Blog
Shri Ganesh--Beautiful Facts
Posted on December 18, 2015 at 9:00 AM |
This information is shared by Mrs. Radhika Tambe
||जय जय गणराज समर्थ||
गणेश हा शिवपुत्र आहे असे समजण्या बरोबरच लोक असेही समजतात कि त्याला प्रथम पूज्यत्वाचा मान अथवा वर शंकराने दिला आहे पण असे समजणे अधः पात आहे. शिव पुराणा मधेच लिहिले आहे कि शिव आणी पार्वती यांच्या विवाहामध्ये आदिपूजन श्री गणेशाचेच झाले होते जो आदिदेव आहे परमदेव आहे. शिव पार्वतीने तपः श्चर्या करून आदिदेव गणेशाकडून वर मिळवला कि त्याने त्यांच्याकडे पुत्र रूपाने येउन त्यांना त्याचे लालन पालन करण्याचे सौभाग्य प्राप्त करून द्यावे व आदिदेव गणेशानी त्यांचे मागणे मान्य करून त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या इथे अवतार धारण केला भगवान विष्णू सुर्य शिव शक्ती ब्रह्मा हे देव पण श्री गणेशाचेच ध्यान करतात आराधना करतात . खुद्द भगवान शंकर म्हणतात "गणेश देव देवेश ब्रह्म महेश मादरात । ध्यायामी सर्व भावज्ञ कुलदेव सनातनम ।" अर्थात भगवान गणेशच सर्वांचे कुलदेव आहेत तेच सनातन आहेत परमदेव आहेत आदिदेव आहेत. गणेश प्रभू हेच पूर्ण ओंकार स्वरूप आहेत. हेच गणेश प्रभू पंच देवांचे पिता आहेत हेच गणेश प्रभू पंच देवांना सत्ता आणि सामर्थ्य देणारे वरद मूर्ती आहेत. हे जे पूर्णब्रह्म गणेश प्रभू आहेत त्यांचे हे खरे स्वरूप जाणून सगळ्यांनी त्यांची विधीयुक्तं शास्त्रोक्त भक्ती केली पाहिजे अश्यानेच लोकांना परम मोक्ष जो कि स्वानंद लोक गणेश लोक आहे त्याची प्राप्ती होईल एकदा स्वानंद लोक मिळाला कि पृथ्वी वर परत कधीही यावे लागत नाही
गणेश गीते मधे श्री गणेश वरेण्य राजाला सांगत आहेत –
ब्रह्माविष्णुमहेंद्रार्द्योल्ल्कोंप्राप्यपुनःपतेत|
योमामुपैत्त्यसंदिग्धंपतनंतस्यनक्वचित्||
गणेशगीता अद्द्याय ६ श्लोक १९ गणेश पुराण
श्री गणेश, गणेश गीतेमध्ये सांगत आहेत -
ब्रह्मयाच्या ब्रह्म्लोकाला विष्णूच्या विष्णुलोकाला महेशाच्या शिवलोकाला सूर्याच्या सुर्यलोकाला किंवा शक्तीच्या शक्तीलोकाला जो जीव जातो त्याला तिथून अनेक वर्षांनी का होईना कोटी वर्षांनी का होईना परत पृथ्वीवर यावेच लागते परंतु जे कोणी श्री गणेशाची शास्त्रोक्त उपासना करतात त्यांना श्री गणेशाचा स्वानंद लोक प्राप्त होतो तिथून त्या जीवाला परत कधीही पृथ्वीवर यावे लागत नाही
गणेश भक्तांनी या खालील गोष्टी जर्रूर लक्षात ठेवाव्यात.=
१ गणेशाचे नाव घेताना स्वतःच्या कपाळाला शेंदूर जरूर लावावा कारण त्याचे नाव घेताना जर भक्ताच्या कपाळाला शेंदूर नसेल तर त्याला खूप राग येतो ते घेतलेले नाव त्याला मान्य होत नाही स्वतःला लावायची शेंदुराची डबी वेगळी ठेवावी आणि गणपतीला लावायची शेंदुराची डबी वेगळी ठेवावी
२ गणेशाला प्रिय आणि प्रसन्न करणारया गोष्टी –
दुर्वापत्र शमीपत्र लाल फुल पांढरा मंदार रक्त चंदन
3) गणेशाला अप्रिय निषिद्ध वस्तु - तुळस हींना अत्तर पांढर चंदन फूल
या गोष्टी गणेशाला कधीहि वाहू नयेत. गणपतीच्या मूर्तीला तुळशीचा कधिहि स्पर्श होऊ देवू नये त्याला तुळस निषिद्ध आहे अप्रिय आहे
4) गणेशाला नैवैद्य दाखविताना नैवैद्याच्या ताटावर दोन दुर्वा ठेऊन मगच त्याला नैवैद्य दाखवावा गणपतीच्या नेवैद्याच्या ताटावर कधीही तुळस ठेवू नये फक्त दुर्वाच ठेवाव्यात
5) त्याचे पुजेचे सामान वेगळे असावे त्याचे सामान दुसरया कोणालाही वापरू नये तो जेष्ठराज आहे श्रेष्ठ आहे
6) त्याचे निर्माल्य वाहत्या शुद्ध पाण्यात प्रवाहित करावे. त्याच्या निर्माल्याला पाय कधीही लागू देवू नये त्याने खूप मोठा दोष लागतो गणेश पुराणामध्ये त्याबाबत कथा आहे
7) घरात गणपतीची प्राण प्रतिष्ठा केलेली मूर्ती असेल तर तिला रोज कमीत कमी दोन दुर्वा तरी जरूर वाहाव्यात आणि शेदूर लावावा. दुर्वावाचून गणपतीची मूर्ती कधीही घरात ठेवू नये गणेशाला रोज रक्त्तचन्दन उगाळून लावावे पांढरे चंदन कधीही लावू नये रक्त्तचन्दन वेगळ्या सहाणेवर उगाळावे ते उगाळायची सहाण त्याच्यासाठीच वापरावी.
डॉ. श्रीमती राधिका श्रीकृष्ण तांबे,
गाणपत्त्य,
Categories: None