मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

ऐन कोरोना काळातील मुशाफिरी :    सौ.ऊज्वला विजय कुलकर्णी

हा तोच काळ होता ... HOWDY MODI नंतर  नमस्ते TRUMP अतर्गत सुमारे लाखभर मारवाडी लोकांना अमेरिकेत या न मला निवडुन द्या हे सांगुन तात्या स.कु.स.प.(सह कुुुंटुंब सह परिवार)  White House परतले होते.
भारतीय मिडिया ईवांका न मेलेनिया च्या बावनकशी सौंदर्य आणि  अफाट संपत्तीचे जगाला कौतुक सांगण्यात व्यस्त... मोदी साहेब पुढच्या विदेश दौर्याचा मसुदा जाणून घेत होते.
1दिवस 24 तासांचाच होता...
सारे जग आपापल्या विवंचनेत होते. चीन मात्र आपल्या च राक्षस (dragon) शी दोन हात करत होता...त्याच दरम्यान अमेरिकेन पोस्टने दावा केला की एक प्रकारच्या विषाणूंमुळे चीनमध्ये  म्रृत्यु तांडव सुरू झालंय... चीन सुप्रिम कोर्टात ,चीन सरकारने 30000 संसर्गीत माणसांना मारण्याची परवानगी मागितली आहे... त्यावेळी ही बातमी सार्या जगाने अफवा मानली व तो चीनचा अंतर्गत विषय ... आपल्याला काय फरक पडतोय असा घेतला ..न ही गाफील व्रुत्ती  आज सगळ्या जगाला  फारच महागात पडलीय...
नेमके यांचं दरम्यान मी(64) व माझे मिस्टर(69)( अहो) (रिटायर्ड असीस्टंट चीफ इंजिनियर- सिंचन विभाग) आम्हाला पुर्वनियोजित परदेश गमनाचा हा एक छान अनुभव आला आहे.तो शब्द चित्रीत करण्याचा प्रयत्न  केला आहे.
खुप दिवसांपासूनची  (अहो) ची इच्छा होती पुर्ण फँमिलीला- मुलगा, सुन व दोन नातवंडांना घेऊन परदेश दौरा जाऊया. परंतु छोटा नातू चिं.विवांश जेमतेम दोन वर्षाचाच  न नात सान्वी (4) ची शाळा असल्याने मुलाने नको म्हणुन सांगितल.
आम्ही दोघांनीच जावे.मुल लहान असल्याने प्रवासात आमच्या मुळे तुम्ही इंजोय करु शकणार नाही  असे मुलगा म्हणाला... 
एवढे दिवस मुला नातवंडात घालवलेत आता तरी तुम्ही दोघेच जा.मुलाच्या भाषेत
( स्वतः कमवलेल्या पैशांचा कधीतरी स्वतःसाठी वापर करा....सेकंड हनीमुनला जा).
निमीत्तही होते... आमच्या 42 वी मैरेज anniversaryचे... छान दोघांनीच enjoy करावीं...नंतर पुढची ट्रीप सगळेच जाऊ असे ठरले...
शेवटी ह्यांनी सिंगापुर मलेशिया थायलंड केसरी premium 11दिवस टुर बुकींग  डिसेंबर महिन्यात केले. पण नैमके  अचानकच कोरोना थैमान सुरू झाले.रोज नवीन कहाण्या  व्रत्तपत्र देऊ लागले... चीन मध्ये चालता माणूस मरत आहेत ह्या बातमीमुळे तर सर्व नातेवाईक घरी येऊन न जाण्याविषयी सांगु लागले...सिंगापुर,  मलेशिया हे देश हे PRC चीनच्या अधिराज्यात येतात..त्यामुळे काळजीच वाटत होती....
दोघेही senior citizen असल्याने काळजीच वाटत होती..त्यातच tour package ही Refundable नव्हते....दुसरीकडे। आता नाही जान झाल तर ..वय अजुन वाढल्यावर पुन्हा ईतका लांब प्रवास शक्य ही नाही ही चिंता ही होतीच....
