There were two screenings held in LA with tremendous response. A salute to the great work done by Dr. prakash Amte and making an excellent movie on his life and work by Director Producer Samruddhi Porey, Read this movie review by Priti Barve Los Angeles:
कित्येक दिवसात आवडेल असा मराठी सिनेमा पाहिलेला आठवतच नाही .पण आज डॉक्टर .प्रकाश बाबा आमटे हा नितांत सुंदर सिनेमा पहिला आणि खूप खूप छान वाटतेय .
सिनेमाचा विषय इतक्या प्रचंड ताकदीचा असून तो तितक्याच ताकदीने समृद्धीनी मांडला आहे. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी , सिनेमातला वाघ आणि समृद्धी अगदी सोन्यासारखे!एकापेक्षा एक!
डॉक्टर प्रकाश आमटे ,हेमलकसा,आदिवासिंसाठी त्याचं कार्य आणि त्यामध्ये असणारे मंदातैंचे योगदान यावर नक्कीच पुस्तकात,वाचले होते, तेंव्हाही असेच खूप छान वाटले होते पण जेंव्हा ते चित्रपटातून पाहायला मिळाले तेंव्हा ते खरच खूप खूप भिडले.,निट उलगडून समजले.
"तीनशे साठ" आहेत,सगळ्यांना घेऊन जा",नाना पाटेकरच जाणे- इतक्या ताकदीने या प्रसंगाला खाउन टाकलंय त्यांनी आणि त्यावर सोनालीने सासर्यांकडे पाहून "तुमचाच मुलगा" असे दिलेलं हसू .
असे कित्येक प्रसंग त्यात डॉक्टर दिसले भेटले. ती तळमळ ,ती आस्था जी आधी वाचली होती ,ती खूप जबरदस्त रित्या पडद्यावर दिसत होति. मन्दातैन्च्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळत गेली .
सदैव भल्या मोठ्या ,गुळगुळीत रस्त्यावरून गाडी उडवत भटकणारे,मोठ मोठ्या घरात राहून सोसेल तितके सोशल वर्क (शाळेत मदत करायला जाणे ,इत्यादी:)) करताना ,देशात गेले कि मिनरल पाण्याच्या बाटल्या घेऊन फिरताना आणि भास भास भरलेल्या कपड्यांच्या कपाटाना आवरताना,आमची जिंदगी आता खरेच फारच फालतू वाटायला लागली,नोकर्या करायच्या ,मुलांना वाढवायचे,टप्प्या टप्प्याने अधिकाधिक भौतिक वस्तूंची खरेदी,त्याचं मिरवणं ,यातच संपणार आम्ही एक दिवस !मरताना वाटणार "च्यामारी काय जगलो?"
काय सांगू सिनेमा खरेच डोक्यात चढतो,म्हटलं नां डॉक्टरांचे काम खरच पर्वताएव्हढे आहे आणि त्याला न्याय देताना हा सिनेमा तेव्हढाच जब्बरदस्त बनला आहे.
माझ्या मनात एक ज्योत लागली आहे सिनेमा पाहणार्यांच्या प्रत्येकाच्या मनात लागली असणार नक्किच.
महाराष्ट्र मंडळाचे खूप खूप आभार !