राजा आला त्या दिवशीं चमत्कार झाला. पांचवीचा दिवस होता. राजा दारांत निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणूं लागली, ‘ कोण ग मेलं वाटेंत पसरलं आहे ?” जिवती उत्तर करते, “ अग अग, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी कांहीं त्याला ओलांडूं देणार नाहीं.” मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होती. त्यांनीं हा संवाद ऐकला.

इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनीं निघून गेल्या. उजाडाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळें आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा.” अशी विनंती केली राजानं ती मान्य केली. त्याही रात्रीं याचप्रमाणं प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला.

इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशींत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळीं ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरीं जा. सार्‍या गांवांतल्या बायका पुरुषांस जेवायला बोलाव. म्हणजे याचें कारण समजेल.”

त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली.तो घरीं आला. त्या दिवशी शुक्रवार होता. त्याने गांवांत ताकीद दिली. “घरीं कोणीं चूल पेटवूं नये. सगळ्यांनीं जेवायला यावं,” ब्राह्मणीला मोठं संकट पडलं तिने राजाला निरोप धाडला. “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन.” राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं तें काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहींत. कारल्याच्या मांडवांखालून गेलीं नाहीं. दर वेळेस “जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असॊ,” असं म्हणे.

पुढं पानं वाढलीं. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढूं लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडांत उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. कांहीं केल्या उठेना. तेव्हां त्याची आई गेली. त्याची समजूत काढू लागली. तो म्हणाला, “असं होण्याचं कारण काय?” तिनं सांगितलं कीं, “ ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई.” असं सांगून सर्व हकीकत सांगितली.

नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धां आपण राज्य करूं लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

श्री जिवतीची आरती..

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनंति

तव चरणी ॥ धृ. ॥

श्रावण येतांची आणूं प्रतिमा ।

गृहांत स्थापूनी करुं पूजना ।

आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।

अक्षता घेऊनी कहाणी सांगू या ॥ १ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनंती

तव चरणी ॥ धृ. ॥

पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।

सुवासिनींना भोजन देऊ ।

चणे हळदिकुंकू दूधही देऊं ।

जमुनी आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनंति

तव चरणी ॥ धृ. ॥

सटवीची बाधा होई बाळांना ।

सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना ।

यासाठी तुजला करिती प्रार्थना ।

पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनंति

तव चरणी ॥ धृ. ॥

तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।

वंशाचा वेल वाढूं दे ।

सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।

मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनंति

तव चरणी ॥ धृ. ॥

(P.Pradhan)

Ramaraksha Shlok

Posted on August 5, 2015 at 11:25 PM


This information is shared by Mr. Shrikant Bhandkamkar 

रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना....

रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।

रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।

या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथम रामं(द्वितीया, रामेण(तृतीया, रामाय(चतुर्थी, रामान्नास्ति=रामात् (पंचमीरामस्य(षष्ठी, रामे(सप्तमी,भो राम(संबोधन.

ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले होत नाही.

: रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच!!!

एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्हीसांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?

रामनामकवच:

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥८॥

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥

असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे!! थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती मनीट पहा....

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।

न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥

म्हणजे, पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे (राक्षस रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत!!

आता, थोडं थांबा....'छद्मचारिणः' हा शब्द पुन्हा वाचा. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना 'pseudopodium' हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबासारखे जीव हे pseudopodium म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात!! थोडक्यात; इथे 'राक्षस' हे अलिफ-लैला सारखे शिंगं वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत.

आजवर वैद्यकीय उपचार करत असताना; अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला मी पाहिला-अनुभवला आहे. यामागील कारण शोधता-शोधता ही गोष्ट हाती लागली. आजच्या मुहूर्तावरच ती लिहावीशी वाटली ही त्या रामचंद्राचीच कृपा. आपलेही असे काही अनुभव असतील तर जरूर सांगा.

जय श्रीराम!!

Namasmaran and its Benefit

Posted on June 16, 2015 at 9:15 AM

नामस्मरण व त्याचे फायदे : श्री प्रशांत वोर्लीकर ह्यांनी पाठवली आहे 

संपुर्ण विश्व स्पंदनशील आहे, विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे, मनुष्य हा सुध्दा स्पंदनाचा समूह आहे. पूर्व जन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुध्द आहेत तर ब-याच अंशी अशुध्द आहेत, तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल,

तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन कृषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे.