अखेर " To be or Not to be " ह्या द्वंद्वात मुलाने त्याच्या वर्गमित्राला  (विशाल)सिंगापूरलाच फोनकरुन परिस्थिती सांगितली...तो PR ( स्थायी नागरिक) असल्याने त्याला सर्व परिस्थिति चटकन समजली ...तो म्हणाला Singapore , Thailand सध्या पुर्णपणे (सुरक्षित) आहेत.. फक्त मास्क न सैनिटायजर भरपूर प्रमाणात पाठव बरोबर ...काही problem झालाच तर मी आहे इथं ..गरज पडली तर काका,काकू माझ्या घरी राहतील...न तुझा emergency ViSA मी 24 तासांतच काढून देईल..येऊ देत त्यांना.. transit insurance असल्यानेNO Problem. म्हणाला..(सुदैवाने गरजच पडली नाही),... जीव भांड्यात पडला..
5मार्च ला 5वाजता मुंबई विमानतळावर पोहोंचलो .
हळुहळु इतर ही सहप्रवाशी जमू लागले 
टुर सुरु झाली पण कोरोना ची भिती मनात होतीच. त्यात मी अस्थमाचा पेशंट.खुप टेंशन मध्ये security 
चेकींगला सुरुवात झाली.
नेमका आम्हालाच तेथील मेडीकल आँफिसरकडे घेऊन गेले.
कोरोनाचे एवढे संकट असतांना तुम्ही जातातच कसे म्हणाले,.6महिन्यापुर्वी टुर बुकिंग झालेले.कँंन्सल होणार नाही ... असं सांगितलं...टूर ऑपरेटर ने ...
मी तर खुपच घाबरले...
श्री. वासुदेवानंद सरस्वती रचित श्रीसंकटहरण स्तोत्र म्हणुन देवांचा धावा मनातल्या मनात सुरु केला. थोडे टेंशन भिती कमी झाली.  
शेवटी एकदाची विमानात विडोंशीट  बळकावत नवर्या जवळ जाउन बसले. Airport वर भारतात परतणार्यांची गर्दी होती... 685 सीटच्या विमानात। फक्त 78 प्रवासी होते....सारख वाटु लागले निर्णय चुकला तर नाही ना...मुलाला फोन करून सुखरूपतेची पोहोच दिली..न कोलंबो( 1st hopping destination) पोहचल्यावर फोन करतो कळवल...3 am ला मुलानेच फोन करून आमचा टुर लीडर रूपेश कडून खुशाली घेतली..व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या....
ह्यांनी(अहो) युरोप खंड सगळा पाहीलेला 6महीने अमेरिकेत राहीलेले .(15 देश फिरण्याचा अनुभव असल्याने त्यांना कुठे ही जाण्याची तशी इच्छा नव्हती (इच्छा फक्त बायकोला दाखवण्यासाठीच)मी खुपच स्वतःला भाग्यवान समजते.
अहो माझीच नाही तर सगळ्या कुटुंबाची तितकीच काळजी घेतात.चुका झाल्या तर रागावतातही. कुठले ही काम जीव ओतुन करतात..A-A-A ( Accept  situation- Adjust your resources- Avoid Critics ) ह्या तत्त्वानुसार..सर्व जवाबदारी व्यवस्थीतच नियोजन करतात..
6मार्चला सिंगापुर विमान तळावरच फ्रेश होउन सिंगापुर पाहण्यास निघालो.नाष्ट्याला  पंचतारांकित
हाँटेलमध्ये गेलो ....दोसा दही वडा नि इडली तीन प्रकारच्या चटण्या...
चटण्यांची चव आजही तोंडात रेंगाळते...नातीची व सुनेची आठवण काढत   नाष्टा केला... परत पुर्ण टुरभर असा नाष्टा मिळाला नाही.नंतर पाव ब्रेड बटर असेच असायचे.
