मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

Welcome to Culture Desk! Read and Share an original piece of music, literature , article . Please do send them to

kokatayash@gmail.com

Disclaimer: Any views or opinions presented in the articles, Story, poems on this page and blogs are solely those of the author [user generated ] and do not necessarily represent those of Marathi Culture and Festivals site. The Company accepts no liability for the content or for the consequences of any actions taken on the basis of the information provided under the article/ story / poem or blog section.


Here are the guidelines to send content to be published in our next Diwali Digital Magazine 2020:

आमच्या पुढच्या दिवाळी अंकात लिखाण पाठवायची नियमावली: Unlocked:    Yashashree Deshpande Angal


दिनांक फेब्रुवारी १४, २०२०

आजचा दिवस प्रेमाचा!! सकाळी सकाळीच फुलदाणीत लाल गुलाब पाहिले आणि मनात म्हटलं स्वारीच्या लक्षात आहे म्हणजे! नाहीतर असे "Days" वगैरे पाळणं म्हणजे अतिशय बालिश आणि थिल्लरपणाचं लक्षण आहे अविनाशच्या मते.. टेबलवर आयता चहा आणि पोहे वाट पहात होते (नवऱ्याला लग्नाआधीच स्वयंपाक शिकवल्याबद्दल मनोमन माझ्या दिवंगत सासूबाईंचे आभार मानले ) दिवस छान सुरु झाला. 

पितृपक्ष (भाग १): धनश्री देसाई तोडेवाले, मुंबई 

आजपासून पितृपक्ष सुरू होतोय, वर्षानुवर्षे घरात सुरू असलेले श्राद्धकर्म ,तर्पण सगळं बघत आलोय त्यामुळे या पक्षाचे महत्व आणि संस्कार खोलवर रुतलेय...

आपल्या पिढीचे ज्ञान आपल्याला असलेच पाहिजे,आपले पूर्वज आपल्यासाठी जे काही करून जातात, त्यांच्या पुण्याचा साठा म्हणा किंवा अगदी द्रव्यरुपातले काही.
लोकं पूर्वजांच्या वस्तूमुळे,वास्तूमूळे किंवा दाग दागिने यांमुळे त्यांना स्मरतात तर काही त्यांच्या कर्मकृत्यांमुळे...

राजा-राणी 

अहो राजे ...आपल्या प्रजेत फक्त जनावरच? किती दिवस आपण फक्त जनावरांवर राज्य करणार? मला मनुष्य जातीवर सुद्धा राज्य करायला आवडेल आणि मनुष्यांवर राज्य करून आपण सगळं जग पाहू शकू. लग्न झाल्यानंतर तुम्ही मला हे वचन दिलं होतं कि तुम्ही मला अख्या पृथ्वीची स्वामींनी करणार म्हणून.

उंबरठा: ऐश्वर्या 

 ह्या गावात माझी शिक्षिका म्हणून नवीनच नियुक्ती झाली होती. नुकतीच एम. एस. सी. करून हि पहिलीच नोकरी होती, तेव्हा निदान एक वर्ष तरी खेडेगावात पोस्टिंग स्वीकारायची होती. 

एक खोली आणि स्वयंपाकघर अशी छोटीशी जागा गावातल्या आतल्या भागात भाड्याने मिळाली होती. पुढे वाचा 


Yashwant Deo- Dr. Meena Nerurkar, Mumbai

Veteran Marathi musician Yeshwant Deo, who had composed music for many films including Shabana Azmi-starrer Saaz, passed away recently on October 30/2018  after suffering from a brief illness. He was 91 यशवंत देव(१ नोव्हेंबर १९२६-३० ऑक्टोबर २०१८) हे एक मराठी कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक होते. आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला. 


महाकवी कालिदास: ऐश्वर्या 

उज्जैन, मध्यप्रदेशात दर वर्षी कार्तिक शुक्ल एकादशी पासून कालिदास समारोह सुरु होतो. कालिदासांच नावं घेतल कि मला माझ माहेर आठ्वत! मध्यप्रदेश च शहर उज्जैन हे कालिदासांच शहर आहे, मी माझी मास्टर्स डिग्री इथूनच केली होती. इथे राहूनच मला कालिदासांच वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या कार्याची माहिती मिळाली.

उज्जैन (उज्जयिनी) (अवंतिका) भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर आहे. क्षिप्रा नदीच्या किनारी वसलेले ह्या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. या शहराला मंदिरांचे शहर असेही म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत.

दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे जमा होतात. भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महांकालेश्वर हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे. तसेच, मंगळ या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे. मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर इंदूर हे उज्जैनपासून केवळ ५५ कि. अंतरावर आहे.

उज्जैन ची राजकुमारी विद्योत्तमा ही खूपच हुशार आणि शास्त्र तज्ज व्यक्ती होती. शास्त्रोक्त वादविवाद मध्ये तिला कोणी पण हरवू शकत नव्हत. तिने हा प्रण धरला होता कि जो तिला शास्त्रोक्त वादविवाद मध्ये हरवेल, त्याच माणसाशी ति लग्न करेल. काही लोक तिच्यावर संतप्त होते आणि तिला धडा शिकवायला म्हणून त्यांनी एका अशिक्षित माणसाला ज्याला कि कुठल्याही प्रकारच काहीच ज्ञान नव्हतं,  त्याला सांगितलं कि तुझ लग्न एका राजकुमारी शी होऊ शकेल, तुला आम्ही सांगू ते करावे लागेल. तो माणूस हो म्हणाला! राजकुमारी ला सांगितले कि तो तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं फक्त हातवारे करूनच देईल कारण काही कारणास्तव तो मौन व्रतात आहे. राजकुमारी नी ते मान्य केले.
राजकुमारी ला आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली आणि तिचं लग्न झालं, पण तिला लगेचच कळल कि तीची फसवणूक झाली आहे आणि रागवून तिनी तिच्या पतीला सोडून दिलं. तो माणूस मग उज्जैन च्या गड्कालिका देवळात येऊन बसला आणि देवी ची पूजा प्रार्थना केली. त्यानी हे प्रण घेतलं कि तो जितकं शक्य होईल तितकं ज्ञान अर्जित करेल. आणि आपल्याला मिळाले महाकवी कालिदास!
अर्थातच ही गोष्ट सर्वात लोकप्रिय आहे पण त्यांनी स्वतः कुठे ही त्यांच वास्तव्य किवा त्यांच्या खाजगी जीवना विषयी लहिलेलं नाहीये.
त्यांनी “ कुमारसंभव “ मेघदूत , रघुवंश , माल्वीकाग्नीमित्र , अभिग्यान शाकुंतल , रीतुसंवहार, विक्रमोर्वशीयम , असं अप्रतिम काव्य आणि साहित्य जगाला दिलं. भारतातच नव्हे तर विदेशात सुदा त्यांना एक महान लेखक- कवी म्हणून ओळखलं जातं. “ अभिज्ञान शाकुंतल “ हे सर्वात आधी इंग्रजी मध्ये रुपांतरीत केलं गेलं. एक महत्वाची माहिती म्हणजे अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया स्टेट युनिवरसिटी बर्कली चे प्रोफेसर आर्थर विलियम राईडर हयांनी संस्कृत ते इंग्रजी रुपांतर केलं.
उज्जैन ला कालिदास अकॅडमी आहे आणि दर वर्षी तिथे “ कालिदास समारंभ “ असतो . त्या समारोह मध्ये विभिन्न कला , संगीत, साहित्य प्रतीयोगिता असतात. ह्या सामारोहातून भारता ला मोठ मोठे कलाकार ही मिळतात. मला आठवतं कि मी शाळेत असताना महान चित्रकार एम. एफ. हुसेन ह्यांना पण पारितोषिक मिळालं होतं आणि तेव्हापासूनच जग त्यांना एक चित्रकार म्हणून ओळखू लागलं.
मला कधी-कधी असं वाटतं कि जीवनात आलेल्या अडचणी, ठोकताळे हेच आपल्याला सफलता मिळवून देण्यात मदद करतात. देवी सरस्वती चा आशीर्वाद जसा महाकवी कालिदास ना मिळाला , तसाच तुम्हा आम्हास मिळो आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी सद्बुद्धी मिळो, हिच देवी चरणी प्रार्थना!

ऐश्वर्या कोकाटे 

बहुकोणी व्यक्तिमत्व: ऐश्वर्या 

मला बरेच दिवस ह्या विषयावर लिहू असं वाटत होत . “ व्यक्तित्व “ ह्या वर आपले काही “ माईंड सेट “ असतात, उदाहरण स्वरूप जर एखादी व्यक्ती धार्मिक प्रवचन करत असेल तर ताबडतोप डोळ्या समोर एक संत येतो, राजकारणी व्यक्ती म्हटलं तर खादी वस्त्रधारी, व्यापारी/ उंच पदावर असेल तर सूट घातलेला. तसच एखादी महिला जर जीन्स- शोर्ट इत्यादी वस्त्रधारी असेल तर “ मॉड “ असं समजलं जातं. तसच एखादी बाई–मनुष्य केसात तेल लाऊन वेणी घातलेतली असेल तर “ मागसलेली’ समजली जाते. खर बघितलं तर बाहेरून दिसणाऱ्या व्यक्तित्वाच त्या व्यक्तीच्या वैचारिक किंवा मानसिक पातळी चा काहीच संबंध नसतो, अगदी मागसलेली दिसणारी व्यक्ती वैचारिक आणि मानसिक पातळी वर पुढारलेली असू शकते.

अश्या विभिन्न व्य्क्तीत्वांच आपल्या मनात एक ठराविक चित्र असल्या कारणानी जर ह्या व्यक्तींना आपण कुठे दुस-याच रुपात बघितलं तर ताबडतोप आपल्या मनात अनेक प्रश्न येऊ लागतात तर हाच प्रश्न माझ्या ही मनात सारखा येतो कि असं कां असत ? जर कां धार्मिक प्रवचन करणारा व्यक्ती संसारी असेल आणि त्याला आपण नाईट क्लब मध्ये बघितलं तर आपल्याला हे विसंगत कां वाटावं? देव-धर्म करणाऱ्या व्यक्तींनी अगदी सात्विक जीवन जगावं, आणि त्यांनी जीवनातल्या इतर गोशींचा आस्वाद न घ्यावा अशी अपेक्षा कां केली जाते? . काही वेळा तर अश्या व्यक्तींना “ दुतोंडी “ ही समजलं जातं. दुतोंडी असणं आणि बहुकोणी व्यक्तित्व ह्यात पुष्कळ फरक आहे.

आपल्या संस्कृती मध्ये तर आपल्याला बहुकोणी व्यक्तित्वाच महत्व शिकवलं गेलं आहे. योग्य वेळी योग्य ‘टोपी’ घालून जो ह्या संसारात वावरतो, तो पुष्कळ उंच झेप घेतो आणि जीवनात सफल होतो .

‘नीतीसार‘ मध्ये एक पद्ध आहे :

कार्येषु दासी , कारणेशु मंत्री , भोजनेषु माता, शैय्येशु रंभा, रुपेषु लक्ष्मि ,क्ष्म्ये शु धरित्री षट धर्म युक्त, कुलधर्म पत्नी.

ह्या सहा-कोणी व्यक्तित्व असलेली पत्नी सर्व श्रेष्ठ असते. तर ह्या वर जर विचार केलात तर आताच्या काळ मध्ये हे नीती सार पुरुष आणि बाई दोघांवर लागू होतं, आणि बहु –कोणी व्यक्तित्व आपल्याला यश मिळवून देतो.

कुणाच्या ही विचारसरणी वर कटाक्ष करण्याचा ह्या लेखाचा उद्धेष्य नाही मात्र ह्या दिशेत विचार करायला काहीच हरकत नाहीये.

ऐश्वर्या कोकाटे

त्याने माझ्याकडे डोळेभरून पहावं......

Tyane Mazyakade Dole Bharun Pahaav : Marathi Song composed by Kishor Katti, Los Angeles.

फ्लू: ऐश्वर्या 

थंडी चे दिवस सुरु झाले आणि आपल्या भाषेत ‘सर्दी-खोकला” तर इंग्रजीत फ्लू नी शरीरात प्रवेश घेतला! कशीबशी औशध घेऊन कामावर पोहोचले. कॉम्प्यूटर वर लॉग इन केलं आणि आकछु~~~शिंकांना सुरुवात. समोर बसलेला पीटर लगेच ब्लेसयू म्हणत माझ्याकडे बघुन जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागला कि वायरल फ्लू आहे कि काय? आणि तितक्यातच पुन्हा शिन्कांचा दौर! आता मात्र त्याला खात्री पटली कि हा तर फ्लूच आहे, लगेच एक सह्नुभूती मिश्रित वाक्य उडवलं : oh poor thing, feel better. आता एका सर्दीत मी गरीब कशी झाले ज्याचा विचार करत कामाला लागले.