या गोष्टींनी आपली स्पंदने शुध्द होत असतात, आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते. श्रीगुरु भक्ताची अशुध्द स्पंदने

(पाप व दु:खे खेचून घेत असतात म्हणून श्रीगुरुंच्या सहवासाची आस घरावी.

नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोष

हरण करुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड- जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.

एकाच नामस्मरणाची शेकडो -हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. तसेच सदगुरुंची भक्ती करणारा सदगुरु रुप होतो.

नामस्मरणाचे फायदे -

एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन:पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय !

शिवाचा नामजप -

‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. या वेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.

श्रीरामाचा नामजप -

‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करतांना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा ‘जय राम’ व त्यानंतरचा ‘जय जय’ मधील दुसरा ‘जय’ हे शब्द म्हणतांना त्यांवर जोर न देता ते हळुवारपणे उच्चारावेत व त्या वेळी ‘श्रीरामा, मी तुला पूर्णत: शरण आलो आहे’, असा भाव ठेवावा.

मारुतीचा नामजप -

' हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट ' हा नामजप हनुमंता साठी करावा. लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुति. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.

गणपतीचा नामजप -

‘ॐ गं गणपतये नम: ।’ (श्री गणेशाय नम ] हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नम:’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपण म्हणावा. या वेळी आपण श्रीगणेशाला साष्टग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.

दत्ताचा नामजप -

‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपातील ‘गुरुदेव’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि ‘गुरुदेव’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून ‘दत्त’ हा शब्द म्हणावा.

श्रीकृष्णाचा नामजप -

‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामजपातील ‘नमो’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. ‘भगवते’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर ‘वासुदेवाय’ हा शब्द म्हणावा.

नामस्मरणाचे फायदे -

१ एकाग्रता वाढते

२ चित्तशुद्ध होते

३ वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते

४ दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही.

५ मन कायम आनंदी राहते.

६ सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात

Mantra Pushpanjali

Posted on June 12, 2015 at 2:20 PM

मंत्रपुष्पांजली : ही माहिती श्री प्रशांत वोर्लीकर ह्यांनी पाठविली आहे 

मंत्रपुष्पांजली कुबेरला उद्देशून आहे. महाराष्ट्रात जास्त प्रचलित असलेली, आरति नंतर मंत्रपुष्पांजली ची प्रथा जाणीवपूर्वक आणली असावी. ही प्रथा कुणी, कशा साठी कधी सुरु केली हे प्रश्न अनुत्तरीच राहिले असले तरी, सर्वांसाठी सुशासित राज्याची प्रार्थना या मंत्रपुष्पांजलीतून व्यक्त होते. आपण मंत्र पुष्पांजली ची मूळ ऋचा आणि तिचा शब्दार्थ पहाण्याचा प्रयत्न करु..

मूळ ऋचा :-

यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्| ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देव

(ऋग्वेद मंडल १.ऋचा१६४

ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे| स मे कामान्काम कामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु| कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम (तैत्तरीय आरण्यक अनुवाक ३१मंत्र ६ ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्य माधिपत्यमयं समंत पर्यायी | स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात ्पृथिव्यै समुद्रपर्यता या एकराळिति| (ऐतरेय ब्राह्मण पंचिका कांड ११ तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो

मरुत्तस्यावसन्गृहे| आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा:

सभासद इति|

(ऐतरेय ब्राह्मण पंचिका ८ कांड २९

 मंत्रपुष्पांजली शब्दार्थ :-

देवांनी यज्ञाद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले यज्ञ व तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधि होते जिथे पूर्वी देवता निवास करीत असत (स्वर्ग ते स्थान, महानता, (गौरव यज्ञ करुन साधकांनी प्राप्त करुन घेतले.आम्हाला सर्व काही अनुकूल (प्रसह्य घडवून आणणा-या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आमचा नमस्कार असो. तो कामेश्वर कुबेर माझ्या सर्व कामना पूर्ण करो. आमचे राज्य सर्वार्थाने कल्याणकारी असावे.आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे.

येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्ति,लोभ रहित असावे.अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधि सत्ता असावी. आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यत सुरक्षित असावे.समुद्रापर्यत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यत म्हणजे परार्धवर्ष पर्यत सुरक्षित राहो.याकारणास्तव अशा राजाच्या आणि राज्या च्या किर्तीस्तवना साठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिता चा पुत्र, मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुत गणांनी परिवेष्टीत केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.