सिंगापुर खुपच स्वच्छ सुंदर देश.ऊंचच ऊंच काचेच्या स्वच्छ इमारती... रोड स्वच्छ... कुठे ही खड्डा लागला नाही सगळे  कसे नियमाप्रमाने वागणारे.हाँर्न एेकायला आलाच नाही .ह्या सर्व गोष्टी ह्या लहान देशातच बघायला मिळतात...ह्याचे ऎकमेव कारण प्रत्येक नागरिकांची निस्सीम  देशभक्ती...स्वयं शिस्त....सिंगापुर जगाची TECHNOLOGY CAPITAL आहे.
जगप्रसिध्द सिंहाच्या तोंडातुन पडणारे पाणी (Meriillion statue)पाहुन डोळ्याचे पारणे फिटले.पर्समध्ये ती धार पडते असा फोटोही काढुन घेतला ..
ह्यांना तशी फोटो ची आवड कमीच.त्याच म्हणणे मनसोक्त  र्निसर्ग पहाण्याचा आनंद घ्यावा...पण मुलाला फार फोटोचे भारी वेड ...मला सांगुनच ठेवले ह्या ठिकाणी असा फोटो... अशी पोज दे.... मी ही मुलाची आज्ञाधारक आईच .....सांगितल्या
प्रमाणे फोटो काढुन घ्यायची...
मादाम तुसा  म्युजियम पाहीले, तेंडुलकरला टि.व्ही वर पाहणारी मी भारत रत्नने गौरवीलेला
क्रिकेटपटु जवळ उभी राहुन फोटो काढले... देशाचे पंतप्रधान श्री. नरेद्रजी मोदीसाहेबासोबत फोटो काढले...माझा तर विश्वासच बसेना. सगळेच पुतळे अप्रतिम होते वर्णन करण्याला विश्र्वकोशातही शब्द कमी पडतील.
तिथे पाउस बारा ही महीने धोधो पडतो लगेच लख्ख उन पडते.(थोडक्यात काय ..श्रावण 12 ही महिन असतोे)रेनकोट बरोबर दिलेले होतेच. आपण भारतीय कशाला ओझे म्हणुन बरोबर घेतले नाही.
छान छान शोज पाहुन 5वाजता पंचतारांकीत
हाँटेलवर मुक्कामासाठी आलो.
दुसर्या दिवशी   सिंगापुर दर्शन  (सिटी टूर) केली.
 होळीला घरची  खुप आठवण आली.
सुनेने Whats App वर  पुरणपोळी पाठवली... सोबत काळजी घ्या ..लवकर या...म्हणाली.. फोटोज छान छान म्हणाली... मला तिचे कौतुक वाटते...आमचा टुर लीडर 
मि. रुपेश आपण भारतीय आपले सणवार
कुठे जावो.. संस्कृती कधीच सोडत नाही म्हणाला...रुपेश रंग घेउनच आला होता. व्यवस्थीत चार रंग डिशमध्ये सोडुन प्रत्येकाला हँप्पी होली म्हणुन 2बोट गालावर लावले. 
आम्ही सगळ्यांनी त्याला रंग
लावले. रुपेशचा चेहरा लालीलाल केला.परत तो फ्रेश होउन आला.
टुर बस मध्ये बसलो की न चुकता
श्री. गणपती बप्पा मोरया.  
मंगलमुर्ती मोरया 
उंदीरमामा की जय.
असे म्हणुन टुर सुरु करणार.
तिथला  लोकल गाईड सोबत असतोच..तो 70 वर्षाचा होता  ..मिकी माऊस ..तुरुतुरु सगळ्याच्या पुढे...
तो त्याच्या भाषेत सांगायचा नंतर रुपेश सगळ्याना समजावुन सांगायचा...
तोडांचा मास्क निघाला अन कोणी खोकल किंवा शिंकल तर तो जोरात ओरडायचा मास्क लावा *****....कोरोना कुठं फेडशील ही पापं* *** ..Universal studios कारंजा समोर फोटो काढले..