एका client बरोबर मिटिंग होती. हेलो म्हणून त्याने शेकहेंड करायला हात पुढे केला, नाईलाजाने तो लोकौपचार पार पाडला, मिटिंग सुरु झाली आणि परत आ~~~ आता मात्र त्याला पण मला फ्लू झाल्याचा संशय आला असावा कारण तो स्वत:च्या हाताकडे आणि माझ्याकडे रागमिश्रीत दृष्टीने बघू लागला जो आत्ताच मी शेक केला होता.

त्यांनी लौकरच हि मिटिंग कमी वेळात पार पाडली आणि मी लागली परत शिंकायला. बॉस च आगमन झालं आणि तिनं जिंजर-लेमन चहा पी म्हणून सूचना केली आणि जास्त त्रास झालं तर उद्या सुट्टी घे हे हि सांगितले.

लंच ला डब्बा उघडला पण काही खायची इछाच मेली होती, म्हणून गरम चहा चा कप घेतला आणि घोट घेत फोन चे मेसेजेस बघायला सुरुवात केली. एका मैत्रिणीचा कशी आहेस हि विचारणा वाचून तिला हि कळवले Mr. Flu अचानक आले आहेत. तिने ताबडतोप हळदी च दुध, आल्याचा चहा, कफ drops, विच्क्स ची वाफ अश्या सुमारे आठ ते दहा उपाय सांगितले.

तितक्यात फोन ची रिंग वाजली, बघितलं तर स्क्रीन वर मधु मावशी चा नंबर दिसला, उचलला, हेलो म्हणतानाच शिंकांची सुरुवात झाली आणि त्यांना ताबडतोप कळल कि सर्दी झाली आहे म्हणून. अग ऐश्वर्या अळशी चा काढा करून पी एकदम रामबाण उपाय आहे , आम्ही तर हेच उपचार करून मोठे झालो, त्या इंग्लीश गोळ्यांनी सगळी सर्दी वाळते. नंतर अळशीचा काढा कसा करायचा, काय खायचं, काय वर्ज्य आहे , काय थंड आणि बाधक असं काय काय सांगितलं काही लक्षात नाही, त्यांना लंचवेळ संपली म्हटल्यावरच त्या थांबल्या, आणि त्यांना लगेचच आठवलं कि त्यांनी फोन कशासाठी केला होता, म्हणाल्या अग शुक्रवारी हळदी कुंकू आहे जरूर ये, त्यांना सांगितले, हो, बर वाटलं तर नक्की येयीनच.

पण आता नक्कीच श्रीमंत फ्लुनी माझ्या शरीरात पाय पसारला होता आणि काही सुचेना असे वाटू लागले, बॉस ला सांगून अर्धा दिवस रजा घेऊन घरी आले तर बघते आमचे हे पण शिंकत कोचावर बसलेले, जणू श्रीमंत फ्लूंनी आमच्या घरात urgent मीटिंग बोलावली होती...

ऐश्वर्या कोकाटे


प्रा. मधुकर तोरडमल माझे बाबा :

Sharmila Vikram Mahurkar


२ जुलै २०१७ सांयकाळी ५:२८ वाजता एका पर्वाचा अंत झाला . प्रा. मधुकर तोरडमल , एक जेष्ट कलावंत , लेखक, दिग्दर्शक , नाट्य - चित्रपट अभिनेते होतेच पण त्याच बरोबर अतिशय शिस्तप्रिय, काटेकोर, कडक पण तितकेच हळवे , प्रेमळ , साधेसुधे आमचे पपा होते . पुढे वाचा : 

विकास म्हणजे....

 लेखिका: सुवर्णा गोखले

अत्यंत सुंदर, विचार करायला लावणारे मनोगत, जरूर वाचा .

फुलोरा :  निरेन आपटे 

वाचले आणि पाहिले

आकाशवाणीवर कथाकथन करण्याची पहिली संधी मला ललित लेखक रवींद्र पिंगे ह्यांनी दिली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,
" मी बिलिमोरिया नावाचं गाव ऐकलं आहे आणि ते गाव पाहावं अशी माझी इच्छा झाली आहे "

पिंगे ह्यांनी अशी अनेक ठिकाणे पहिली आणि त्यावर विपुल लेखन केलं. बिलिमोरिया हे गाव गुजरात मध्ये आहे. पिंगे ह्यांनी सांगितल्यामुळे मलाही ते पाहायचं आहे. तूर्तास, गूगल अर्थवर जाऊन मी ते गाव पाहिलं आहे. प्रत्यक्षात केव्हा तरी पहिनसुद्धा.
पिंगे ह्यांनी नर्मदेवर लिहिलं. नर्मदा परिक्रमेवर इतरांनी लिहिलेले लेख-पुस्तके वाचली. त्यामुळे एकदा नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे.

एखादं गाव किंवा स्थळ वाचावं आणि नंतर ते पाहण्यासाठी जावं याची मजा काही और असते. इथे मी अवर्जून उल्लेख करेन "मृत्युंजय " ह्या शिवाजी सावंत ह्यांच्या कादंबरीचा. ह्या कादंबरीमध्ये कुरुक्षेत्राचं वर्णन आहे. कर्ण युद्धभूमीजवळ एका टेकडीवर उभा राहून युद्धभूमीचं निरीक्षण करतो असं लिहिलं आहे. हे वर्णन वाचून मी सिमल्याला जाताना मध्ये येणाऱ्या कुरुक्षेत्रावर ( हरियाणा ) थांबलो. सावंतांनी वर्णन केलेली सपाट युद्धभूमी तिथे आहेच. शिवाय अर्जुनाला श्रीकृष्णाने जिथे गीता सांगितली असं मानतात त्याच ठिकाणी दोघांचं सुरेख शिल्प आहे. ते पाहून मी ड्रायव्हरला कर्ण उभा राहायचा ती टेकडी शोधू असे सांगितले. मी एक अजब पर्यटक आहे अश्या नजरेने पाहून तो नाईलाजाने टेकडी शोधत निघाला. गावातल्या हरियाणवी बोलणाऱ्या लोकांनी टेकडीचा रस्ता दाखवला.

तिथे मला एक साधू भेटला. तो म्हणाला, कर्ण इथे उभा राहून कुरुक्षेत्र पाहत असे. श्रीकृष्ण सर्वात श्रेष्ठ योद्धा होता असे मानतात. पण आम्ही हरियाणवी लोक मानतो की कर्ण सर्वात श्रेष्ठ योद्धा होता. फक्त त्याचा पक्ष चुकल्याने त्याच्या शौर्याकडे दुर्लक्ष झालं !!
एकूणच, सावंतांच्या नजरेतील कुरुक्षेत्र मी पाहून आलो आहे…. त्यांची " मृत्युंजय" कादंबरी वाचून !!

महर्षी कर्वे आणि त्यांचे पुत्र रं. धो. कर्वे ह्यांच्यावर विविध लेखकांनी केलेलं वर्णन मी वाचलं. त्यात कोकणातल्या मुरुड-हर्णेचा उल्लेख येतो. ते वाचून मी हर्णेचा सागरी किनारा पाहून आलो. त्या किनाऱ्याला महर्षी कर्वे किनारा म्हणतात. कल्याणच्या प्रसिद्ध खिडकी वडाच्या मालकांनी तिथे महर्षी कर्वे ह्यांची चित्ररूपी गॅलरी उभी केली आहे, तीसुद्धा पाहिली. कोकणाचं खुमासदार वर्णन केलं आहे ते पु. ल. देशपांडे ह्यांनी. त्यांच्या अंतू बर्वा कथेमध्ये रत्नागिरीचा उल्लेख आहे. मी रत्नागिरी त्यासाठी पाहिली. शिवाय भाट्याच्या खाडीवर विश्वेश्वराचं मंदिरसुद्धा पाहून आलो ते त्यात अंतू बर्वा ह्यांच्या तोंडी त्याचा उल्लेख आल्यामुळे !! येताना हातखंबा हे ठिकाण पाहायला मिळालं. पु. ल. ह्यांच्या म्हैस कथेमध्ये एस.टी. बस म्हशीला धडक देते असं वर्णन आहे. त्यात हातखंब्याचं नाव येतं.

इथे मला व्यंकटेश माडगूळकरांच्या माणदेशाची खूप आठवण येते. माडगूळकरांनी जागतिक ख्यातीचा चित्रकार वॅन गॉग ह्याचं वर्णन वाचलं आणि त्याचा देश, तो राहत असलेली ठिकाणे, त्यांनी चित्र काढलेली स्थळे पाहून आले. माडगूळकरांनी बहुतेक लिखाण माणदेशातील गावांवर केलं आहे. त्यांची बनगरवाडी, माणदेशी माणसं, वाटा अशी पुस्तके वाचली आणि रेखाचित्रं काढून कथा लिहिल्या. त्यामुळे तो भाग पाहायची इच्छा आहे. आपल्या एका लेखात ते लिहितात - जे.बी. प्रिस्टले गर्दीला कंटाळून एकांतात राहिला गेला. मीसुद्धा तसाच उतारवयात रानावनात एक झोपडी बांधून राहीन. माझ्या रानात तरटी, हिवर, बाभळी, मुरकूटी, तरवड असे बन आहे. माडगूळकरांनी व्यक्त केलेलं हे वन आता असेल की नाही, माहित नाही. पण ते एकदा पाहायचं आहे. ही झाडे कशी दिसतात तेही त्यांनी केलेल्या वर्णनामुळे पाहायचं आहे. माडगूळकरांनी " अरण्यवाचन" नावाचा लेख लिहिला. त्यात झाडे, पक्षी ह्यांचं वर्णन आहे. असं अरण्य एकदा पाहायचं आहे.

लेखक शंकर पाटील ह्यांनी स्वतःच्या गावाचं वर्णन केलं तेही पाहायचं आहे. ज्यांनी श्रीराम लागू-निळू फुले ह्यांचा " पिंजरा " सिनेमा पाहिला त्यांना पाटीलांच्या लेखनाची जादू कळेल. पाटीलांनी हा सिनेमा लिहिताना आपल्याच गावांचं वर्णन केलं असेल का? ती गावे अजून तशीच टिकून असतील का ? पाटीलांचा एक लेख शाळेत अभ्यासाला होता. शीर्षक आठवत नाही, त्यात रानवनाचं वर्णन होतं ते स्पष्ट आठवतं. तिथूनच त्यांनी लिहिलेली ठिकाणी पाहायची इच्छा झाली आहे.

स्थळांचं जसं वर्णन वाचून ते पाहायची इच्छा होते तशी व्यक्तींचं वर्णन वाचून त्यांना भेटायची इच्छा होते. अशीच एक व्यक्ती आहे वाडकर काका ! वाडकर ह्यांनी रायगडावर १००० वेळा स्वारी करण्याची शपथ घेतली आहे. मी अनेक वर्षांपूर्वी हे वाचले होते. अखेरीस एकदा चक्क रायगडावर ते स्वतः भेटले.
तोवर ते रायगड ८८५ वेळा चढले होते !!

मराठी साहित्य ही खरोखर आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे. ते वाचावे आणि आणखी प्रगल्भ व्हावे हे भाग्य आपल्याला मिळालं आहे. जगातील युरोप, अमेरिका, दुबई इत्यादी देश पाहावेत असं स्वप्न अनेकांना पडतं. जमल्यास ती ठिकाणे पाहावीत, पण मराठी साहित्यामधील ठिकाणे वाचून खास ती पाहण्यासाठी जावे.
अशा पर्यटनाची मजाच काही और आहे.
( लेखक : निरेन आपटे )

बिन्डोकडी : 

आज माझी बिन्डोकडी तीन वर्षाची झाली ! माझ्या पायथ्याशी बसलेली हि काली मांजर आता माझं तिसरं मुलंच झालं आहे हे माझ्या लक्षात आले. कुणासठाऊक कां पण जेव्हा ती घरात आली म्हणजे आणली गेली तेव्हा तिचे ऑफिशिअल नाव " डचेस " असे मुलांनी ठेवले होते, पण तिला फारसं काही समजत नाही अशी माझी समज आणि राग असल्यामुळे तिला मी "बिनडोक " असं म्हणायला सुरुवात केली, आणि आज रागाने नाही पण प्रेमाचं ते नाव झालं आहे . 

