मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

Blog

Aarti

Posted on August 27, 2017 at 5:00 PM

आरती !

 

सध्या गणपती चे दिवस आहेत व रोज विविध आरत्या ऐकण्यास मिळतात ! इथे मांडावस वाटत की आरती या शब्दाचा अर्थ हा आर्त भावाने त्या ईश्वरास आळवणे असा आहे मग ती आरती एक म्हणा किंवा दोन पण आरती गाताना आर्त भाव हा हवाच ! पहा जरा आरतीतले शब्द ! सुखकर्ता , दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरी प्रेम कृपा जयाची ! काय सुंदर वर्णन आहे बघा ! तो गजानन सुखकर्ता असून दुःखांचे हरण करणारा आहे मग त्याच्या समोर विघ्नाची वार्ताही नुरवी म्हणजे उरणार नाही व तो प्रेम पुरवेल अर्थात प्रेमाने मातृत्व भावनेने तुम्हाला संकटातून सोडवून नेईल ! मग हे गाताना त्या ईश्वराला किती आर्ततेन शरण जायला हव बर !

शब्दही चुकीचे म्हणणार तुम्ही वर म्हणणार की तो दयाळू आहे त्याला समजत पण जरा विचार करा बर चुकीचे शब्द म्हणून आम्ही त्या मुळ रचनेतील मिळणारी स्पंदनेच हरवून टाकत नाही का ? जरा सलग स्पष्ट शुद्ध व शांततेने एकही शब्द मनाचा न घालता उदा. दर्शन मात्रे मनःकामना पुरती पण यात आणखी जोडले जाते ते स्मरणे मात्रे मान ! आता मान की मन ? बर मान हा अवयव आहे तर मन हे इंद्रिय आहे किती सहज चुकतो आपण ! मुळात जे मुळ रचनेतच नाही ते घालायच आणि वर तेही चुक म्हणायच !

समजा तुम्ही सत्यनारायण करता मग तो झाल्यावर केवळ गणपती व सत्यनारायण या दोनच आरत्या म्हणून समाधान होत नाही पाच , सात , अकरा आरत्या का म्हणाव्या लागतात ? गरजच नसते मुळात पण ती सवय लागली आहे आम्हाला ! बऱ्याच वेळा मी पहातो की यजमान देखील सर्व पुजा अगदी साग्रसंगीत करून दिली तरी केवळ आरत्या जास्त नाही घेतल्या म्हणून नाराज होतात व गुरूजींनी शाॅर्टकट मारला हा शिक्का मारून मोकळे होतात पण मुळ काय ते नक्की समजलेलच नसत त्यांना !

समजा शंकराची आरती म्हणतो आहोत तर यातील वर्णनानुरूप मुर्ती ती आरती गाताना डोळ्यासमोर उभी रहायला हवी खरे तर पण नाही होत तसे कारण आम्ही सुरूवातच चुकीची करतो ! लवथवती विक्राळा तर लवलवती विक्राळा म्हणतो , वाळा च्या जागी बाळा म्हणतो आता मस्तकी बाळा जरा कल्पना करा बर ! हसायला आल ना ! मग सांगा ती आरती म्हणता का तुम्ही ? नाही ती मस्करी होते कारण ज्याला काहीच येत नाही तो हेच अनुकरण करतो !

बऱ्याच जणांना मी इथे अश्या चुकीच्या आरत्यांच समर्थन करताना पाहील पण खरच सांगतो जरा विचार करा युद्धाच वर्णन सुरू आहे पण त्यात वीर सरच नाही म्हणजे वक्ताच ते वर्णन करूण रसात करतोय तर कस वाटेल ऐकायला ? किंवा आय अॅम अ डीस्को डान्सर हे गीत शास्त्रीय सुरात ऐकायला कस वाटेल ? हसायला येईल ना ? बस तेच आरत्यांचही असत ! तुम्ही आरती म्हणताय कडव सुरू असत निढळावरी कर$$$$$$$$$$€$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$ हा कर इतका वाढवलेला असतो की गाणाऱ्याचा आवाज चिरकतो अक्षरशः पण तो घामाघूम होऊन म्हणतच असतो ! आणखी एक भयानक उचेचर ऐकतोय मी गेली अकरा वर्ष तो म्हणजे शेवटी साधुसंत मनु वेधला माझा ! बाप रे ! सेवीती साधु संत आणि शेवटी साधु संत यात किती फरक आहे ! कसा तो बाप्पा समजाऊन घेईल बर ! जे संत महंत ( बाबांजींसारखे नाही हं ) त्या देवाला प्रिय होते व आहेत तेच शेवटी म्हटल्यावर त्यान नक्की काय समजावून घ्याव ही अपेक्षा करायची ?

देवीच्या आरतीतील गमतीदार कडव पहा जे गाताना स्त्री असेल तर पडले म्हणते व पुरूष असेल तर पडलो म्हणतात पण मुळ अर्थ कोणीच समजाऊन घेत नाहीत ! त्रिभूवनी पहाता तुज ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही , साही विवाद करीता पडले प्रवाही आता यात त्या देवीची स्तुती करताना कवि म्हणतो की संपूर्ण त्रिभूवनात तुझ्या समान कोणीही नाही व चारी श्रमले म्हणजे चारही वेद थकले व सहा शास्त्रेही थांबली पण तुझ स्वरूप कोणालाच उमगले नाही ! आता सांगा इथे कुठे स्त्रियांनी पडले व पुरूषांनी पडलो म्हणायचय ? पण नाही आम्ही तेच म्हणणार कारण तो समजाऊन घेईल अरे पण तो काय काय समजावून घेईल बर ? आणि का ? पेक्षा फक्त जी पुजा आहे ती व गणपतीची आरती म्हणा व तीही शुद्ध पहा कस बर वाटत ते !

 

स्वलिखीत

वैभव निर्मला नारायण जोशी

९६०४२८२१३३

Categories: None