Scientific meaning of Gaytri Mantra

Posted on June 10, 2015 at 12:05 AM

Scientific meaning of Gaytri Mantra-- Shared by : Usha Malkernekar 

Gayatri mantra has been bestowed the greatest importance in Vedic dharma.This mantra has also been termed as Savitri and Ved-Mata, the mother of the Vedas.

"Om-bhur bhuvah swah

Tat savitur varenyam

Bhargo devasya dheemahi;

Dhiyo yo nah prachodayat. "

The literal meaning of the mantra: O God! You are Omnipresent, Omnipotent and Almighty. You are all Light. You are all Knowledge and Bliss. You are Destroyer of fear, You are Creator of this Universe, You are the Greatest of all. We bow and meditate upon Your light. You guide our intellect in the right direction. The mantra, however, has a great scientific importance too, which somehow got lost in the literary tradition. The modern astrophysics and astronomy tell us that our Galaxy called Milky Way or Akash-Ganga contains approximately 100,000 million of stars. Each star is like our sun having its own planet system. We know that the moon moves round the earth and the earth moves round the sun along with the moon. All planets round the sun. Each of the above bodies revolves round at its own axis as well. Our sun along with its family takes one round of the galactic center in 22.5 crore years. All galaxies including ours are moving away at a terrific velocity of 20,000 mile s per second.

And now the alternative scientific meaning of the mantra step by step:

(A) OM BHUR BHUVAH SWAH:

Bhur the earth, bhuvah the planets (solar family), swah the Galaxy. We observe that when an ordinary fan with a speed of 900 RPM (rotations Per minute) moves, it makes noise. Then, one can imagine, what great noise would be created when the galaxies move with a speed of 20,000 miles per second. This is what this portion of the mantra explains that the sound produced due to the fast-moving earth, planets and galaxies is Om. The sound was heard during meditation by Rishi Vishvamitra, who mentioned it to other colleagues. All of them, then unanimously decided to call this sound Om the name of God, because this sound is available in all the three periods of time, hence it is set (permanent). Therefore, it was the first ever revolutionary idea to identify formless God with a specific title (form) called upadhi. Until that time, everybody recognized God as formless and nobody was prepared to accept this new idea. In the Gita also, it is said, "Omiti ekaksharam brahma", meaning that the name of the Supreme is Om, which contains only one syllable (8/12). This sound Om heard during samadhi was called by all the seers nada-brahma a very great noise), but not a noise that is normally heard beyond a specific amplitude and limits of decibels suited to human hearing. Hence the rishis called this sound Udgith musical sound of the above, i.e., heaven. They also noticed that the infinite mass of galaxies moving with a velocity of 20,000 miles/second was generating a kinetic energy = 1/2 MV2 and this was balancing the total energy consumption of the cosmos. Hence they named it Pranavah, which means the body (vapu) or store house of energy (prana).

B. TAT SAVITUR VARENYAM:

Tat that (God), savitur the sun (star), varenyam worthy of bowing or respect. Once the form of a person along with the name is known to us, we may locate the specific person.Hence the two titles (upadhi) provide the solid ground to identify the formless God, Vishvamitra suggested. He told us that we could know (realize) the unknowable formless God through the known factors, viz., sound Om and light of suns (stars). A mathematician can solve an equation x2+y2=4; if x=2; then y can be known and so on. An engineer can measure the width of a river even by standing at the riverbank just by drawing a triangle. So was the scientific method suggested by Vishvamitra in the mantra in the next portion as under:-

C) BHARGO DEVASYA DHEEMAHI:

Bhargo the light, devasya of the deity, dheemahi we should meditate. The rishi instructs us to meditate upon the available form (light of suns) to discover the formless Creator (God). Also he wants us to do japa of the word Om (this is understood in the Mantra). This is how the sage wants us to proceed, but there is a great problem to realize it, as the human mind is so shaky and restless that without the grace of the Supreme (Brahma) it cannot be controlled. Hence Vishvamitra suggests the way to pray Him as under:

D) DHIYO YO NAH PRACHODAYAT:

Dhiyo (intellect), yo (who), nah (we all), prachodayat (guide to right Direction). O God! Deploy our intellect on the right path. Full scientific interpretation of the Mantra: The earth (bhur), the planets (bhuvah), and the galaxies (swah) are moving at a very great velocity, the sound produced is Om, (the name of formless God.) That God (tat), who manifests Himself in the form of light of suns (savitur) is worthy of bowing/respect (varenyam). We all, therefore, should meditate (dheemahi) upon the light (bhargo) of that deity (devasya) and also do chanting of Om. May He (yo) guide in right direction (prachodayat) our(nah) intellect dhiyo. So we notice that the important points hinted in the mantra are:

The total kinetic energy generated by the movement of galaxies acts as an umbrella and balances the total energy consumption of the cosmos. Hence it was named as the Pranavah (body of energy). This is equal to 1/2 mv2 (Mass of galaxies x velocity2). 2)


14 Kinds of Knowledge and 64 kinds of Arts

Posted on May 27, 2015 at 10:25 PM

चौदा विद्या आणि चौसष्ठ कला By: Ashutosh Bapat

१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.

चौदा विद्या

चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा

वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद

सहा वेदांगे

१. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.

२. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.

३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.

४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.

५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.

६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.

१. न्याय,

२. मीमांसा,

3. पुराणे

4. धर्मशास्त्र.

चौसष्ट कला

१. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे.

२. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.

३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.

४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.

५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.

६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.

७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.

८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.

९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.

१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.

११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.

१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.

१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.

१४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.

१५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.

१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.

१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.

१८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.

१९. प्रहेलिका - कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.

२०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.

२१. काव्यसमस्यापूर्ती - अर्धे काव्य पूर्ण करणे.

२२. भाषाज्ञान - देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.

२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.

२४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.

२५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.

२६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.

२७. यंत्रमातृका - विविध यंत्रांची निर्मिती करणे.

२८. अत्तर विकल्प - फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.

२९. संपाठय़ - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.

३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.

३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.

३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.

३३. मणिभूमिका - भूमीवर मण्यांची रचना करणे.

३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे.

३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.

३६. माल्यग्रथन - वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.

३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.

३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.

३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.

४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.

४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कवित्व करणे.

४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.

४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.

४४. नृत्यज्ञान - नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.

४५. गीतज्ञान - गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.

४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.

४७. केशमार्जन कौशल्य - मस्तकाला तेलाने मालीश करणे.

४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मर्दन करणे.

४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.

५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.

५१. उदकघात - जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.

५२. उदकवाद्य - जलतरंग वाजविणे.

५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे.

५४. चित्रकला - नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.

५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे.

५६. नाटय़अख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.

५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.

५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे.

५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.

६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीव काम करणे.

६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे.

६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे.

६३. म्लेंछीतकला विकल्प - परकीय भाषा ठाऊक असणे.

६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.

Thorle Bajirao Peshwe

Posted on April 29, 2015 at 12:00 AM


२८ एप्रिल - थोरले बाजीराव पेशवे ह्यांची पुण्यतिथी ! (१७४०)

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०, हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या.

बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.

चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनार्यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२ रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले.


थोरल्या बाजीरावांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन !

Picture source: By Amit20081980 (Own work) [CC BY-SA 3.0 (http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0)], via Wikimedia Commons

Akshaya Tritiya-Marathi

Posted on April 20, 2015 at 11:55 PM

This information is shared by Mr. Prashant Worlikar

अक्षयत्रितीया : - आकीदी .... ....युगादी.....

 

एक संकलन ……..

 

· अक्षय = अमर , क्षय न होणारा . त्रितीया = चंद्रमासाचा तिसरा दिवस.

 

· त्रेता युगाचा प्रथम दिवस . ( त्रेता युगाची सुरूवात ) .

 

· परशुरामाचा जन्मदिवस (परशुराम चिरंजीव )

 

· पांडवांना वनात असतांना श्री कृष्णांनी सूर्य थाळी दिली...अक्षय पात्र.

 

· श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंती वरून महाभारत लिहीण्यास प्रारंभ. केला.

 

· भगीरथाच्या अथक प्रयत्ना नंतर गंगावतरण. स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली.

 

· श्री बसवेश्वर जयंती .

 

· श्री आध्य शंकराचार्य जयंती.

 

· श्री नरनारायण आवतार.

 

· श्री हायग्रीव आवतार.

 

· या दिवसा पासुन श्री बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.