घरात एक "पेट" असलाच पाहिजे असं माझ्या दोघे हि मुलांचा हट्ट होता. सुरुवातीला त्यांच्या ह्या मागणी ला अजिबात महत्व द्यायचे नाही असे माझे आणि माझ्या पतींचे ठरले. बरेचदा लहान-मोठ्या भूक हडताळी झाल्या, तरी आम्ही मन घट्ट करून लक्ष दिले नाही,  काही वर्ष आणि सरले, पण माझी मोठी मुलगी जेव्हा हायस्कुल ला गेली तेव्हा तर तिने सांगूनच टाकले कि आता दोन वर्षाने मी कॉलेज साठी घरा बाहेर पडणारच आहे तरी तुम्ह्लाला माझी इच्छा पूर्ण करायची नाहीये कां ? असे अनेक भावुक डायलॉग मारण्यात आले. मग एके दिवशी ती म्हणाली तिच्या वर्गमैत्रिणी च्या मांजरी ला "किट्टन" झाल्या आहेत आणि तिला त्यातलं एक मला द्याची इच्छा आहे तर मी आणू कां ? आपण आणून बघूया, फारच त्रास झाला तर परत देऊन टाकूया अशी व्यवस्था केली गेली, आम्ही दोघे मुलंच मांजरी च सर्व करू असं हि वचन दिलं गेलं. 

तर आता हो म्हणन्या पलीकडे दुसरा उपाय नाही असे म्हणत नाईलाजाने / रागाने जेमतेम ट्रायल म्हणून 'बिन्डोकडी " आमच्या घरात आणि जीवनात प्रविष्ट झाली. 

भारतातून माझ्या आईचा फोन आला तेव्हा तिलाही सांगिलतलं असं काळ मांजर पाळलं आहे , जणू तिच्या हातून फोन खाली पडायचाच राहिला अशी ती दचकली आणि रागातच म्हणाली : तुला मिळून हा एकच प्राणी मिळाला कां ? आत्ताच्या आत्ता परत देऊन टाक, माहित नाही असी बुद्धी तुला झालीच कशी.... 

काळी मांजर हे नाव ऐकताक्षणी डोळ्या समोर विचित्र भुताटकी नाचू लागते. काळी मांजर म्हणजे अपशकुन, असच आपण ऐकून असतो. हा प्राणी अपशकुनी आहे असे इतिहास मध्ये कुठे लिहिले आहे हे बघायला अभ्यास सुरु केला, जोडी ला बरेच लोकंच्या पुढे हा प्रश्न मांडला कि कां म्हणून काळी मांजर अप्शुकुनी असते?

त्यातून एक माहिती अशी कि सर्वात पहिले अमेरिकेत हि कथा प्रचलित झाली कि रात्री जादूगरणी [ विच ] काळ्या मांजरीचे रूप धारण करते. दुसरी माहिती अशी कि स्कॉटीश संस्कृती मध्ये काळी मांजर घरात येणे म्हणजे भाग्योदय असतो !

असो, आमची बिन्डोकडी आमच्या घरातली जणू राणीच आहे, तीच जग म्हणजे आम्ही चौघे, आणि आमच्या चार भिंती. इतकी भित्री भागूबाई आहे कि कुणी हि घरात आलं कि पटकन जाऊन लपते, अगदी जवळची मित्र मंडळी नी सुद्धा तीला बघितली नाहीये.

मात्र मला बरं नसलं तर मला चिकटूनच तासनतास बसून राहणारं हे काळ कुळकुळीत गोंडस बाळ अपशकुनी कसं असूशकत हा प्रश्न काही सुटत नाही.

--ऐश्वर्या कोकाटे


विजया मराठे, पमोना कॅलिफोर्निया ह्यांच्या काही सुंदर रचना 
ही कविता मी सध्याच्या निवडणुकीच्या अमेरीकेतील राजकारणावर लिहीली अाहे .
शून्य
फुलपाखराने झेप घ्यावी,असा कोठे सुगंध नाही
मधमाश्यांनी गुंजारावे, असा आता गोडवा नाही
जागृतीचा दिवा पेटवायाला,सावरकरांची वाणी नाही
टिळकांची विव्दत्ता कोणात नाही,गांधींचा त्यागहि नाही
जनतेने जिद्द बाळगावी असे मार्गदर्शन नाही
पावलावर पाऊल ठेवावे असा एकही नेता नाही
अतिरेक्यांचे हल्ले थांबत नाहीत,मानवहानी टळत नाही
योग्य प्रकारे आळा घालणें,अजून कोणालाही जमत नाही
पार्टी आपलीच श्रेष्ठ , हेका कुणी सोडत नाही
एकमेकांचे गुण घेणे त्यांना काही जमत नाही
काळ बदलला आहे,कायदेही बदलणे आवश्यक आहे
सर्वत्र  अंधाधुंदी आहे,फक्त मतांसाठीच चढाओढ आहे
पैसा?,नोकरी?,सुरक्षितता?सगळीच प्रश्नचिन्हे आहेत
शून्यातून अवतरलेले जग आता शून्याकडे जात आहे

स्नेह्ज्योत 

प्रत्येक जण स्वतःचे आयुष्य जगत असतं 
समस्यांना दूर सारून आनंद शोधत असतं 

प्रत्येकाचं आपलं वेगळं व्यक्तिमत्व असतं 
आपले मन आपल्यावर बेहद  खुश  असतं 

काहीजण रंगीत चष्मे लावून येतात 
नसलेल्या दोषांना रंगवून सांगतात 

दुसऱ्यावर टीका करून काय बरे साधतं?
आनंदावर त्यांच्या मात्र विरजण पडतं 

एकमेकांच्या गुणांना आपण पारखावे 
 त्यांच्या आत्मविश्वासाला विस्तारावे  

दुःखी पीडितांना सुखी करावे    
त्यांच्या आनंदात रमून जावे 

ज्योती ज्योतींनी स्नेहभाव वाढवावा 
प्रकाशात त्यांच्या प्रेमभाव उजळावा 

विजया मराठे
पमोना कॅलिफोर्निया

नुकतीच दिवाळी झाली, ह्यॅलोवीन झाले आता थॅंक्सगिविंग अन क्रिसमस नजदिकच आहे. या सर्व सणात दिव्यांचे खूप महत्व आहे . प्रत्येक दिव्याचे रूप वेगळेच असते,. दिवाळीत पणत्यांची लावलेली रांग खूपच आल्हाददायी वाटते.ओळीत लावलेले हे दिवे जणू एकमेकांच्या सहवासात एकत्रिक प्रकाश देत असतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लावलेल्या निरांजनातील वातीचा सौम्य प्रकाश अन समयांचा किंचित पिवळसर मंद प्रकाश नक्कीच मनाला प्रसन्न करतो. हॅलोवीनच्या दिवशी भोपळ्यात लावलेला मिणमिणता दिवा जणू ट्रिक ऑर ट्रिक म्हणत असतो.थॅंक्सगिविंगच्या दिवशी टेबलावर लावलेल्या मेणबत्यांच्या प्रकाशात जेवण उजळून जातं. अन क्रिसमसच्या वेळेला तर काय दिव्यांची खैरातच असते. अमेरिकेच्या झेंड्याची आठवण करून देणारे लाल, हिरवे, निळे दिवे तर एकामागून एक पळणारे पांढरे दिवे,क्वचित धूसर वाटणारे गर्द निळे दिवे, दिव्याची कितीतरी रूपे मनाला निश्चित खुलवतात. मी अमेरिकेत जेव्हा प्रवेश केला तेंव्हा फ्रीवेवरचे दिवे मला उदबत्या आणि मेणबत्या लावल्यासारखे वाटायचे. अन लासवेगासला गेले तेव्हा तो झगमगाट बघून डोळे दिपून गेले.हे सर्व प्रकारचे दिवे आपल्याला आनंद देत असतात. एकमेकांच्या सानिध्यात एकमेकांचं व्यक्तिमत्व उजळून सर्वाना आनंदित करत असतात तसंच आपणही ज्योती ज्योतींनी स्नेहभाव वाढवूया. एकमेकांचं व्यक्तिमत्व विकसित करूया. या कल्पनेवर आधारित हि कविता मी लिहिली आहे.

स्नेह्ज्योत
प्रत्येक जण स्वतःचे आयुष्य जगत असतं
समस्यांना दूर सारून आनंद शोधत असतं

प्रत्येकाचं आपलं वेगळं व्यक्तिमत्व असतं
आपले मन आपल्यावर बेहद खुश असतं

रंगित चष्म्यात जग वेगळ दिसतं
गुणांऐवजी मन दोष बघू लागतं

कशाला उगीचच करता टीका?
आनंदावर विरजण घालता फुका ?

एकमेकांच्या गुणांना आपण पारखावे
त्यांच्या आत्मविश्वासाला विस्तारावे

दुःखी पीडितांना सुखी करावे
त्यांच्या आनंदात रमून जावे

ज्योती ज्योतींनी स्नेहभाव वाढवावा
प्रकाशात त्यांच्या प्रेमभाव उजळावा२०१६-ऑस्कर पारितोषिक वितरण सोहोळा

पांढरा की रंगीबेरंगी?--शशी पानट , लॉस एंजेलिस 

ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स ॲन्ड सायन्स (AMPAS) या संस्थेने १९२७ आणि १९२८ या वर्षी तयार झालेले चित्रपट हिशेबांत घेऊन १६ मे १९२९ या दिवशी पहिला पारितोषिक सोहोळा सुप्रसिद्ध हॉलीवूड रूझवेल्ट या हॉटेलमधे साजरा केला. ह्या सुरुवातीच्या खाजगी समारंभाला फक्त २७० पाहुणे ऊपस्थित होते. तेव्हांपासुन ते आजतागायत ऑस्कर पारितोषिक मिळविणे हे चित्रपट कलावंतांना नोबेल पारितोषिक मिळविण्या इतकेच महत्वाचे, समाधान मिळऊन देणारे व विषेश मानसन्मान मिळऊन देणारे ठरले आहे.


पुढे वाचा 

माझ्या बागेतली फुले मला खूप क़ाही शिकवतात :  

  विजया मराठे
पमोना,कॅलिफोर्नियागुलाबी जाई म्हणते,

मी नाजुक असले तरी सहज कोमेजत नाही
उदार होऊन,मनसक्त फुलून
अंगण भरून सुगंध वाटते

बोगनवेल म्हणते,
दुष्काळातही मी डगमगत नाही
पाण्याशिवाय माझे काही अडत नाही
रंगांची उधळण करणं सोडत नाही.

प्लुमेरिया म्हणते,
कडाक्याची थंडी मी सहन करते
उष्णतेची वाट पाहत राहते
आशावाद कधी सोडत नाही

जिरेनिअम म्हणते
कधी अस्फुट तर कधी चार मजली
हसायचे, बहरायचे सोडत नाही
वर्षभर जमेल तसे बागेला सजवते

बर्ड ऑफ प्याराडाइज म्हणते,
गर्व नाही पण ताठ मानेने मी जगते
पक्षी जणु ,पण भिरभिरत नाही
स्थिर राहून शांतिची प्रेरणा देते

-

एका हिंदी कवितेच मराठी रुपांतर : शशी पानट ,

  लॉस एंजेलिस 


बेटा एडिलेडमें, बेटी है न्युयॉर्क

ब्राईट बच्चो के लिये, हुआ बुढापा डार्क १

बेटा डॉलर मे बंधा, सात समुंदर पार

चिता जलाने बाप की, गए पडौसी चार २    पुढे वाचा 


घर असावे घरासारखे: Shashi Panat Los Angeles

नविन घर बांधायला घेतलं!

आणि नको ते दु:ख वाट्याला आलं!

मला वाटलं किती सोपं आहे घर बांधणं

नकोसं करुन टाकल जीणं वास्तुशास्त्रज्ञानं! ! १

ह्या खोलीचा ॲगल इथे हवा

इकडे तोंड केलं तर येईल छान हवा

वास्तुशास्त्रानुसार इथे बेडरूम बसते

सर्व साधारणपणे किचन इथेच असते! २

आणि हो परसदाराशी लाव छान वृक्ष

निसर्गही नांदेल मग तुझ्या दारी प्रत्यक्ष

आणि बागेत फुलांचे वेल, ते तर हवेच रे

रंग ऊधळतील, तुझ्या आनंदासाठी सारे! ३

एव्हढ्या मोठ्या घरांत, राहिलो नाही रे कधी

छोट्याशा खोलीत हयात गेली माझी

मी म्हणालो गड्या, सुख मिळेल ना मला तिथे?

की मोठ्या घराचे असतील तेव्हढेच पोकळ वासे? ४

आमच्या त्या खुराड्याला नव्हते कुठलेही वास्तुशास्त्र?

प्रेम, आपुलकी नि जिव्हाळा नव्हता कमी मात्र

ह्या मोठ्ठ्या घरांत, सांग तरी ते येतील कसे?