सिंगापुरच्या सर्वात ऊंच इमारतीच्या 58 व्या मजल्यावरून दिसणारे दृष्य म्हणजे *दृष्ट लागण्याजोगे सारे* 
प्रत्येक पर्यटन स्थळाजवळ स्थानिक प्रशासनाने body  temperature n sanitation ची अप्रतिम व्यवस्था होती... सर्व जीने दर अर्धा तासाने sanitize होत होते...
कपबशीत बसलकी मी डोळे झाकुन घेतले.अवघड मेरी गो रांउड होता 8 आकाराचा पुर्ण उलटा होतो माणुस .
त्यात अहो ही बसले,72 वर्षीय सहप्रवाशी ही होता.रात्री थोडा त्रास झाला अहोंना... व्यायाम नि गोळीने बरे वाटले...
रोज रात्री न चुकता वाफ घेतली...प्राणायाम व योगा केले...
पाण्यातुन बोटीने (क्रुझ) प्रवास केला
डाँल्फिन शो.पाहुन... लेझर शो पाहीला लाइटींग कशी केली असेल उंच झाडांना वेगवेगळा आकार दिलेला... .डोळ्याचे पार्णे फिटले... तो शो पाहुन हाँटेल मध्ये जेवण करुन लवकर झोपलो.नंतर  सिटी पाहुन मुक्कामाला टुर बसनेच मलेशियाला जाणार आहोत असे रुपेशने सांगितले .
नेक्स्ट डे सकाळी अहोंनी मनसोक्त हौटेल मध्ये स्विमींग केले .आपल्याकडे एक स्विमिंग टँक असतो तो ही उन्हाळ्यात पाण्या अभावी  बंद करावा लागतो तिथे ओळीने स्वच्छ मोठे मोठे 1ते 12टँक असतील. 
सकाळी ब्रेड बटर नाष्टा  करुन दगडांचे प्राणी कुत्रा ससा हरीण जिराफ. सिंह वाघ. हत्ती  (rock garden)अगदी खरे प्राणी असल्यासारखे वाटतात हे पाहण्यासाठी गेलो..
नंतर लव्हबर्ड पाहायला गेलो (bird sanctuary)
पुर्ण तेवढा भाग जाळीने बंद केलेला आहे प्रवेशदार जाळीचेच मध्ये गेल्यावर आपण हातावर फरसाण फुटाणे काही ठेवले ते घेण्यासाठी ते पक्षी आपल्या हातावर बसतात मानेवर पाठीवर..... नंतर खरेदीला शाँपीगसेंटरला सोडले .अबब केवढे मोठे shopping complex....बिग बाजारच मोठा वाटायचा हे तर‌ किती मोठे होते...आमच्या लाडक्या नातीसाठी  डाँ कीट इथेच शोधुन  खरेदी केले. सापडल्याबरोबर
केव्हा सानवीला दाखवतो केव्हा नाही असे झाले.:
परदेश प्रवास मी सलग दोन वर्ष केला होता, मुलगा ओमानला असतांना डाँलफिन शो पाहण्यासाठी मुलाने 
भरपुर पैसे खर्च करुन समुद्र विहार करविला.ओरिजनल डाँलफिनची उंच उडी प्रत्यक्ष पाहीली.सगळी हौस पुरवली होती . ..
कोरोनानसता तर अजुन एन्जाँय करता आला असता मास्क शिवाय.पण करोनाचा फायदा एवढा झाला की Disneyland ला आम्हाला कुठे ही पटकन नंबर लागत गेले .रुपेश सांगत होताएक राइड करायला 1.1तास waiting  लागतो.तुम्ही नशिबवान आहात .कुठल्या ही राइडसाठी थांबावे लागले नाही.
असो सोयी सुविधा आपल्या देशापेक्षा खुपच छान आहेत. प्रत्येक राइड च्या जवळ विचारपूर्वक स्वच्छता गृहाची सोय  (अत्यंत महत्वाची)1किंवा 2 नाहीत तर 10 असतील .

