Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

Hartalika Tritiya

« Back to calendar « Previous Event | Next Event »
Friday August 21, 2020 All Day

 


Image Source : Image Courtsey : By Yosarian (Own work) [CC BY-SA 3.0 (http/creativecommons.org/licenses/by-sa/3.0) or GFDL (http/www.gnu.org/copyleft/fdl.html)], via Wikimedia Commons

Hartalika Teej Vrat is an important ritual performed by Hindu women. Third day of the month of Bhadrapad is celebrated as Hartalika in honor of Harita Gauri/ parvati or the green and golden goddess of harvests and prosperity. A lavishly decorated form of Parvati, Gauri is venerated as the mother of Ganesha. Women fast on this day and worship Shiva and Parvati in the evening with green leaves. Women wear green bangles and green clothes and stay awake till midnight.

This is a 24 hour vrat, Women do all night jagran on this day and sing / dance traditional songs. I have sweet memories of participating in those jagarans back home.

By observing the ritual, unmarried women believe that they will get a husband like Lord Shiva. Married women believe they will be blessed with a good family life.

How to celebrate?

1. Put a chournag or wooden board in front of the deity [where you do everyday puja ]in the house

Or any suitable spot make sure its facing east-west.

2. Draw shivling and parvati with Rangoli, or make small sculptures using sand and water.

3. If you are using Chourang, decorate it with banana leaves on the corner.

4. Do puja by doing Ganesh puja first: Take a supari/ beetle nut put it on a bed of rice , offer haldi, kumkum, Gandh , akshata , flower and , a piece of jaggery –coconut naivedya

5. Now do the Shankar- Parvati puja same as ganesh puja, offer soubhagya –dravya to goddess parvati and offer all kinds of leaves and flowers.

6. Offer fruits and naivedya.

7. Observe fasting all day

8. Perform the evening Arti and invite other ladies for jagran/ singing in honor of goddess Parvati.

9. Again offer Arti at mid-night

10. Next day morning, offer Dahi-bhat [rice and yougurt] to Goddes parvati to conclude this puja and your fasting as well.

Note; these are very basic instructions; you may follow a puja-vidhi booklet or invite a Pandit / Guruji to guide you.

The legend

According to Hindu Mythology, Shiva ignored the love of Parvati for very long time as he was haunted by the death of Sati. To get the attention of Shiva, Parvati performed severe austerities on the Himalayas for several years. Some Puranas indicate that Goddess Parvati did penance for 16 years and survived on grass and fruits. Finally, Shiva acknowledged Parvati’s devotion and love and agreed to marry her.

Another legend states that she went through penance or hard-core tapasya and took 108 births on earth. The myth also states that till 107 birth she could not get Shiva as her husband. In her 108 birth Lord Shiva realized her love and married her. It is said that Mata Parvati declared this day as auspicious for women and proclaimed that whoever will perform puja on this day will be blessed with happy married life. Women observe nirjala fast which is symbolic to the penance that Mata Parvati performed.

नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे 'हरतालिका' हे व्रत सर्वांत श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत केल्यामुळेच पार्वतीला भगवान शंकर वर म्हणुन प्राप्त झाले, अशी कथा आहे.

भाद्रपद शुद्ध तृतीयेला मुली, सुवासिनी हे व्रत करतात. आंघोळ करुन, नदीतील वाळू आणतात. त्या वाळूची शिवलिंगे स्थापन करतात. परंतु अता बहुतेक ठिकाणी सखीसह पार्वतीच्या मातीच्या मूर्ति मिळतात. त्या स्थापून त्यांची पूजा करतात. पूजेचे ठिकाणी तोरण, केळीचे खुंट बांधतात, रांगोळी काढतात. फुले, विविध फुलाफळांच्या झाडांची पाने पत्री म्हणुन वाहतात. दिवसभर कडक (पाणी पण न पिता उपास करतात.रात्री कहाणी व जागरण करतात. रात्री बारानंतर रुईच्या पानावर दही घालुन चाटतात. नंतर सकाळी उत्तरपूजा करुन व्रताचे विसर्जन करतात. हे व्रत केल्यामुळे स्त्रियांचे सौभाग्य वाढते, असे म्हणतात.

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात.

या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड "हरित` म्हणजे "हरण` करणे आणि "आलिका` म्हणजे "आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे.

मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे.

हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा पती मिळावी म्हणून "हरतालिका` हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर ही करतात कारण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात.

हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव "पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, "हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. "तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.`

पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्चेर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला "अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्च`र्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, "तुम्ही माझ्या तपश्चनर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने "तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्चकर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्चघय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला.

तिचा दृढनिश्चचय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला "पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.

इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्चयर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत.

रात्री 12 वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.

या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने, फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. "सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.


Post a Comment

Oops!

Oops, you forgot something.

Oops!

The words you entered did not match the given text. Please try again.

Already a member? Sign In

0 Comments