सुखाच्या आमंत्रणासाठी कुठे शोधु रे ठसे? ५

वास्तुशास्त्र थोडं थांबलं, बहुदा विचारांत पडलं

थोड्या वेळानं घसा खाकरुन आदबीनं म्हणालं

"तु म्हणतोय त्यांत तथ्य आहे, नाही असं नाही"

सुख हे मानण्यावर आहे, नि जगांत ते कमी नाही" ६

"खोलीचं तोंड कुठे कां असेना? काय फरक पडतो?

माणसाचं तोंड माणसाकडेच पाहिजे, हाच न्याय असतो!

सुखाचे नि दु:खाचे स्वागत एकदमच करायचे असते

दुस-याचे दु:ख हे स्वत:चेच मानायचे असते! " ७

"अरे, पण आजकाल असं बघायला मिळतय तरी कुठं?

म्हणुन तर फावतं आमच्या ह्या वास्तुशास्त्राचं!

माणुस विसरत चाललाय प्रेम जिव्हाळा अन आपुलकी

नात्यानात्यांत बांधल्या आहेत त्यांनीच ऊंच भिंती! ८

घर असावे घरासारखे

शशिकांत पानट

shashi@panat.orgतुकाराम काकांचा इशारा
निरेन आपटे 
ही २००५ सालची गोष्ट आहे. मी लोकल ट्रेनची वाट पाहत रेल्वे स्टेशनवर उभा होतो. तेव्हड्यात साधारण साठ वय असलेले तुकाराम काका रेल्वे रूळ ओलांडून पटकन प्लाटफॉर्मवर उडी मारून आले आणि लोकल येताच डब्यात शिरलेसुध्दा. त्यांचा बांधा ताठ होता. अनेक वर्ष बांधकाम खात्यात काम केल्यामुळे अंगातला जोर कायम होता.  पुढे वाचा 

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचाल:  विजय देवधर

पुण्यातील हिंगणे या ठिकाणी असलेल्या , ' हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेने १४ जून २०२० ला शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था .

ऐन कोरोना काळातील मुशाफिरी :   सौ.ऊज्वला विजय कुलकर्णी, नाशिक 
हा तोच काळ होता ... HOWDY MODI नंतर  नमस्ते TRUMP अतर्गत सुमारे लाखभर मारवाडी लोकांना अमेरिकेत या न मला निवडुन द्या हे सांगुन तात्या स.कु.स.प.(सह कुुुंटुंब सह परिवार)  White House परतले होते.
भारतीय मिडिया ईवांका न मेलेनिया च्या बावनकशी सौंदर्य आणि  अफाट संपत्तीचे जगाला कौतुक सांगण्यात व्यस्त... मोदी साहेब पुढच्या विदेश दौर्याचा मसुदा जाणून घेत होते.
1दिवस 24 तासांचाच होता...
सारे जग आपापल्या विवंचनेत होते. चीन मात्र आपल्या च राक्षस (dragon) शी दोन हात करत होता...त्याच दरम्यान अमेरिकेन पोस्टने दावा केला की एक प्रकारच्या विषाणूंमुळे चीनमध्ये  म्रृत्यु तांडव सुरू झालंय... चीन सुप्रिम कोर्टात ,चीन सरकारने 30000 संसर्गीत माणसांना मारण्याची परवानगी मागितली आहे... त्यावेळी ही बातमी सार्या जगाने अफवा मानली व तो चीनचा अंतर्गत विषय ... आपल्याला काय फरक पडतोय असा घेतला ..न ही गाफील व्रुत्ती  आज सगळ्या जगाला  फारच महागात पडलीय...
नेमके यांचं दरम्यान मी(64) व माझे मिस्टर(69)( अहो) (रिटायर्ड असीस्टंट चीफ इंजिनियर- सिंचन विभाग) आम्हाला पुर्वनियोजित परदेश गमनाचा हा एक छान अनुभव आला आहे.तो शब्द चित्रीत करण्याचा प्रयत्न  केला आहे.

निर्णय : ऐश्वर्या 

आपट्यांकडे  दिवाळी च्या पार्टी ला जायचे होते. त्यांची पार्टी म्हणजे १०-१५ लोकं. १६ व्या व्यक्ती ला आमंत्रण द्यायच्या आधी १६ वेळा विचार करून शेवटी नको रे बाबा .... उगाच करंजी चकली लाडू सुद्धा जास्ती करावे लागतील आणि अर्थातच खर्चाला खर्च नकोत असं सांगत जोशी आपटे  गप्प बसायच्या.

पुढे वाचा : 

स्पर्श : ऐश्वर्या 

मेघाला कॉलेजमधुन निघायला खुपच उशीर झाला होता. येत्या वार्षिक समारंभामध्ये ती सूत्रधार म्हणून निवडली गेली होती. कॉलेज च्या बाहेर येऊन ती रिक्षाची वाट बघत होती. कुणी रिक्षावाला थांबतच नव्हता, अंधारहि व्हायला लागला होता. आता काय करू? असा प्रश्न तिला पडला आणि तिनं पर्स मधून फोन काढला, निदान घरी कळवते आणि तिचा भाऊ समीर घरी आला असल्यास त्याला बाईक वरून मला न्यायला ये असं सांगते....तर फोन “डेड” झाला होता, सकाळ पासून चार्ज केलाच नव्हता. पुढे वाचा:

फेसबुक महिमा: ऐश्वर्या 

फेसबुक खरच हानिकारक आहे कां?

कालच जोशी काकांचा इमेल आला, त्यांनी फेसबुक वरून आपलं नाव काढून घेतलं आहे, त्यांना मी कारण विचारलं, तर त्यांनी सांगितलं कि भारतात अनेक मराठी वृत्तपत्रात लेख छापून आले आहेत कि हि लोकं आपली माहिती विभिन्न व्यवसायांना जाहिराती साठी पुरवतात,पुढे वाचा :

खातेस कि खाऊ?: ऐश्वर्या 

असं आमच्या कॉलनीतल्या एक मावशी आपल्या मुलींना विचारायच्या. अर्थातच वाढलेलं जेवण संपवा हा हेतू असायचा, आणि जर का त्यांच्या मुलींनी संपवलं नाही, तर त्या हे जेवण संपवायच्या आणि .....पुढे काय होत असेल ते इथे सांगायची गरज नाही, त्या मावशी बऱ्या पैकी "खात्या-पित्या घरच्या" असत.
मी देखील " खायच्या आधी खायचं " "खाताना खायचं" आणि "खाल्यानंतर खायचं" अश्याच काही वातावरणातून आलेली आहे.
जवळचे मित्र-मैत्रिणी सोबत पण बौद्धिक-कला इत्यादी विषयांवर बोलुन झालं कि विषय कधी खाण्यावर वळतो हे कळतच नाही.
पण आता विडंबना अशी कि माझी मुलं अजिबात ह्या पंथाची नाही ! माझी मुलगी तर मला सांगते कि अधिकांश लोकं जितकं दिवस भरात खात असतात त्यातील अर्धाच भाग तुम्हाला तुमच्या शरीरासाठी आवश्यक असतो ....असं माझी पोटची मुलगी म्हणते म्हणजे मला कसं होत असेल ह्याची तुम्ही कल्पना तरी करू शकाल का ? एवढच काय तर ती कॉलेज च्या सुट्टीत घरी आली कि आम्हाला तर सोडाच पण आमच्या गोजिरवाणी मांजरीच्या खाण्यावर पण संचारबंदी लावते.

मला एका समारंभात अभिनेत्री राजेश्री ताई ह्या भेटल्या, सत्तरीच्या पुढे असुन सुद्धा इतका सुंदर बांधा, सुंदर त्वचा बघुन मी त्यांना चक्क विचारलं: ताई तुम्ही ह्याचा साठी काय करता? तर त्यांनी मला एक सुंदर उत्तर दिलं : अग मी सगळं खाते पण अर्धच खाते ......ह्या एका संक्षिप्त उत्तरात त्या बरच काही सांगून गेल्या होत्या.
आपण जेवायची वेळ झाली कि खातो, पार्टी असली कि खातो, सणवार असला कि मेजवानी, थ्री कोर्स पद्धतीच जेवण म्हणजे तर विचारायलाच नको!
कधी कधी मात्र मी विचार करते कि खरच कि काय आपण असं करत असतो ? मग लहानपणीची हि जेवायच्या आधी म्हणायची प्रार्थना आठवते "अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म"!
हा गुरुमंत्र तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिला आहे, आणि हि प्रार्थना म्हणत आपण मोठे झालेलो आहे, मग आपण कुठे चुकतो? अशी खंत हि वाटायला लागते, पण माझी मुलं आता हि प्रार्थना दररोज न म्हणता पण ह्यावर अमल करून दाखवत आहे ह्याचा मात्र अभिमान वाटतो.
-ऐश्वर्या कोकाटे

हिशोब: ऐश्वर्या 

माझी मैत्रीण दीपा हीच लग्न आमच्या ग्रुप मध्ये सर्वात पहिल्यांदा झालं. पहिली दिवाळी साजरी करायला  तिच्या सासरची सगळी मंडळी इंदूरला जमली. दीपाच्या सासुला, ती दुसऱ्या गावाची असूनहि इंदोर च्या खाद्य संस्कृती बद्दल माहिती होती, आणि तिला सराफा, छप्पन दुकान इत्यादी ठिकाणी सैर-सपाटा करायचा होता, जोडीला दिवाळी ची खरेदी पण करायची होती. दीपाने मला त्यांच्या बरोबर यायला सांगितले, मी, दीपा, आणि तिची सासु खरेदी आणि खाण्यासाठी गावात गेलो. विजय चाट ची कचोरी, जोश्यांचे दहीबडे खाऊन आम्ही इतर खरेदी करायला गेलो.

एक गोष्ट लक्षात आली कि जे पैसे तिची सासु खर्च करत होती , ते ती एक छोट्या डायरीत लिहीत जायची. मला ही गोष्ट थोडी विचित्रच वाटली, दीपा ला सरळ  विचारावं असं वाटलं, पण सासु समोर कसं विचारायचं? म्हणून तो विचार झटकून टाकला.

मनात बरेच विचार येऊ जाऊ लागले आणि दीपा ची काळजी पण वाटू लागली, हे कसलं सासर मिळालं आहे .....दमडी दमडी चा हिशोब लिहीत बसतात.

आडव्या बाजारात बांगडया खरेदी करताना एका दुकानात बसलो होतो, तेव्हा दीपाच्या पूर्वीच्या कामावरची मैत्रिण भेटली आणि दीपा तिच्या बरोबर गप्पा मारायला दुकानाच्या बाहेर गेली. 

आता मी आणि तिची सासु निरनिराळ्या सुंदर बांगड्या घालुन बघत होतो. 

तिच्या सासुने एक सेट विकत घेतला , पैसे दिले आणि , परत तेच ! ती डायरी काढून 

त्यात लिहिले. आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोंचलेली त्यांच्या लक्षात आली आणि त्या म्हणाल्या : अग आमचे हे  आहेत नं , त्यांना पै पै चा 

हिशोब द्यावा लागतो, नाही तर  ते रागवतात. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कुठलाच 

भाव नव्हता. दुसऱ्या दिवशी दीपा ने आम्हा सगळ्या मैत्रिणींना दिवाळीच्या 

फराळाला  बोलावलं होतं. आम्ही सगळ्यानीं  एकत्रच तिच्याकडे जायचं ठरवलं. बेल 

वाजवली तर दार  तिच्या सासऱ्यांनी उघडलं, त्यांनी स्वतःची ओळख  करुन दिली, आम्हाला बसायला सांगितलं आणि दीपा ला हाक मारली. 

सोफ्यावर बसायला गेले तर तिकडे मावशींचीं [दीपाच्या सासुची] डायरी दिसली 

मी पटकन ती ओळखून उचलली आणि काकांच्या हातात दिली, ती घेताच त्यांचा चेहऱ्यावर मिस्कील भाव उमटले  आणि ते म्हणाले : ही डायरी आमच्या लक्ष्मीची जीव कि प्राण आहे, एक पै पै चा हिशोब लिहीत बसतात ते.....

मी थक्कच झाले! मला त्या दोघांच्यातला हिशोबच कळेनासा झाला . 

पण मग वाटायला लागलं की दोघेही कमालीचे हिशोबी असावेत, फक्त हा “पै पै”च्या हिशोबाचा अट्टाहास ते एकमेकांवर ढकलत तर नसतील? आणि मग मला माझ्या मैत्रिणीची जास्तच काळजी वाटू लागली! तेव्हढ्यात तिच्या सासऱ्यांचा मिस्कील चेहरा आठवला, आणि आशा वाटली की केवळ एक चांगली सवय म्हणून ते सासूबाईंकडून हिशोब मागत असावेत.