सेंसाँर बसवलेले असल्यामुळे टाँयलेट आपोआप स्वच्छ होउन जायचे ...
मलेशियाला बाँर्डरवर चेकिंग होऊन आम्ही मलेशियाला आलो.
मी काकु बाई ची चक्क माँडर्न झाले .लेगीन नि ‍♀️टीशर्ट घातला.समुद्र राइड करण्यासाठी बीचवर आलो .बीच खुपच स्वच्छ नि निळाशार पाणी...खुप वेळ घालवला.समुद्रावर चालणार्या scooter बसुन फोटो काढले. रुपेशने शहाळे दिले सगळ्यांना.
नंतर जेवण करुन जगातील सर्वात मोठारोपवे मध्ये बसलो . पाऊस पडुन गेला होता.उन पडले..तीन किलो मिटरच्या रोप वे मधुन ते ढगांच्यामधून जातांना विहंगम द्रृश्याने ...
राधा सारखी बावरी झाले...
रुपेशने सांगितले आता थोडे चालावे लागणार..(Royal Palace , Malaysia).मग काय माझी 
दम लागल्याने चालण्याची स्पीड कमी झाली थोडा वेळ थांबलो हे
थांबलेले पाहुन रुपेश जवळ आला .काकू सावकाश चला काही घाई नाही. असे सांगुन तो इतर लोकांना रस्ता दाखवण्यास गेला....
तरुनपणीच अशा टुर करुन एन्जाँय करायला पाहीजेत हे जाणवलं...
नंतर जंगल सफर केली....भव्य राममंदीर पाहिले... मागे वाघ पाहण्यासाठी मुद्दाम चंद्रपुरला गेलो तीन तास फिरलो पण वाघ काही दिसला
(ताडोबाच्या जंगलात)नाही. पैसे वाया गेले...
इथे मात्र वाघ सिंह जिराफ पांढरा वाघ
हत्ती मोर कळपांनी अगदी जवळुन पाहीले. नातवंडांची खुप आठवण झाली.
नंतर थायलंडला आलो नि कोरोना वाढल्याच्या बातम्या येवु लागल्या.परत टेंशन वाढले.
थायलंडचा। Thai मसाज प्रसिध्द आहे 1तास पुर्ण शरीराला। scientific masaage करतात टंगळमंगळ नाही .मसाज झाल्यावर एकदम फ्रेश वाटते. सगळी मरगळ नाहीशी झाली...
प्रवासात मुलांने सतत फोनवर काळजी घ्या.आल्यावर विलगीकरणात रहावे लागेल सांगितले.
पटाया पाहून बैंकाक एअरपोर्ट वरुन परतीचा प्रवास होता...16 मार्च 2020.. आपलं विमान भारतात जाणार शेवटचं विमानआहे ..हे कळलं न मनोमन देवाचे आभार मानले...
उद्यापासुन  भारतात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास वाहतूक बंद होत आहे .हे कळल्यावर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले.
आम्ही खुप नशिबवान ठरलो सुखरुप वापस आलो.अक्षरशः 15. मिनिटात विमानतळाबाहेर पडलो.
रुपेशसोबत खेळलो होळीचा रंग 
टुर करावी तर केसरी संग..
असेच मी म्हणेल .
दिस जातील दिस येतील..
कोरोना ही जाइल त्रास संपेल..
न सुख येईल..
पुन्हा नव्या सहलीचे मुलगा सुन नातवंडा बरोबर बेत आखेल .
दैव साथ देईलतरच.
देव सांभाळुन आणेल अशीच प्रार्थना करेल.
अशी मी सामान्य गृहिणी .. एैन कौरौना काळातील अविस्मरणीय 4 आधुनिक धाम यात्रा सुखरूप संपन्न करत कोरोनावर मात केली...
मुसाफिर हुं यारो ....
गणपती बप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया उंदीर मामा की जय!!