Vat Pournima
« Back to calendar | « Previous Event | Next Event » |
Vat purnima is observed on the full-moon day of the Jyeshta month.
Image Source: By Indu (Own work) [GFDL 1.2 (http://www.gnu.org/licenses/old-licenses/fdl-1.2.html)], via Wikimedia Commons
The legend of Vat Purnima:
The celebration derived from the story of Savitri and Satyavan. It has been foretold that Satyavan won't live long. Resting on the lap of Savitri, Satyavan was waiting for death under a banyan tree, when the day of death comes. The messenger of Yama, the God of death came to take Satyavan. But Savitri refused to give her beloved husband. Messenger after messenger tried to take Satyavan away, but in vain. Finally, Yama himself appeared in front of Savitri and insisted to give her husband.
Since, she was still adamant, he offered her a boon. She asked for the well being of her in-laws. He granted it to her. She then followed him as he took Satyawan's body away. He offered her another boon. She now asked for the well being of her parents. This boon, too, was granted. But she continued to follow him. As they approached Yama's abode, he offered her a final boon. She asked for a son. He granted it. She then asked him how it would be possible for her to have a son without her husband. Yama was trapped and had to return soul of her husband to his body.
The Vat tree i.e. banyan tree is known for its longevity. There are some banyan trees in India which are more than 100 years old. Hence, this tree must have been chosen for the Vrat.
How to celebrate?
1. All married women celebrate this day.
2. They observed fast all day. One can eat fruits and milk based on individual preference and health conditions. The fasting is to remember that day’s specific importance and pray for it.
3. Go to nearby temple that has banyan tree, or if you can get a small tree from nursery or even you can get a branch of that tree.
4. Offer haldi- kumkum and all the saubhagya dravya सौभाग्य द्रव्य and tie a thread around the tree –trunk 3 times.
Importance of trees and plants: As we have read in previous rituals, each one denotes an importance of a tree, flower or even grass. This is to teach us the importance of ecosystem and to stay connected with nature and work towards preserving it. This festival brings out the importance of Banayan tree. In Hindu mythology, the banyan tree is also called kalpavriksha meaning 'wish fulfilling tree'. It represents eternal life because of its seemingly ever-expanding branches and people have great respect for it. There are many stories about it in ancient literature.
Significance of Banyan Tree: Read this informative article in Times of India about it.
वटपौर्णिमा (ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा
भारतातील सर्वत्र आढळणा-या वटवृक्ष याच महत्व सांगणार हे व्रत आहे . सणामागची पौराणिक कथा अशी की सावित्री या पुण्यवान व पतिपरायण स्त्रीने आपल्या पतीचे - सत्यवानाचे प्राण परत मिळवण्याकरिता, प्राण घेऊन जाणा-या यमराजाला आपल्या भक्तीने व युक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजसुध्दा बायका वडाची पूजा करतात.
आपले सौभाग्य मरेपर्यंत अबाधित रहावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना स्त्रिया देवाला या दिवशी करतात आणि सौभाग्य द्रव्य हिरव्या बांगड्या , शेंदूर, बुक्का, हळद-कुंकू, फुले, अक्षता, एक गळेसरी इत्यादी घेऊन वडाची पूजा करतात. पांढरं सुत ३ वेळा वडाच्या बुन्द्याला गुंडाळतात .
ह्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी उपवास करायचे असतात. कडक उपवास न जमल्यास फलाहार करू शकता , उपासाच्या मागे भावना अशी आहे कि त्या तीमित्याने आपण दिवसभर मना मध्ये भक्ती भावना ठेवतो.
वटवृक्ष हे १०० वर्षापर्यंत सुधा जगतात आणि म्हणूनच कदाचित ह्याच वृक्षाखाली सावित्री ने प्रण घेतला असावा. आपली संस्कृती आपल्याला निसर्गाचं महत्व सुद्धा शिकवते , म्हणूनच प्र्यत्येक सणाला एख्याद्या फुलाच किंवा झाडाचं महत्व सांगितले आहे .
खालील माहिती श्री प्रशांत वोर्लीकर मुंबई ह्यांनी पाठवली आहे :
ll श्री स्वामी समर्थ ll
०२/०६/२०१५ वार:- मंगळवार
❗ वटसावित्री पुर्णिमा❗
वटसावित्री चे महत्व आणि पुजेची माहिती :
जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागली. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्या वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात.
वटपौर्णिमेचे व्रत सुरू होण्यामागील पूर्वपीठिका : यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली.
व्रताची देवता : सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे.
वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व : वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.
वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व : वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणार्या सुप्त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.
वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत ? : फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणार्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.
प्रार्थना : सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.
Oops!
Oops, you forgot something.