ऐश्वर्या कोकाटे


दिवाळी...अज्ञान ते विज्ञान: निरेन आपटे, भारत 

 दिवाळी हा सण तेजाची पूजा करतो. सर्वात तेजस्वी आहे सूर्य. पण एकेकाळी हा सुर्य "अज्ञानात" सापडला होता. पश्चिमी पौराणिक ग्रंथानुसार सूर्य पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असे. म्हणजे पृथ्वी स्थिर होती आणि सूर्य तिच्याभोवती प्रदक्षिणा घालत असे., काही महाराजे सांगत की माझं दर्शन घेण्यासाठी सूर्य रोज येतो आणि सायंकाळी निघून जातो. लोकही तेच खर मानत. साक्षात आपल्या भोवती सूर्य प्रदक्षिणा घालतो ह्याचा महाराजाला आनंद होत असे. पण 1633 साली ग्यालेलिओने त्याच्या पुस्तकात लिहिलं की सूर्य स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात., ग्यालेलिओने हे सत्य सांगितल्यावर पुरातनमतवादी हादरले. प्राचीन ग्रंथ खोटं सांगत नाहीत, ग्यालेलिओ खोटं सांगतो असा निकाल त्यांनी दिला आणि ग्यालेलिओच्या लेखनावर बंदी आणून त्याला नजरकैदेत टाकलं. त्याला गुन्हेगार ठरवून मरेपर्यंत नजरकैदेत ठेवलं होतं. ग्यालेलिओ न्यायधिशांना म्हणाला-, "सूर्य माझं पुस्तक वाचणार नाही. तुमचा निकाल सूर्याला कळत नाही. माझ्या पुस्तकावर बंदी आणली तरी तो स्थिर राहणार आणि पृथ्वी त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत राहणार!!...", शेवटी ग्यालेलिओ खरा ठरला. विज्ञानाने सिद्ध केलं की पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. राजा-महाराजांचा अहंकार फोल ठरला. विज्ञानाने अज्ञान दूर केलं आणि सूर्याला लागलेलं ग्रहण कायमच सुटलं., आम्ही दिवाळी साजरी करतो, दीप पूजन करून...रोशणाई करून!, पण अंधार पूर्ण संपलेला नाही. अज्ञानवाद आजही बलवान आहे. त्याने फक्त ग्यालेलिओला नजरकैदेत ठेवलं नाही तर विज्ञानाला आजही जखडून ठेवलं आहे. पण सूर्य झाकून ठेवता येत नाही. पृथ्वी त्याच्याकडे तोंड करते, तेव्हा त्याचा प्रकाश कोणीही अडवू शकत नाही. त्याचा प्रकाश अडवायचा एकच उपाय आहे. आपले डोळे बंद करून घेणे. आपले डोळे बंद केल्यानी नुकसान सूर्याच नाही, आपलंच होतं. डोळे बंद करणे हा अज्ञानवाद आहे. वाळवंटात काही पक्षी असतात- आपल्याला खाणारा दुसरा प्राणी समोर दिसला की ते सरळ डोळे झाकून घेतात. त्यांना वाटत असं केल्यामुळे आपण वाचू. आपणही असे डोळे झाकणार का? डोळे झाकून घेणे हा उपाय नाही. उलट जुने विचार झटकून नवे विचार स्वीकारणे आपल्या हिताचे आहे. ह्या सृष्टीत फक्त एक गोष्ट बदलत नाही. ती म्हणजे रोज नवा बदल होणे. विज्ञान ह्या बदलासोबत चालतं. वास्तव स्वीकारत. नवता समजून घेत. जुनी मापदंड वापरत नाही. म्हणून तुम्ही जर बुवा-महाराजांना १०० प्रश्न विचारले तर ते त्याची २०० उत्तरे देतील. पण scientist ला १०० प्रश्न विचारले तर तो फक्त ३ प्रश्नांना उत्तर देईल आणि सांगेल उरलेल्या ९७ प्रश्नांची उत्तरे आम्हाला माहित नाहीत. इतकंच काय सापडलेली ३ उत्तरे सुध्धा भावी काळात खोटी ठरू शकतात, असं स्पष्ट कबुली ते देतील., आज mobile पासून kidney बदलण्यापर्यंत जे चमत्कार झाले ते विज्ञानामुळे. आर्यभट्ट ते edison, Plato ते Aristotle, newton ते कल्पना चावालापर्यंत एक एक पणती पेटत राहिली आणि जग अंधाराकडून प्रकाशाकडे आलं. आम्ही आज कंदील लावतो, रोषणाई करतो ती विज्ञानामुळे!, कृष्णाने कर्मवाद सांगितला- विज्ञान त्या वाटेवर चालत राहील., आम्ही शिवबाच्या भूमीत राहतो. शिवबा कर्मवादी होता. सागरी आरमार उभारून त्यांनी त्याकाळी marine science ची रुजवात केली होती. शिवबाने हातावरच्या रेषा पहिल्या नाहीत. मनगट पाहिलं. पिचलेल्या, अर्धपोटी, दरिद्री, धस्तावलेल्या मनगटात जोर भरला आणि कर्मावादाच्या आधारे स्वराज्य निर्माण केलं. गनिमी कावा हा युद्धाचा नवा प्रकार शोधला. आता war science पर्यंत जग आलं. शिवबाने ते कधीच सुरु केल होतं., हिरोजी इंदुलकर ह्यांनी शिवाजी महाराजांसाठी केलेलं बांधकाम आजच्या सिल्व्हील इंजिनिअरसाठी एक आदर्श आहे. सिंधुदुर्ग किल्ला उनपाऊस आणि लाटांचा मारा खाऊन अजून टिकून आहे तो हिरोजींच्या बांधकाम शास्त्रामुळे. रायगडसुद्धा त्याच उदाहरण आहे. हिरोजींचं बांधकाम पाहून शिवरायांनी हिरोजींना रायगडावर एका पायरीवर नाव कोरायला सांगितले. हिरोजीनी तिथे लिहिले, "सेवेठायी तत्पर हिरोजी इंदुलकर", हा शिलालेख आजही पाहता येतो., विमानाचा शोध लावण्याचा पहिला प्रयत्न इथे झाला. एका इंग्रज अधिकार्याने लिहील की एका खेडेगावात एक माणूस नाकाचा कापलेला शेंडा शिवताना मी पहिला तेव्हा थक्क झालो. सुश्रुताने ६ व्या शतकात जाबमुखी वापरून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली होती. "सुश्रुत संहिता" मध्ये आजारपण, वनस्पतींचा उपयोग आणि शस्त्रक्रिया ह्याची चर्चा केली आहे. ज्याला आज प्लास्टिक सर्जरी म्हणतात त्याचा पहिला प्रयत्न ह्या संहितेमधून दिसून येतो. ५ व्या शतकात पाणिनीने केलेलं कार्य इंग्रजांनी वाखाणल. आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला आणि पुढे चंद्र-ताऱ्यांचा अंतर मोजणं शक्य झालं., आमचा इतिहास सांगतो की विज्ञानाचा जन्म प्राचीन काळात झालाय....असं विज्ञान जे अंधकार दूर करतं. जर दिवाळी खरोखर साजरी करायची तर साजरा करायला पाहिजे- विज्ञानवाद!!...., डॉक्टर दाभोलकर म्हणाले होते- विजय शेवटी विज्ञानाचाच होणार आहे!! 

मला वजन कमी करायचय


बघुन स्वत:ला आरश्यात

हरवले मी माझ्याच वनात ...

मनात घट्ट केला विचार

आता मी वजन कमी करणार ...


थोडं वजन चिंतांच, थोडं क्लेशाच

आता मी कमी करणार ...


थोडं मनातल्या गुंतांच

थोडं द्वेषाच बोचकं

आता मी रिकामी करणार ...


थोडं आपल्यासाठी आणि थोडं आपल्यांसाठी

धावायला मी सुरु करणार

आता मी वजन कमी करणार.....


प्रेमाच प्रोटीन आणि मदतीचं विटामिन

आता मी दररोज घेणार  ....

आता मी वजन कमीच करणार

ऐश्वर्या


काय करावे-!'

तुझ्यावर शेर लिहिला तर
चारोळीसारखी फुलून येतेस ..

तुझ्यावर चारोळी लिहिली तर
गझलेसारखी खुलून दिसतेस ..

तुझ्यावर गझल लिहिली तर
लावणीसारखी ठुमकत येतेस ..

तुझ्यावर लावणी लिहिली तर
कवितेसारखी उधळत जातेस ..

काही लिहू नये म्हटले तर
शब्दांसारखीच रुसत बसतेस . . !
.
............ विजयकुमार देशपांडे


लेखिका : शैलजा माटे, लॉस एंजेलिस 

महाराष्ट्र वासिनी देवी

नमस्कार माहेरवाशिणींनो! आज संक्रांतीनिमित्त होणाऱ्या हळदीकुंकवाला आपण बहुसंख्येने जमला आहात म्हणून खूप आनंद वाटतो   वाचा 

कम-कम 

मजेशीर अनुभव : लालन प्रभू 

आमचं लहानपण खुप छान आणि वेगळंच होतं..आमच्या वेळी दुरदर्शन तर दूर दूर पर्यंत माहित नव्हताच.आमच्या घरी रेडिओ पण नव्हताच.तसा सधन लोकांकडे रेडिओ आला होता.मी मॅट्रीक पास झाले त्यावर्षी आमच्या घरी रेडिओ आला.फोन फक्त सिनेमातच बघायला मिळायचा.व्रुत्तपत्रातल्या बातम्या हाच काय तो बाह्य जगाशी दुवा.मराठीतुनच मुलांना शिक्षण देणं योग्य समजलं जायचं.

मी पाचवीच्या वर्गात शिकत होते त्या वेळी इंग्रजी विषय शिकायची सुरवात झाली होती.कम,गो,यस्,नो,सीट डाऊन इतकं इंग्रजी मी शिकले होते.नवी भाषा शिकताना होणारी गंमत सूरु झाली होती.
अशावेळीच भारतात येण्यार्या हिप्पींची संख्या वाढली होती.आमच्या गावात पण हे गोरे लोक येत होते.हे सगळं आम्हाला खूपच नवीन होतं.उत्सुकता शिगेला पोचली होती.आमच्या पेक्षा इतके वेगळे लोक बघुन त्यांच्याशी आपण बोललंच पाहिजे असं मला वाटलं.मी म्हटलं कम कम आणि पडत्या फळाची आज्ञा व्हावी तशी पटकन दोन हिप्पी महिला ज्या एका घराच्या कठड्यावर बसल्या होत्या त्या उठल्या आणि माझ्याबरोबर यायला तयार झाल्या.एरव्ही कधीही आमच्या शब्दाला एवढा मान कोणीही द्यायचा नाही.मी पुढे आणि माझ्या मागे ह्या दोन हिप्पी महिला बिनधास्त बिनदिक्कत चालत आमच्या घरी आल्या.घरात घुसल्याच.आमचं चाळीतलं चंद्रमौळी घर.तेवढ्यात बाजारात गेलेल्या आई आणि ताई पण घरी पोचल्या होत्या.
आईला काही कळेना.तीला वाटलं आपल्या मुलीला फुस लावून ह्या परकीय गुप्तहेर आमच्या घरात घुसल्या आहेत.
तोपर्यंत घरातील प्रत्येक वस्तू दाखवून त्याला आमच्या भाषेत काय म्हणतात ते त्या मला विचारत होत्या.आई आणखीनच घाबरल्यासारखी झाली.ताईचं इंग्रजी माझ्यापेक्षा थोडसं जास्त चांगले होते.तीने बरेच शब्द त्याना सांगितले.तेवढ्यात आमच्या चाळीतल्या ईतर बिरहाडाना ही बातमी कळली आणि सगळे लोक आमच्या घरी जमले.मला येत होती तेवढ्या इंग्रजीतून मला कळलं की त्यातली एकटी जर्मन आणि दुसरी इंग्रज होती.चाळीतले लोक ताईला प्रश्न विचारायचे आणि त्यांना भाषांतर करून विचारायाला लावायचे. बरीच माहिती विचाविचारायची होती पण तीतकं ईंग्रजी कुणालाच येत नव्हतं.सगळ्यांनी मिळून चल चल चल मेरे साथी ओ मेरे हाथी गाण्यावर न्रुत्यही केलं.संध्याकाळ झाली तरी त्या काही हलेनात.आई चांगलीच घाबरली.तीने त्याना परत जायला सांग असा तगादा लावला.त्याना न दुखावता जा म्हणून सांगण्या ईतकं इंग्रजी कुणालाच येत नव्हतं.
आईनी रात्रीचा स्वयंपाक करायला घेतला.तीला वाटलं की जेवण करून झालं की निघतील ह्या दोघी.जेवणं झाली तरी त्या काही हलेनात.त्यानी एक लांब पिशवी काढली आणि त्यात घुसुन त्या निजल्या.आमची आई ईतकी ईतकी घाबरली की ती झोपायालाच तयार नाही.तीला सारखं वाटत होतं की त्यांच्या कडे पिस्तुल असणार आणि त्या आम्हाला गाफील क्षणी मारणार.आमच्याकडे त्यांच्या ऊपयोगाचं खरतर काहीही नव्हतं.
आई रात्रभर झोपली नाही.सकाळी आमच्या घरात असलेलं सगळं पाणी वापरुन त्यानी अंग धुऊन घेतलं आणि मग धन्यवाद देऊन आमचं घर सोडलं.माझे वडील गावी गेले होते.त्यांच्या गैरहजरीत इतका मोठा गोंधळ आमच्या घरात माझ्यामुळे झाला होता.शिक्षा तर मिळालीच पण त्यानंतर कधीही कूणालाही कम कम म्हणायचं धाडसच झालं नाही.
आता नातवंडाना ही गोष्ट सांगताना मात्र गंमत वाटते.