 

· याच दिवशी श्री सुदामा श्रीकृष्णांना भेटावयास गेले, आशी आख्याईका सांगतात की श्री लक्ष्मीदेवीने त्यांच्यावर ( सुदाम्या वर ) कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही. पण श्री लक्ष्मीदेवीच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाध्य पूजा केली व कुंकू लवण्याचे निमित्त करून जुनी भाग्यरेषा पुसून नविन भाग्यरेषा कढली त्यामुळे मग श्री लक्ष्मीदेवीने सुदाम्याला भरभरून आशिर्वादित केले व त्याचे दारिद्र्य कायमचेच नष्ट केलफ़ तो हाच दिवस. या कर्म प्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्यच बदलले याचे हे एकमेव उदाहरण आहे असे म्हणतात.

 

· म्हणुन हा दिवस श्री लक्ष्मीदेवीला कायमचे घरी आणन्याचा माणतात व श्री लक्षिमीदेवीची पूजा करून पूरणावरणाचा नैवैध्य दाखवितात.

 

· दान धर्म करण्याचा दिवस. ( कारण दिल्याने श्री लक्ष्मीतत्व वाढते ) .

 

· पुण्य गोळा करण्याचा दिवस.

 

· भूतकाळ विसरण्याचा दिवस.

 

· सर्वांना क्षमा करण्याचा दिवस.


 

· वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस.


A pencil scketch by Vasant Shinde on Akshay Trutiya


 

सर्वांना अक्षय त्रितीयेसाठी हर्दिक शूभेच्छा !!! ....... शूभं भवतू .......


अक्षय त्रीतीया च्या दिवशी काय काय करावे ? 

This information is Shared by Swapnil Jadhav

 

अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे

* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.

* सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.

* ब्राह्मण भोजन घालावे.

* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.

* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.

* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.

शास्त्रांमध्ये अक्षय तृतीया

* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.

* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.

* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.

* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.

* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.

अक्षय तृतीयेचे माहात्म्य

* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.

* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.

* शुभ कार्ये या दिवशी होतात.

* श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी;) होते.


 

 

Padar ---- Stole

Posted on April 15, 2015 at 11:10 AM

This article is shared by: Sucheta Kuchekar-Saravanan

"पदर‘!

काय जादुई शब्द आहे हो मराठीतला! काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द. पण, केवढं विश्‍व सामावलेलं आहे त्यात! किती अर्थ, किती महत्त्व... काय आहे हा पदर? साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर-दीड मीटर लांबीचा भाग. तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण, आणखीही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा!

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल, ते सांगताच येत नाही. सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. लहान मूल आणि आईचा पदर, हे अजब नातं आहे. मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन "अमृत‘ प्राशन करण्याचा हक्क बजावतं. जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा पदरच पुढं करते. मूल अजून मोठं झालं, शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चालताना आईच्या पदराचाच आधार लागतो. एवढंच काय, जेवण झाल्यावर हात धुतला, की टॉवेलऐवजी आईचा पदरच शोधतं आणि आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. मुलानं पदराला नाक जरी पुसलं, तरी ती रागावत नाही त्याला... बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो. "छोटा भाई‘मधलं ते गाणं आठवतं का तुम्हाला? "मॉं मुझे अपनी आँचल में छुपा ले, गले से लगा ले, के और मेरा कोई नहीं!‘ भारतातल्या प्रत्येक प्रांतातल्या पदर घेण्याच्या पद्धती निराळ्या. कुठं डोक्‍यावरून पदर घेतात, कुठं डोक्‍यावरून घेऊन चेहराही झाकला जातो, काही ठिकाणी दोन्ही खांद्यांवरून, तर कोकणी स्त्रिया चक्क कमरेला गुंडाळतात. महाराष्ट्रात तो डाव्या खांद्यावरून मागे सोडला जातो; तर गुजरात, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो! काही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात, तर काही जणी आपला लटका, राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात!

ओटी भरायची ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं वाण लुटायचं ते पदर लावूनच. बाहेर जाताना उन्हाची दाहकता थांबवण्यासाठी पदरच डोक्‍यावर ओढला जातो, तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब मिळते! काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच गाठ बांधली जाते अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची गाठ ही नवरीच्या पदरालाच (नवरदेवाच्या उपरण्यासोबत] बांधली जाते.

