१२५ कोटी लोकांमध्ये एक दोन खेळाडू वगळता, हा आपला तिरंगा पदाकांमार्फात फडकवू शकला नाही. काही दिवसांपूर्वी Times of India ह्या वर्तमानपत्रात एका वाचकाने याबाबत एक कैफियत मांडली ती वाचनात आल्यावर त्यावर जास्त भाष्य करावे हे मनोमनी ठरवले.
अखंड परिश्रमाची उणीव व त्यात भर म्हणजे गल्ली ते दिल्ली चालणार राजकारण हीच ह्या अपयशाची खरी कारणे.
तरीही सच्चा मुंबैकराला मात्र ह्या अपयशामुळे खजील व्हायची गरज नाही. कारण मुंबईतील प्रत्येक चाकरमानी हा ऑलिम्पिकमधील सर्व क्रीडाप्रकारात कुशल असतोच हे एक सत्य आहे. आता ह्या सत्याची परिणीती कशी येते ती आपल्या मुंबईतील रोजच्या दिनक्रमाकडे पाहताच कळते.
मुंबईतील माणसांचे खेळ सुरु होतात भल्या पहाटे. खेळाआधीचा व्यायाम (वॉर्मअप) हा ऑफिसला निघण्याच्या तयारीत (सॉरी धावपळीत) जातो. पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट (पेरूचा पापा) धेतला कि नाही ह्याची खात्री करून शर्यत घेण्यातच निघण्याची वेळ टाळते. मग सुरु होतो पहिला खेळ प्रकार ११० मी अडथला शर्यत ११० मी हर्डल अशी असते. याकरिता आपण मुंबई महानगरपालिका (BMC) व टेलीफोन निगम (MTNL) चे आभार मानले पाहिजे. त्यांनी निर्मिलेल्या खड्यमुळेच हि शर्यत अस्तित्वात येते. कधी कधी हा प्रकार स्टीपलचेसं मध्ये रुपांतरीत होतो., ह्या शर्यतीत जो हरतो त्याची बस हूकते व जो जिंकतो त्याला बक्षीस म्हणून बसच्या at least फूटबोर्डवर उभे राहायला मिळते. मुंबईकरांचे ह्या खेळातील कौशल्य पाहून उसन बोल्ट हि शर्यत कठीण वाटेल असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ह्या शर्यतीत ब्रीफकेस हातात घेऊनच भाग घ्यावा लागतो हि एक अनवधानाने पडलेली अपरिहार्य अट आहे. असो .
ट्रक इव्हेंट्स ह्या संध्याकाळी घेतल्या जातात. स्थळ असते रेल्वेस्थानक. ह्यात स्पर्धकही खूप असतात. इतके कि, ट्राफिक पोलिक हातात दोरी धरतो व एकदा का ती दोरी त्याने सोडली कि स्पर्धा सुरु. मग जो तो आपल्या starting point पासून उडी मारीत ट्रेन पकडायला धावतो.
त्यानंतर सुरु होतात बॉक्सिंग, कराटे, रेस्टलिंग, कुंग-फु ह्या स्पर्धा. ह्या सर्व स्पर्धा रेल्वेच्या डब्यात ऐन गर्दीत होतात. ह्या खेळ प्रकारातील विजेत्यास पहिले बक्षीस हे सुवर्णपदक नसून खिडकीची जागा (विंडो सीट) हे बक्षीस ठरते तर हरणारे मग रोमन रिंग्स व पेरलल बार ह्या शर्यतीत भाग घ्यावा लागतो. हि शर्यत रेल्वे डब्याच्या वर भरली जाते. भारतीय रेल्वे व खास करून मुंबईतील मध्य व पश्चिम रेल्वे हि माझ्या मते तर Indoor Sports Stadiumच आहेत.
ह्या सर्व खेळप्रकारानंतर ऑफिसच्या कामास सुरुवात होते. अशावेळी योगाविदयेची मदत होते. कारण एवढ्या सर्व धावपळीतून (चक्रव्युहातून) बाहेर पडून कामावर लक्ष केंद्रित करायला Yoga हवाच.