सुख आणि दुःख-नवीन वर्षाचे नवीन विचार : श्रीनिवास माटे, लॉस एंजेलिस 

श्याम ची आई  स्मृतिशताब्दी : हेरंब कुलकर्णी 


साने गुरुजींची प्रसिद्ध आई २ नोव्हेंबर १९१७ रोजी मृत्यू पावली.तिची स्मृतिशताब्दी २ नोव्हेंबर ला सुरू झाली त्यानिमित्ताने सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत हेरंब कुलकर्णी यांचा प्रसिद्ध झालेला लेख( कृपया share करा)                                                      ----------------------------------------------
              श्यामच्या आईचे आज काय  करायचं.......?
       यशोदा सदाशिव साने !!! मृत्यू २ नोव्हेंबर १९१७
            श्यामची आई’ नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो  आहे.
   ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती ,
     एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती
 किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.
.            कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे.             गुरुजींची आई  . कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा सासू सासरे मुले आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीच स्थान काय म्हणून कायम आहे ?
                   वसंत बापट यांनी गुरुजींच्या एका नातेवाइकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की कशी होती हो गुरुजीची आई? तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाले की अहो काही विशेष नव्हती. चार चौघीसारखी दिसायची.काही वेगळी नव्हती.यावर वसंत बापट लिहितात की सामान्य असण्यातील हेच तिचे असामान्यत्व आहे.
                 मला ‘शिक्षण विषयाच्या या लेखमालेत म्हणून गुरुजींच्या आईवर का लिहावेसे वाटते ? महात्मा गांधी म्हणत की ‘ आई हे मुलाचे पहिले विद्यापीठ आहे’ .या वाक्याच्या प्रकाशात गुरुजींची आई हीच एक शाळा आहे.शाळेत मूल असते ६ तास आणि उरलेले १८ तास घरात असते.त्याच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. सुरवातीची महत्वाची वर्षे या आईच्या विद्यापीठातच तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते याचे मूल्यमापन करताना आई नावाच्या शाळेत मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे ? हे या स्मृती शताब्दीच्या प्रकाशात आपण विचार करू या
                त्यासाठी अगोदर श्यामची आईची वैशिष्ठ्ये कोणती ? ती महाराष्ट्राला एवढी का भावली ? हे लक्षात घ्यायला हवे. ‘श्यामची आई’ कोणतेच तत्वज्ञान सांगत नाही. ती एक सोशीक भारतीय महिला आहे. अविरत कष्ट आणि पुरुषप्रधान व्यवस्था ज्याप्रकारे कुटुंबात स्त्रीला दुय्यम स्थान देतो तेच स्थान तिचे आहे.त्यामुळे ती स्वातंत्र्यवादी म्हणून आजच्या नव्या पिढीच्या महिलांना आदर्श वाटणार नाही पण तिचे ते समर्पण केवळ गुलामी म्हणून बघता येणार नाही. ती हलाखीच्या दारिद्रयात अत्यंत स्वाभिमानी आहे.स्वत:च्या वडिलांना ही ती दरिद्रयात आम्ही आमचे बघून घेवू हे सुनावते.सावकाराचा माणूस घरावर जप्ती आणू शकतो हे माहीत असूनही त्याने स्त्री म्हणून तिच्यावर शेरेबाजी करताच ती नागिणीसारखी परिणामाची पर्वा न करता त्याच्या अंगावर धावून जाते.हा तिचा दारिद्रयातला स्वाभिमान थक्क करून टाकतो.श्यामने कुठेतरी जेवायला गेल्यावर दक्षिणा आणल्यावर ती त्या गरिबीत ही ते पैसे मंदिरात नेवून द्यायला सांगते. गरिबीतल्या तिच्या या मूल्यसंस्काराचे भान महत्वाचे आहे.     ती स्वत: मुलांना आदर्श तिच्या समर्पणातून घालून देते.
              मला स्वत:ला गुरुजींची आई एक शिक्षिका म्हणून खूप भावते.कुटुंबव्यवस्थेत ठरवले तर किती प्रकारचे अनुभव दिले जाऊ शकतात ? छोट्या छोट्या प्रसंगातून ती जाणिवा विकसित करते. यासाठी मला ती भावते.ती पर्यावरण,जातीयतविरोध,गरिबांविषयी कणव,समर्पण हे सारं सारं ती शिकवते.श्यामने मुक्या कळ्या खुडल्यावर किंवा झाडाची जास्त पाने तोडली तरी ती आई त्याला पर्यावरणाची,झाडाच्या भावनांची जाणीव करून देते.आपला मुलगा भित्रा बनू नये म्हणून ती सक्तीने त्याला पोहायला पाठवते. दलित म्हातारी मोळी उचलू शकत नाही म्हणून त्या बुरसटलेल्या काळात श्यामला दलित म्हातारीला स्पर्श करायला लावते. या सर्व गोष्टीतून ती जे संस्कार त्याच्यावर करते ते त्या काळाच्या कितीतरी पुढचे आहेत.
           सोप्या सोप्या प्रसंगातून ती जे तत्वज्ञान सांगते ते किती विलक्षण आहे. श्याम डोक्यावरचे केस वाढवतो.वडील रागावतात.तेव्हा श्याम वैतागून म्हणतो “आई केसात कसला गं आलाय धर्म’ तेव्हा ती म्हणते तुला केस राखायचा मोह झाला ना. मग मोह टाळणे म्हणजे धर्म’ इतकी सोपी धर्माची व्याख्या क्वचितच सांगितली असेल. किंवा लाडघरच्या समुद्रात ती समुद्राला पैसे वाहते. तेव्हा श्याम म्हणतो की ज्याच्या पोटात रत्न आहेत त्याला पैसे कशाला? तेव्हा ती म्हणते की सूर्याला ही आपण काडवातींनी ओवाळतोच ना ? प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे.
             मला तिचे मुलाला केवळ उपदेश न करता ती हे संवादी राहणे विलक्षण हलवून टाकते. मूल जे विचारील त्याला ती प्रतिसाद देते आणि तिच्या समजुतीनुसार ती समजून सांगत राहते.आजच्या नव्या पिढीच्या मातांसाठी श्यामची आई मला म्हणूनच महत्वाची वाटते.आज एकतर मुलांशी बोललेच जात नाही व जे बोलले जाते ते मुलाच्या करियर च्या भाषेत आणि मुलाला त्याचे दोष सतत सांगत.पण श्यामने इतक्या गंभीर चुका करून ही ती सतत करुणेने ओथंबली आहे. आज हा संवाद आणि मुलांशी त्याच्या पातळीवर जाऊन व्यक्त करणेच कमी झाले आहे. असलाच तर ‘श्यामच्या आई’ चा हा धागा महत्वाचा आहे.
             अभावातले आनंद आणि समर्पणातला आनंद ती मुलांना शिकवते. स्वत:ला सणाच्या दिवशी साड्या नसताना स्वत:ला आलेल्या भाऊबीजेतून ती पतीचे फाटके धोतर बघून नवे धोतर आणवते. मुलांना त्यातून एकमेकांसाठी काय करायचे असते याचे भान येते.
            आजच्या पिढीच्या मातांसाठी श्यामच्या आईचे आज औचित्य काय आहे ?अनेकजण असे म्हणतील की आज काळ बदलला आहे.आजचे प्रश्न वेगळे आहेत.मुले आता काही श्याम इतकी भाबडी राहिली नाहीत.मोबाइल आणि संगणक वापरत ही पिढी खूप पुढे गेली आहे. हे जरी खरे असले तरी मुलांमधील बालपण जागवायला मुलांना संवेदनशील आणि सामाजिक बनवायला श्यामच्या आईचीच पद्धती वापरावी लागेल.
        आज मध्यमवर्ग /उच्च मध्यमवर्गात मुलांवर सुखाचा मारा होतो.त्यातून त्याच्या संवेदना तरल राहत नाहीत. अभाव वाटयाला न आल्याने गरीबी वंचितता याची वेदना कळत नाही किंवा आजूबाजूचे जग हे ही सुखवस्तू असल्याने या गरीबांच्या जगण्याचा परिघच परिचित होत नाही. पुन्हा वाचन संगीत निसर्ग असे अनुभव बहुतेक घरात न दिल्याने मुले टीव्ही मोबाइल कार्टून दंगामस्ती असले स्वस्त आनंदाचे मार्ग शोधतात व त्यातून त्यांची विचारशक्ती व संवेदनाच विकसित होत नाही.
           आपली मुले एकमेकात ज्या गप्पा मारतात.वेगाने आत्मकेंद्रित होत आहेत.समाजातील वंचितांविषयीची वेदना त्यांना हलवत नाही. डिस्कवरी वृत्तवाहिनीवर वाघ हरणाचा पाठलाग करीत असतो.हरिण जिवाच्या आकांताने पळत असते. ज्या क्षणी वाघ हरिणावर झेप घेते तो क्षण आपल्याला बघवत नाही आपण चॅनल बदलतो. पण आपली मुले रिमोट हिसकवून घेत ते दृश्य बघतात. हे बघून भयचकित व्हायला होते. हीच मुले अपघात आणि खून ही असेच लाईव्ह बघतील. मुलांचे हे कोलमडणारे भावविश्व ही मला चिंता वाटते आणि हीच मुले उद्या अधिकारी होणार आहेत.निर्णयप्रक्रियेत सहभागी असणार आहेत. त्यांना गरिबांचे,पर्यावरणाचे प्रश्न तरी कळतील का ?
            पुन्हा या सर्वातून मुलांचा अहंकार चुकीच्या पद्धतीने विकसित होतो आहे. थोडे बोलले तरी मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत.
       पालकांची स्वयंव्यग्रता ही पुन्हा समस्या बनली आहे. पालक दिवसभर काम आणि घरी आल्यावर टीव्ही फोन आणि सोशल मीडियात रमून गेलेत.याला मुलांच्या आई ही अपवाद नाहीत.यातून मुलांशी संवाद बंद झालेत.घरात वस्तु मिळताहेत पण प्रेम आणि संवाद मिळत नाहीये.यातून मुले प्रेम दुसरीकडून मिळवतात आणि संवाद ही चुकीचा करू लागतात.
            इथेच नेमकी श्यामची आई मला महत्वाची वाटते. ती मुलाशी सतत बोलत राहते. न चिडता ती त्याला समजून घेते.छोट्या छोट्या प्रसंगातून त्याला मूल्य परिचित करून देते. केवळ शब्दाने संस्कार करण्यापेक्षा आपल्या अपरिमित कष्टाने आणि मायेने संस्कार करते. आजच्या सुशिक्षित कुटुंबातील श्यामच्या आईकडून हे शिकायला हवे. मुलांशी बोलावे कसे एवढे शिकण्यासाठी या स्मृतीवर्षात श्यामची आई आपण प्रत्येक पालकाने वाचावी.त्या आरशात आपले पालक असणे तपासून बघता येईल.

‘श्यामची आई स्मृतीशताब्दी हे उपक्रम होऊ शकतात
श्यामची आई पुस्तकाचे वाचन पालकांनी करणे
श्यामची आई चित्रपट सर्वत्र दाखविणे
‘आजच्या मुलांचे प्रश्न व सुजाण पालकत्व’ या विषयावर व्याख्याने,चर्चा घडविणे
महिला मंडळे,बचत गट,शाळांचे माता पालक संघ इथे मुले श्यामची आई व माता  अशा चर्चा घडविणे
मुलांसाठी श्यामच्या आईतील एक प्रसंग अशी भाषण निबंध किंवा चित्रकला स्पर्धा घेणे
                                                                  

संस्कृत सुभाषितें" : सुहास लिमये, मुंबई 

A very nice and informative audio on Sanskrit sholks by Shri Suhas Limye , Pune India. A group of people including Mr. Deepak Choudhary involved in preserving Sanskrit language. A must listen audio, its a long clip but can be listened in parts.