"पदर‘ हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना? मुलगी वयात आली, की तिला "पदर आला‘ असं म्हटलं जातं. देवापुढं मागणं मागताना हाच पदर पसरला जातो. नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते, पण कामाचा धबडगा दिसला, की पदर खोचून कामाला लागते. देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या चुका "पदरात घे.‘ मुलगी मोठी झाली, की आई तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन्‌ काय म्हणते - अगं, चालताना तू पडलीस तरी चालेल. पण, "पदर‘ पडू देऊ नकोस! अशी आपली संस्कृती. या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत. "पदर सुटला‘ म्हटले, की फजिती झाली; कुणी पदर ओढला म्हटलं, की छेड काढली. कित्येक कवींनी, लेखकांनी याचा उपयोग केला आहे, अगदी अभंगापासून लावणीपर्यंत!

"पदरावरती जरतारीचा गोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात. असा हा किमयागार पदर काही वेळेस घातही करू शकतो बbरं का! लोंबकळणारा लांब पदर गाडीच्या चाकात अडकून पाडू शकतो... स्टोव्ह, गॅसपाशी पेटून जिवाशी खेळूही शकतो. तेव्हा मैत्रिणींनो, जरा जपून, पदर सावरा...

Sandhi -- Opportunity

Posted on April 15, 2015 at 11:05 AM


This aricle is shared by : Sahebrao Wayal

प्रेरणा स्पर्धा परिक्षेसाठी (mission ias publication) या पुस्तकातील ही गोष्ट

एक तरुण शेतकऱ्याच्या मुलीशी लग्न

करू इच्छितो.

ती मुलगी आसपासच्या सर्व

प्रदेशांतील मुलींपेक्षा अतिशय सुंदर

असते.

लग्नाची मागणी घालण्यासाठी तो

शेतकऱ्याच्या घरी पोहोचतो.

शेतकरी त्याला नीट निरखून

पाहतो आणि लग्नाची अट सांगतो-

‘बेटा त्या मैदानात जाऊन उभा राहा, मी येथून

एकामागून

एक

तीन बैल सोडेन

त्यापैकी कोणत्याही एका

बैलाची शेपटी पकडण्यात

तू यशस्वी राहिलास तर

मी माझ्या मुलीचा तुझ्याशी

विवाह

करेन.’

तो तरुण मैदानात जाऊन

उभा राहिला आणि बैलाची प्रतीक्षा करू

लागला.

काही वेळाने गेटचा दरवाजा उघडण्यात

येऊन त्यातून एक तगडा मस्तवाल

बैल उड्या मारत बाहेर पडला.

यावेळी तरुण

विचार करतो की, या मस्तवाल

बैलाला पकडण्याऐवजी पुढील

बैलाला पकडणे योग्य राहील. त्यामुळे

तो एका कोपऱ्यात जाऊन लपून बसला.

पहिला बैल असाच निघून गेला.

नंतर पुन्हा एकदा गेटच्या दरवाजातून

एक महाकाय, रागीट बैल बाहेर येताना तरुणाने

पाहिला.

मात्र त्या तरुणाने आतापर्यंत जीवनात

असला बैल कधीच पाहिलेला नसतो.

तो बैल नाकपुड्या फुगवत

रागात त्या तरुणाकडे पाहत होता व

त्याच्या तोंडातून लाळदेखील टपकत होती.

तरुण कमालीचा घाबरून जातो व विचार करतो

की, या रागीट

बैलाला पकडण्याऐवजी पुढचा बैल

कसाही आला तरी त्याला

कुठल्याही परिस्थितीत पकडायचे. त्यामुळे

तो पुन्हा एकदा लपून बसतो.

तिसरा बैल सोडण्यासाठी दरवाजा उघडला तोच

तरुणाच्या

चेहऱ्यावर

हसू उमटले, कारण तो बैल अतिशय अशक्त आणि

साधा होता.

तरुण त्याला पकडण्यासाठी तयार

होतो आणि तो बैल जवळ

आल्या बरोबर त्याला तत्काळ पकडतो, परंतु .....

.

.

.

त्या बैलाला शेपूटच नव्हते.....

लक्षात ठेवा

- जीवनात मिळालेली पहिली

संधी कधीही सोडू नये. कारण

संधी कधीच कुणासाठी थांबून

राहत नाही.

एखादी गोष्ट साध्य

करण्यासाठी केवळ विचार न

करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात

करायला हवी. तर आणि तर तुम्हांला यशाचा आनंद

लुटता येईल.����������


Rss_feed