मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

Blog

Story Behind Satyanarayan puja -Prasad

Posted on May 2, 2017 at 9:05 PM

सत्यनारायण पुजेच्या कथेतील प्रसादाचे रहस्य !

 

सत्यनारायण कथेत प्रसादाचा त्याग केल्याने साधुवाणी व अंगध्वज राजा यांना शिक्षा झाली असा उल्लेख आहे ! यावर अनेकांचा आक्षेप आहे ! काही लोक म्हणतात की देव का शिक्षा करेल सारखी सारखी ? देवाला श्रद्धा महत्वाची ! बरोबर अगदी बरोबर तुमच म्हणण ! एक उदाहरण देतो यावर . एक वर्ग असतो त्यात सत्तर ऐंशी मुले असतात ! त्यात हुशार मुले अगदी कमी असतात आणि नंबर मिळवणारी मुले तर अगदीट कमी असतात ! ही मुल कधी मस्ती करत नाहीत ! बर यांना मार्कस ही नव्वद पंच्याणव टक्के असे असतात ! परंतु वर्गात सर अगदी थोडी जरी चूक झाली तरी या हुशार मुलाला ओरडतात व कौतूकही करत नाहीत ! अगदी उलट एखादा चाळीस टक्केच मिळवणारा विद्यार्थी असेल आणि त्याला एके चाळीस टक्के जरी पडले तरी शाबासकी देतात !

अगदी परमार्थातही हेच घडत असते ! याचे कारण सरांना हुशार मुलगा वाया जाऊ नये ही अपेक्षा असते व बाकी लोक त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात ! मग जर ज्याचे अनुकरण करतो तोच चुकला तर ? बाकीचेही चुकच वागणार ना ? तसेच इकडे देवाचे जे भक्त असतात त्यांनाही हाच नियं लागू होतो ! हल्ली साधु संत यांना चुकताना पाहील की राग येतो ना ? तसच असत हे ! मग जर ते सर त्या हुशार विद्यार्थ्याची हुशारी वाया जाऊ नये म्हणून त्याला शिक्षा करत असतील तर ते चूक असते का ? नाही ना ? तसेच साधूवाणी आणि तो अंगध्वज राजा हे समाजातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत जर तेच चुकत असतील तर समाज बिघडायला वेळ कितीसा लागेल हो !

अगदी म्हणूनच वेळोवेळी शासन दिले गेले देवा कडून ! जरा व्यवहारी विचार करू ! साधुवाणी व्यापारी आहे . तो नवस करतो की मी पुजा करेन ! बर नवस करतो पण वेळोवेळी चालढकल करतो ! मग मला सांगा ही चालढकल वृत्ती व्यापारासाठी किती चांगली आहे ? लोकांचा विश्वास बसू शकेल का ? म्हणजे तो साधुवाणी वचनापासून परावृत्त होऊ नये म्बणून देवाने शासन केले असे असेल तर काय चुकीचे आहे ? जरा विचार करा की तुम्हाला कोणी देण लागतोय आणि तो रोज उद्या ये परवा ये अस करतोय आणि उधारीही चुकवत नाहीये तुम्हाला राग येईल की तुम्ही त्याला चहा पाजून सांगाल की जाऊ दे बुडव तू माझे पैसे बुडव ! हे घे अजून घे ! कराल का असे ? मग कथेतून हीच शिकवण द्यायची आहे हे लक्षात का नाही येत ?

आता प्रसादाचा त्याग ! पुजा म्हणजे आपण एखाद्या कार्यासाठी घेतलेली मेहेनत समजू व प्रसाद म्हणजे त्याचे फळ समजू ! मग विचार करा की अगदी मेहेनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आणि तुम्ही प्रयत्नच टाकले तर तुमची नौका बुडेलच ना ? आणि जेव्हा मनातील आवाज म्हणजे आकाशवाणी ही ऐकून तुम्ही परत गेलात आणि उरलेले प्रयत्न नेटाने केले म्हणजे प्रसाद भक्षण केला तर तुमची नौका तुम्हाला परत मिळणारच ना ? कोण रोखेल हो तुमचे यश ? कोणीच नाही ! मग काय वाईट शिकवते ही कथा ?

बर आता यात पाहू की जातीवाद आहे का ? तर नाही तोही नाहीये ! ब्राह्मण , वाणी , राजा , मोळीविक्या , हे समाजाचे चारही घटक यात आहेत व या कथेचा संदेश एकच की जो मेहेनत करेल आणि मला दारीद्र्यातून मूक्तच व्हायचे असा संकल्प करेल त्याला कोणीही यश मिळण्यापासून रोखू शकत नाहीमग तो मोळीविक्या असो वा राजा ! बर यात संतती म्हणजे स्त्री संतती होते यातही भेदभाव नाही ! उलटपक्षी स्त्री संततीचे महत्व व लिलावतीने एकटीने पुजा केली म्हणजे स्त्रीयांचे अध्कार यावर नकळत भाष्य होऊन ते सिद्ध केल गेल आहे की एकटी स्त्रीही पुजनादी स्रव कृत्य करू शकते !

तेव्हा सज्जन मित्रांनो आणि भगिनींनो हा कथेचा गाभा समजून घ्या ! आणि हो प्रसादाचे साहीत्य पहा काय आहे , रवा , साखर , गाईचे तु व दुध , केळी ! या सर्वांचा बनलेला शिरा ! या पदार्थात वीर्य वाढवण्याची ताकत असते असे आयुर्वेद सांगतो ! म्हणजे संतती साठी नवस केला पण त्यामुळे सतत हे पौष्टीक पदार्थ पोटात गेले व वीर्यसाठून आणि स्त्रीचे गर्भाशयही बळकट होऊन गर्भधारणा झाली म्हणजे नवस पूर्ण झाला !

इतक कोणी समजावणार नाही हो ! पण वाईट वाटत नाव ढेवली जातात तेव्हा ! जरा विचार करा यावर आणि केवळ ब्राह्मण सांगतोय म्हणून नाही तर वरील प्रमाणे विचार करून मग पुजा करा ! बर आणखी एक सांगतो जाताजाता ! एकटा ब्राह्मण यावर पोट भरत नाही बर का ! पुजेचे सामान जेथून आणता त्यालाही हा पैसा जातो , फुले , फळे , किराणा दुकानदार या सर्वांना यातून एक वाटा जातो आणि या निमित्ताने तुम्ही चार लोक घरी बोलावता ज्याने स्नेहसंबध वृद्धींगत होतात ! आता पहा बर या नजरेने सत्यनारायण पुजनाकडे !

 

स्वलिखीत

वैभव निर्मला नारायण जोशी

Categories: None