श्री.सुहास लिमये यांनी पुणे येथे "संस्कृत सुभाषितें" या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचे ध्वनिमुद्रण जरूर ऐकावे . श्री दीपक चौधरी  आणि  त्यांची  मित्र  मंडळी  सुन्स्कृत हि भाषा  जोपासण्यात  लागली  आहे , आणि  हे  फारच  म्हत्वाच  हि आहे . जरूर  ऐका :
0:00/44:41

गुढी पाडवा मनोगत : कुमार गावणकर

फारच सुंदर ! जरूर वाचा :

मित्रहो, काल शुक्रवारी गुढीपाडव्याचा सण पार पडला. वर्तमानपत्रातल्या बातम्या, फोटोज व फेसबुकमधील पोस्टस यामुळे बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या बालपणी आम्ही आमच्या गावी गुढीपाडव्याचा सण कसा साजरा करायचो त्याच्या आठवणी... माझ्या डायरीतुन...
मराठी वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र. पुढे वाचा 

Enjoy the latest e-edition " Rutugandh Grishma" from 

Maharashtra Mandal Singapore

Enjoy this 10th e-edition from Maharashtra Mandal Malaysia 

सुंदर अभिव्यक्ती : शशी पानट 

सुलभाने जेवणाचं टेबल आवरलं! आता मुलांच्या गृहपाठाच्या वह्या तपासल्या की आपण झोपायला मोकळे आहोत या नुसत्या विचारांनीच तिला बरे वाटले! तिची सात वर्षाची मुलगी अनामिका केव्हांच पेंगायला लागली होती.

पुढे वाचा :


 लाचार 

माझे संपुर्ण आयुष्य शहरात गेल्यामुळे ग्रामीण मातीचा, शेतीचा किंवा बोलीभाषेचा माझ्याशी सरळ सरळ संबंध नसला तरी लेखक या नात्याने शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही. गावरान भाषेत लिहीण्याचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे. माझ्या 'क्षितिज' या लघुकथा संग्रहातील ही कथा वाचकांच्या मनात नक्कीच हुरहुर लावून जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. --श्रीकृष्ण चंद्रकांत कीर    वाचा 

By: Ashutosh Bapat 

Mr. Bapat is from pune and working as a development officer in LIC. Studied M.A. Indology and doing research in temple architecture and iconography.  Has done Lectures slide shows on this subject and also on tourism and trekking. Writes for newspapers, periodicals, MTDC magazine. Published one book on offbeat tourism. Read वाचा :

हा प्रश्न आम्ही फेसबुक च्या ग्रुप वर विचारला तर फारच सुंदर निरनिराळ्या व्याख्या समोर आल्या.

We asked " What is Life?" to Fb group members, and we got such wonderful responses on life : Read वाचा 

सत्य घटना : मयूर सांडोकर ह्यांनी पाठवलेली 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरून आपण काय शिकावे? ह्याचा सुंदर विचार.

पुढे वाचा :

नट सम्राट हा  सिनेमा जगभर पाहिला  जातो 

आहे , विभिन्न प्रकार च्या प्रतिक्रिया , मनोगत ही मांडले जात आहेत . तर वाचूया 


नट सम्राट ---विजया मराठे 


एक सुरुवात ---ऐश्वर्या कोकाटे 

वाचा 

Two Short Stories Evolution in English and संत्री in Marathi 

A story in English by :

Jyoti Kulkarni Katti                         Ria was bit nervous. She aimlessly walked for a while backstage. Then she went to the green room and sat on a chair.“Hi Ria! How are you? 

Read More 

  स्फुटलेखन 'जाहिरातींची गंमत' : अरुण सौदागर, खंडाळा

परवाच कुठे तरी वर्तमानपत्रात कोणत्या तरी चित्रपटाची जाहिरात वाचली आणि अचानक चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ आठवला. तेव्हा सावंतवाडीत दोघे तिघेजण हातात लाकडी चौकटीत बसवलेला भला मोठा फलक घेऊन सबंध शहरभर चित्रपटाच्या जाहिरातीसाठी फिरायचे. त्या फलकावर त्या चित्रपटातल्या प्रमुख कलाकारांचे किंवा चित्रपटातल्या मुख्य प्रसंगाचे रंगीत छायाचित्र असायचे. फलक घेऊन जाणा-यांबरोबर एक दोघे ढोलकी व ताशा बडवत चालत असत. चालता चालता चित्रपटाच्या रंगीबेरंगी लहान मोठ्या जाहिरातीही ते मधेमधे हवेत भिरकावून द्यायचे. वीतभर आकाराच्या त्या जाहिराती गोळा करायला आमची तारांबळ उडायची. मला निळी, मला जांभळी असं ओरडत आम्हीही त्या लवाजम्याच्या मागून पळायचो. पण ते लोक दाद देत नसत. वास्तविक सर्वच जाहिरातीतील मजकूर सारखाच असे, तो आम्हां सर्वांना वाचता येई, अशातलाही भाग नसे, पण कोण किती जास्त रंगांच्या आणि किती जाहिराती जमवतो याला आमच्या लेखी जास्त महत्त्व असायचे. जेव्हा ते जाहिरातवाले खेकसून आमच्यावर धावून आल्यासारखे करायचे, तेव्हा मात्र नाईलाजाने मागे परत फिरायचो आम्ही.
अशीच एकदा 'मी अत्रे बोलतोय' ची जाहिरात स्पीकरवरून काहीजण करत जात होते. त्यावेळी अत्र्यांचे नाव आम्हांला ठाऊकच नव्हते, कारण आम्ही सर्वच पहिली ते चौथीत शिकत होतो. आम्हांला बोबडे, तोतरे वगैरे कळायचे, पण 'अतरे' बोलणं म्हणजे नेमकं कसं ते मात्र ठाऊक नव्हते. चित्रविचित्र आवाजात त-हेवाईक रीतीने बोलणे म्हणजेच 'अत्रे' बोलणे असा आम्ही निष्कर्ष काढला शेवटी व त्याला दुजोरा घेण्यासाठी घरातल्या मोठ्या माणसांना गाठले. आमचे 'अत्रे' बोलणे ऐकून त्यांना झीटच आली. शेवटी, 'चावट चमत्कारिक पोरं आहेत ही! चालू लागा इथून!' असं सुनावून त्यांनी आम्हांला हाकलून लावले.
नगरपालिकेच्या किंवा अन्य महत्त्वाच्या सूचना नागरिकांना पोचाव्यात यासाठी गावातीलच एकाची तेव्हा नेमणूक केलेली असे. नेहमी सायकलवरून येणारा, कानाजवळून विरूद्ध एकाच दिशेला आपले काळेपांढरे काहीसे लांब केस वळवून भांग काढणारी ती ठेंगू मूर्ती मला अजूनही आठवते.
'काकू पडते' असे त्यांचे नाव सायकलच्या मागे रंगवलेले आजही आठवते. काकू हे त्यांचे नाव असावे व पडते हे आडनाव. हातात पूर्वी ग्रामोफोनला असायचा तसा ब्रासबँडसारखा टोकाजवळ वाकडा असणारा भलामोठा कर्णा हातात घेऊन ते प्रथम तुतारीसारखा 'तूतू रे तू , तूतूतू' असा काहीसा आवाज काढायचे आणि मग , 'लोकहो, ऐका!' असे म्हणून आवश्यक ती सूचना चौकाचौकातून द्यायचे.सूचना कर्ण्यातून देऊनही केवळ अगदी जवळून ऐकत असल्यामुळे आम्हांला ती अजिबातच कळायची नाही. त्यामुळे आम्ही ही त्यांच्या पाठोपाठ पुढचे दोनतीन चौक पायी धावून पुन्हा पुन्हा सूचना ऐकायचो. तरीही काहीच न समजल्यामुळे 'काय, कसली सूचना दिलीत?' असे त्यांना आम्ही विचारत असू. तेही सूचनेचा अर्थ आम्हांला समजावून सांगत, अर्थात कर्णा न वापरता ते कसं बोलतात ते ऐकण्याचाही आमचा सुप्त हेतू त्यांना सतावण्यामागे आमचा असे.
सूचना देण्यासाठी सायकल बाजूला लावून ते उभे राहिले की, सायकल वरचे रंगवलेले त्यांचे नाव वाचणे, तेही एकएक अक्षर लावून, हाही आमचा एक ठरलेला कार्यक्रम असे. एकदा एकाने चुकून ',काकू पहाते' असे नाव वाचल्याने पडतेकाका भयंकर वैतागलेले आठवतात.
एकदा तर एकाने आरोळी ठोकावी तसे मोठ्या आवाजात नाव वाचले, 'काकू पडते', त्याबरोबर रस्त्यावरून जाणारेयेणारे एकदम दचकून इकडे तिकडे पाहू लागले. मग खरा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर जाम चिडले, तशी आम्ही धूम ठोकली.
आता तशा जाहिराती नाहीत, त्यामुळेच, तशी गंमत ही नाही.
खरं ना, तुम्हांला काय वाटतं?


" निसर्गाची दिवाळी " --  सुनीता सुरेश महाबळ

भल्या पहाटे सारे उठले निसर्गाची आज दिवाळी आनंदा पारावार न उरला कामाची मग लगबग उडली ...१...

वा-याने मग झपाट्याने परिसर सारा स्वच्छ केला पर्जन्याने मग हळूच येऊनी मंगल सडा त्यावरी शिंपीला

मयुर पहा हा ठुमकत आला मोरपिसांची रांगोळी घाली प्राजक्तही आला त्याच्या मदतीला पखरण फुलांच्या भूवर केली

आकाशदिवा मोहक टांगला शशिचा गगनांतरी काजव्याच्या मिणमिणत्या पणत्या लाविल्या वृक्षावृक्षावरी.

रातराणी अन् निशिगंधा ही दशदिशांना उधळी सुगंधा जाईजुई पण साह्य करिती भिडवूनी खांद्याला खांदा..

तरूवर सारे ऋषीतुल्य हे होऊनिया संतुष्ट मनी मधुर फळांची सृष्टिला सा-या देती मेजवानी........

प्राचीवर अरुण पहा हा चंद्रज्योती पाजळी प्रकाशात त्या अवघी सृष्टि न्हाऊनीया निघाली

नित्य दिवाळी होई साजरी निसर्ग होऊनीया संतुष्ट मनी संदेश देई जगताला हरदिनी साधा दिवाळीची पर्वणी.

Halloween special haunted story by

Dr [Major] Nalini Janardhanan

Sunil was highly excited about his trip to Jaipur. Through he was going on an official tour he wanted to Read More

मला भावलेलं संगीत: 

डॉ. हेमंत जोगळेकर

  परवा संध्याकाळी सहज घरी आराम करत असताना दूरदर्शनवर छायागीत मध्ये राजकपुरचे जुने गाणे पाहिले तेंव्हा सुखद आश्चर्याचा धक्का बसला. कारण हल्ली दूरदर्शनवर जी गाणी छायागीत मध्ये दाखवतात ती ऐकवत तर नाहीतच पण पहावतही नाहीत. मला तर हे `छायागीत' नसून'वायागीत' आहे असच वाटत. पुढे वाचा :

  ललिता  पवार जन्म दिवस एप्रिल १८ 

  -- राहुल धर्माधिकारी 

  मराठी व हिंदी सिनेमातील आपल्या चरित्र भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलेल एक नाव म्हणजे ललिता पवार. आज ललिता बाईंचा 99 वा जन्मदिन. जुन्या काळात असा कोणताही चित्रपट नसेल ज्यात ललिताबाईनी काम केल नसेल. ललिता बाईंचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी नाशिक जिल्ह्यात झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यानी राजा हरिश्‍चंद्र ह्या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर प्रवेश केला.  पुढे वाचा :

  Most of us probably know the story behind very famous Stanford University in USA. Shashi Panat has written about it in Marathi

  Enjoy: 

  पुढे वाचा :

  Dr. Hemant Joglekar:  By Aishwarya Kokatay


  Dr. Hemant Joglekar has a Doctorate degree in Chemical Technology. He works as a senior manager at Asian Paints .He has written for many research publications and a visiting professor to guide PhD students. He is from Girgaon Mumbai and active in Marathi community to organize social events . He also writes Marathi articles.

  We are pleased to share two articles written by Dr. Joglekar.