संध्याकाळी Second Session चालू होते. ऑफिस सुटल्यावर परत त्याच शर्यती पुन्हा एकदा घेतल्या जातात ११० mts. Hurdles, Steeplechase, karate, boxing इ. इ. आता पुन्हा जो जिंकतो तो सुखरूप घरी पोचतो, हरतो त्याला घरी यायला उशीर होतो. घरी पोचल्यावरही ऑलिम्पिक चालूच असते. मग सुरु होते वेटलिफ्टिंग, तळमजल्याहून दोन हातात दोन पाण्याने भरलेल्या बादल्या घेऊन ६ मजले चढून घरात नेणे. ह्या क्रीडा प्रकारचे प्रायोजक असतात मुंबई महानगरपालिकेचे पाणी खाते. ह्यांच्या कृपेमुळे आपल्या रेल्वेलाईन मध्ये पाणी भरपूर साचते पण पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी मध्ये मात्र पाणी नसते.
ह्या मुंबई ऑलिम्पिक मध्ये लहान मुलांचाही सहभाग असतोच कारण सकाळी शाळेत जाताना तीसुद्धा वेटलिफ्टिंग (दप्तरे उचलताना) करतात. ह्या खेळ प्रकारानेच ते ग्रेज्युएट होतात व भावी काळातील Track eventsसाठी तयार होतात.
अजूनही काही क्रीडा प्रकार आहेत कि ज्यात काही तज्ञांची मक्तेदारी आहे. उदाहरण म्हणजे मुंबईमध्ये तर रोज Shooting व तलवारबाजी स्पर्धा रस्त्यावर होतात. ह्या मध्ये प्रामुख्याने Gangster भाग घेतात. दिल्ली प्रांतामध्ये व्होलीबोल हा प्रकार जास्त चालतो, एकाची जबाबदारी दुसर्यावर टाकायची असे. कबड्डी तर आपला राष्ट्रीय खेळ आहे. एकमेकाचे पाय खेचण्यात यात नैपुण्य मिळवता येते. हे राजकारणात उपयोगी पडते. भर दुपारी गजबजलेल्या ह्या नगरीत डोंबारी हे Floor Gymnastic दाखवतात. दुर्दैवाने हॉकीमध्ये आपल्याला अजून खरी हॉकी समजवून घ्यायची आहे. कारण हॉकी स्टिकचा वापर जास्त करून पाय खेचण्याने दुसऱ्याचे त्याला पडण्यातच जास्त होतो. पेनल्टी कॉर्नर न मिळाल्याबद्दल खरी पेनल्टी द्यायला हवी. घोड्सवारी हा प्रकार महालक्ष्मी रेसकोर्सवर भरवला जातो. तेथे स्पर्धकांचे खिसे रिकामे होतील ह्याची तेथे योग्य काळजी घेतली जाते.
भुलेश्वर, दादर-रानडे रोड, गिरगाव, चर्चगेट येथे एखादा सोबत असलेला साथीदार चुकला तर त्याला शोधण्यात रग्बी हे खेळ खेळला जातो.
मुंबईच्या रोजच्या खरेदीच्या वेळी तर जलद चालण्याची स्पर्धा अनिवार्य असते. रेशनच्या रांगेत उभे राहता 4 x 100 mts. रिले हा प्रकार दिसतो. (ह्यात एकाने लावलेला नंबर पुढे ४ वेळा carry on होतो. ) हि झाली एका व्यथेची कथा.
आता मला सांगा कि, एवढे सगळे क्रीडा प्रकारात प्रत्येक मुंबईकर रोजच्या रोज सहभागी होतो तेही, नुसत्या रेशनच्या धान्याच्या ताकदीवर (यासाठी त्याला फिटनेस टिकवायला उत्तेजक द्रव्ये घ्यावी लागत नाहीत.) अस असताना, लंडन मध्ये भारताने पदके मिळविली नाहीत म्हणून खंत कशाला बाळगायची. मुंबईचे हे ऑलिम्पिक इतरांप्रमाणे दर ४ वर्षांनी न भरवता दर दिवशी हे खेळ खेळवले जातात.
मग आहोत कि नाही आपण सर्व मुंबईकर ओलीम्पिकवीर.
- डॉ. हेमंत श्री. जोगळेकर