Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

भाजी भाकरी, जोडीला कांदा आणि भरपूर पाणी. थोडा आराम, पुन्हा काम. ना कोणाला blood pressure चा त्रास होता, ना diabetes. त्यामुळे गावातला डॉक्टर माशा मारत बसला होता. एकही रुग्ण येत नसे. धंदा चालणार कसा?
मग त्याने एक युक्ती केली. एक ओलसर कागद टेबलवर ठेवला. एक रुग्ण आला होता. त्याला सांगितलं, " एक भयंकर रोग पसरत चालला आहे. त्यापासून वाचायचा एकच उपाय आहे. ह्या ओल्या कागदावर हात ठेव. प्रतिकारशक्ती वाढेल!!"
त्या रुग्णाने लगेच हात टेकवला. पूर्ण पंजा घासून घेतला.
डॉक्टर म्हणाले, " शाब्बास, आता तुला तो भयंकर रोग होणार नाही. फक्त एक काम कर, जो माणूस भेटेल त्याच्या हातात हात घाल आणि shake hand कर "
गावकर्याने तेच केलं....
आणि काय आश्चर्य, डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये प्रचंड गर्दी उसळली. कोणी खोकत होता, कोणी तापाने फणफणला होता तर कोणाला उलट्या होत होत्या. सगळं गाव आजारी पडलं.
कारण डॉक्टरांनी त्या ओल्या कागदाला रोगजंतू लावून ठेवले होते. ते जंतू हातोहात पसरत गेले आणि डॉक्टरांकडे इतकी गर्दी झाली की त्यांनी फी चार पट वाढवून टाकली !!

असाच एक जंतू social media मध्ये सोडला आहे....भारतीय फळे खाल्ल्यामुळे cancer होतो! ह्या संदेशामध्ये भारतीय फळांमुळे cancer होत असल्याचा दावा केला आहे. संदेश वाचणारा घाबरतो. मी फळे खाणार नाही, तुम्ही खाऊ नका...नाहीतर १००% cancer होतो असं सगळ्यांना सांगतो, सगळ्यांची "काळजी " घेतो.

आता हे तर स्पष्ट आहे की भारतीय फळे लोकांनी खायची बंद केली तर ते आजारी पडणारच. शिवाय फळ उत्पादकांना आत्महत्या करावी लागणार !!
फळे खावू नका, भाज्या खावू नका...hygienic नसतात त्या!!
भाजी भाकरी....ती तर अजिबात नको!!
इतका पैसा कमावल्यावर भाजी भाकरी आणि कांदा खाणे म्हणजे दरिद्री असल्यासारखं वागणे.
पण पिझ्झा खा, बर्गर खा...चार जणांना घरी बोलावून पार्टी करा...समाजात प्रतिष्ठा वाढेल.
ही मानसिकता वर उल्लेख केलेल्या धूर्त डॉक्टरने तयार केली. ....त्या धूर्त डॉक्टरला आता पिझ्झा कंपनी म्हणतात. फळांची बदनामी करणारे संदेश आमच्या हाताला चिकटवून दिले. ते पुढे पुढे चालले आहेत.
जितके जास्त पसरतील तितकी फळे, भाज्या बदनाम होतील.
आपोआप लोक पिझ्झा खातील, बर्गरची मजा घेतील.
आता विचार करा...Cancer नक्की कशाने होतो?
आम्हाला cancer , diabetes , heart problem , blood pressure चा त्रास झाला तर त्याची औषधे कोण विकतो?
सावध राहा. फळाने cancer होतो हा जंतू आमच्या हाताला चिकटवून दिला आहे. दुसर्याकडे त्याचा प्रसार करू नका.
नाहीतर, आमचे शेतकरी मरतील. आणि आम्हीही नको ते खावून रोगग्रस्त होऊ.
आणि तब्येत जपली जाईल ती फक्त विदेशी कंपन्यांची !!

भारतीय संस्कृती शिकवते:
"शुध्द बीजापोटी, फळे रसाळ गोमटी"
तरीही जाणूनबुजून आमची फळे बदनाम करण्याचा नाठाळपणा करत असाल तर
तुकाराम महाराजांनी मंत्र दिला आहे,
"भले तरी देवू कासेची लंगोटी.
पण नाठाळाच्या माथी, हाणू काठी !!"
-निरेन आपटे