Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

आठवडे बाजार लागतात व लोक पण तो एखादा इव्हेन्ट असावा त्या उत्साहाने तो इन्जॉय करतात हे बघुन मला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. बर हे आठवडे बाजार कांही फक्त अमेरिकेतल्या ग्रामीण भागातच लागत नाहीत. तर चांगल्या मोठ मोठ्या शहरांमधे पण लागतात व ते कमालीचे लोकप्रिय असतात.अमेरिकेमधे याला ‘फ्लिया मार्केट, फार्मर्स मार्केट किंवा सॅटरडे मार्केट म्हणतात. अनेक शेतकी व उत्पादक आपला माल परस्पर विकायला घेऊन येतात. छोट्या छोट्या ऐटदार तंबुनमधे हे मार्केट लागते. खाद्यपदार्थाचे स्टॉल लागतात. अत्यंत आकर्षक पद्धतीने स्टॉल्स सजवले जातात. उत्साही व्यापारी व तेवढाच उत्साही ग्राहक यांचा सुरेख संगम पहायला मिळतो. खाद्य पदार्थांची व फळांची भरपुर सॅम्पल्स चाखायला मिळतात. सनीवेलच्या सॅटर्डे मार्केटमधे खाद्य पदार्थांची व फळांची सॅम्पल्स खाऊन खाऊनच माझे पोट भरून गेले होते.
सॅन ओजे शहरातील एव्हरग्रीन व्हीलेजच्या चौकात पण आठवड्यातील दोन दिवस-म्हणजे रविवार व बुधवार- हे फार्मर्स मार्केट भरत असते. त्याचे कांही फोटो खाली देत आहे. या मार्केटमधे जास्त करून फळ-फळावळ व भाजीपालाच जास्त विकला जातो. यातील बहुतेक फळे व भाज्या ऑरगॅनीक (म्हणजे नैसर्गीक खतांचा वापर करून) पद्धतीने वाढवलेली असतात. कारण हल्ली अमेरिकेत ऑरगॅनीक भाज्यांना व फळांना फार महत्व आले आहे. आपण भारतामधे रासायनीक खतांचा जास्त वापर करून उत्पादन तर वाढवले पण क्वालिटीचा सत्यनाश केला. अमेरिकेमधे आता उलटा प्रवाह चालु आहे. हल्ली त्यांना रासायनीक खते वापरून पिकवलेले अन्न-धान्य- भाजी-पाला व फळे नको आहेत. या भाज्या महाग असतात पण त्यासाठी जास्त पैसे मोजायची त्यांची तयारी असते...(SJ)