  बॉम्बे ऑलिम्पिक :

  लंडन येथे नुकतीच स्पर्धा संपन्न झाली. परंतु शेवटच्या दिवसा अखेराच्या पदकांच्या तक्त्यामध्ये भारताचे नाव खूप कमी ठिकाणी दिसले. ही खेदाची व स्पष्ट शब्दात कबुल करायची म्हणजे लांच्छनास्पद बाब आहे.

  पुढे वाचा :

  कावळ्यांची कावकाव

  एक आटपाट नगर होत. लोक सुखासमाधानाने तिथे राहत होते. एक दिवस लाल दिव्याची गाडी त्या नगरात आली. एका पुतळ्याचे अनावरण झाले. नारळ फोडला, हार घातला व यथेच्छ भाषणही झाले. 

  पुढे वाचा:

  Vaishavi Lokhande a police officer and a writer
  वैष्णवी लोखंडे : एक पोलीस अधिकारी आणि लेखिका  

  Vishnavi Lokhande: By Aishwarya Kokatay


  Recently I came to know a personality who is a young woman police officer in Maharashtra Police and an excellent writer. She writes nice poems and articles in Marathi language. When I contacted her and asked her about sharing her recent poem alongwith all about her, she graciously agreed. I asked her a few questions she got back with answers in her own words


  मी वैष्णवी लोखंडे पुणे मला महाराष्ट्र पोलीस खुप आवडतात माझ्या भावाचे मित्र विश्वास राव नांगरे सर आहेत त्यामुळे मला आवड निर्माण झाली समाजात  खरा बदल फक्त पोलीस आणी लेखकच करू शकतात असे मला वाटते , आता  मराठी भाषा ओस पावत चालली आहे त्यामुळे मी मराठी भाषेची निवड केली मी 2011 पासून लिहीत आहे मला दोन्ही क्षेत्रात कार्यरत रहायचंय. धन्यवाद


  हो मी पोलिस आहे, 
  प्रत्येक क्षण जिव माझा ओलीस आहे, 
  घर दार नाही मला, 
  नाती गोती नाहीत, 
  क्षणाचा नाही विसावा,
  मी असतो सदा घाईत,

  सुख असो दुःख असो मी फ़क्त डयूटी करतो, 
  उदया तरी घरी असेल याच आशेवर पोट भरतो, 
  आई बाप माझे घरी वाट पाहतात, 
  गाडीचा येता आवाज मुले दारा कड़े धावतात, 
  लक्ष्मी पुजनाला घरच्या लक्ष्मी सोबत नसतो, 
  रस्त्यावर उभा राहून मी स्वता वरच हस्तो,

  शहर भर जेंव्हा सुरु असतात दंगे,
  आम्ही सारे पोलिस बांधव असतो एकमेकांच्या संगे,
  लोकांची घरे वाचवन्या साठी, करतो जिवाचे रान, 
  हळूच तेंव्हा आमच्या घराचे येती मनी हो ध्यान, 
  नसों कोणाला कदर आमची नसों कोणाला जाण, 
  ही माती आमची माता ही वर्दी आमची शान...
  जय हिंद..

  वैष्णवी लोखंडे
  पुणे


  थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
  कसे पुसायाचे राहून गेले..
  लपविलेले दु:ख माझे
  चार चेहरे पाहून गेले..

  सांगितले बरेच काही..
  आनंदाश्रु अन काही बाही..
  अर्थ सुकल्या आसवाचा परी
  लावायचा तो लावून गेले..
  लपविलेले जे दु:ख माझे
  चार चेहरे पाहून गेले..

  पुसले डोळे.. हसून खोटे
  चाचपले कितिक मुखवटे
  मुखवट्याला चेहर्यावरती
  चढवायाचे आज राहून गेले
  लपविलेले जे दु:ख माझे
  चार चेहरे पाहून गेले..

  हसून आता.. विसरून सारे
  वावरते जणू.. उनाड वारे
  हसताना पुन्हा भरले डोळे
  पापणीतून अश्रु वाहून गेले
  लपविलेले जे दु:ख माझे
  चार चेहरे पाहून गेले..

  थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
  कसे पुसायाचे राहून गेले..
  लपविलेले दु:ख माझे
  चार चेहरे पाहून गेले..

  वैष्णवी लोखंडे
  पुणे


  अभिरुची रमेश ज्ञातेची कविता

  नाव : अभिरुची रमेश ज्ञाते शिक्षण : MSc Comp Sci नोकरी : लेक्चरर ( इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा ला Microprocessor , electronics , computer science शिकवते ) आवड : कविता लेखन , ललित लेखन करते . शास्त्रीय संगीताची आवड आहे . पेन्सिल स्केचिंग करायला आवडतं . ठिकाण : पुणे

  अभिरुची ह्यांच्या कविता फारच सुंदर आहेत , पहिल्या दोन प्रसिद्ध करत आहोत 

  नंतर दर आठवड्याला नवीन दोन प्रसिद्ध केल्या जातील ....

  एक थेंब भेटायला येतो
  अगदी एकट्या पडलेल्या मातीला

  तिला देऊन जातो
  काही अलवार क्षण
  आणि त्या क्षणांमध्ये गुंफलेल्या
  ओलसर आठवणी

  एक अनामिक सुगंध
  घेऊन येतो साक्ष
  त्यांच्यातल्या गुंतलेल्या धाग्यांची

  सगळ्याच अबोल जाणिवांचा
  आता प्राजक्त झालेला असतो
  आणि
  उमलत जाते मातीचे केशरी मन

  हे अगदी असंच काहीसं
  तुझं आणि माझं ...


  मी अजूनही वाट बघते तुझी
  तितकीच समरस होऊन

  आजही एक हळवासा नाद घुमत राहतो
  आसमंतात , माझ्या मनाच्या

  मी अजूनही जगते अनुभूतीत
  तुझ्या देहत्वाच्या ...
  ते सारे साजीवंत घ्यावे ओटीत
  आणि तुला पुन्हा करावा जिवंत तुझ्या इतकाच ...

  एक चेतनामयी क्षण
  आसुसला आहे तुझ्या देहांशाचे शिल्प
  माझ्यात साकारण्यासाठी ...

  झुंझूरलेल्या क्षितिजाचे रंग आज इतके
  कधीच सजीव नव्हते ...
  उजाडेल तेव्हा तू आलेला असशील माझ्यासाठी
  सूर्य बनून ....
  आणि मी तेव्हाही असेल
  क्षितिजावरची केवळ एक निळी रेघ बनून....


  व्ही. शांताराम आणि माडगुळकरांची नजर  -निरेन आपटे


  नवीन तंत्र हाती आलं पण एक विसंगती घेवून ! आज उत्तम तंत्र आहे तरी दर्जेदार कलाकृती फार कमी प्रमाणात तयार होतात. आणि जेव्हा तंत्र हाती नव्हतं तेव्हा अनेक उत्तम कलाकृती निर्माण झाल्या… खासपणे सिनेमा क्षेत्रात !!

  पुढे वाचा :


  शिवजयंती व महिला दिनानिमित्त...शिवराय कुलकर्णी 


  आज तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जागतिक महिला दिन एकाच दिवशी आला आहे. हा फार चांगला योग आहे. जागतिकीकरणाचे लाभ आणि तोटे हा वेगळा चर्चेचा विषय असला तरी या निमित्त आवर्जून एका विषयाकडे चित्त वेधण्याची माझी इच्छा आहे.

  पुढे वाचा :

  काल मुद्रा -मराठी नाट्यसृष्टीतील : श्रीराम रानडे 
  A book review : Shriram Ranade

  भारद्वाज प्रकाशनातर्फे श्रीराम रानडे यांचे 'कालमुद्रा - मराठी नाट्यसृष्टीतील' हे  नाट्यविषयक लेखांचे पुस्तक दिनांक ५ फेब्रुवारी २०१५ रोजी, बेळगाव येथील 'अखिल मराठी नाट्यसंमेलनामधे'  प्रकाशित करण्यात आले.  मराठी नाटकाची मुहुर्तमेढ करणारे विष्णूदास भावे ते पुरुषोत्तम करंडकसारख्या नाट्यक्षेत्रातील चळवळी इतका मोठा ह्या पुस्तकाचा आवाका. बालगंधर्व, राम गणेश गडकरी, राम शाहीर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर असे नाट्यक्षेत्रातील विविध दिग्गज आणि त्यांचे अपूर्व योगदान याबद्दल अभ्यासपूर्वक आणि रंजक लेखांची मालिका म्हणजे मराठी नाट्यसृष्टीतील या कालमुद्रा.  
  'हाऊसफुल्ल' च्या पाटीची कहाणी, फिरत्या रंगमंचाचा प्रयोग,  मखमली पडद्याची जन्मकहाणी, मराठी नाटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकणारी 'घाशीराम कोतवाल' सारखी नाट्यनिर्मिती असे विविध विषय, कहाण्या, किस्से पुस्तकात सामावलेले आहेत. 
  मराठी नाटकावर प्रेम करण्यार्‍या, त्याचा  इतिहास आणि वर्तमान जाणून घेण्याची इच्छा करणार्‍या प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे पुस्तक म्हणजे 'कालमुद्रा - मराठी नाट्यसृष्टीतील'. 
  पुस्तकाचे नाव : कालमुद्रा - मराठी नाट्यसृष्टीतील
  प्रकाशक : भारद्वाज प्रकाशन, पुणे
  किंमत : रुपये २५० फक्त.
  पृष्ठसंख्या : २४८
  पुस्तक मिळण्याचे ठिकाण :
  भारद्वाज प्रकाशन
  'उमेश' १२८/२, सुमार्ग सोसायटी, कोथरूड, पुणे ४११०३८

  Sangeet Bari By Bhushan Korgaonkar

  Sangeet Bari is a show which combines Abhivachan (reading the excerpts from the book) and live Lavani performance – mostly old, forgotten numbers. This is our humble attempt at creating a platform for the Lavani woman to tell us her story.

  पुढे वाचा : 


  On the auspicious occasion of HOLI, new song-video मैं कान्हा की हो ली ...(I have merged into Lord Krishna !)  ,  
  beautifully sung by the SA RE GA MA PA little champ winner , 
  Kartiki Gaikwad:Composer Arun Saraf 

  कृष्ण ते कुसुमाग्रज !!
  -निरेन आपटे

  कृष्ण चरित्रामधील एक प्रसंग आहे. इंद्र गोकुळावर कोपला. गोकुळावर त्याने विजांचा कडकडाट केला आणि मुसळधार पाऊस पाडून सगळ्या गावकर्यांना संकटात आणले. 

  पुढे वाचा :

  Vasudev Sitaram Bendre 
   A Historian and my wonderful grand father 
   Sadhana Bendre Los angeles 

  इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन ह्या क्षेत्रा मध्ये ज्यांनी अनन्य साधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे होय. इतर प्रांतांना भूगोल आहे,महाराष्ट्राला मात्र भूगोला बरोबर इतिहासही आहे.असे मराठी माणसे अभिमानाने म्हणताना आढळतात . 

  SANGEET SOUBHADRA SILENT DRAMA - 1956


  Raja Harishchandra [ Marathi ]  was the first silent movie produced in 1913. Cinema world has come a long way in India. These silent films and dramas are very rare to find .

  Preeti Deo from  London whose grand parents are in this drama, feels very proud! Shared about it:

  This morning started on great note. A cousin shared Dada's (my late grandfather Shri Harihar Rao Yermalkar)video who played the role of a sutradhar and Krishna in  "Sangeet Soubhadra" way back in 1956!! It must have been an expensive affair then to shoot the actions!! I so loved the blurb too.. Naina ajji you are there too in the video with your mesmerising voice as ever!! So proud of my grandparents

  Enjoy this video clip; This video is edited and preserved by Shri Jagirdar saheb.

  Bhalchandra Nemade : Selected for Jnanpith award

  Eminent Marathi litterateur Bhalchandra Nemade, whose 1963 novel Kosala(Cocoon) changed the dimensions of Marathi Sahitya , selected for 2014 Jnanpith Award on Friday Feb 06/2015. This is  the highest literary honour in India, by the Jnanpith Selection Board.

  Nemade was born in 1938 in the village of Sangavi in 

  Khandesh. He received his bachelor's degree from Fergusson College in Pune and Master's degree in Linguistics from Deccan College in Pune and English Literature from the Mumbai University in Mumbai. He received PhD and D.Lit. degrees from North Maharashtra University.


  Pandit Bhimsen Joshi Birth Anniversary
  Feb 04/2015

  Full Name- Bhimsen Gururaaj Joshi
  Born- February 4th, 1922, Gadag, Karnataka, India
  Died- 24th January, 2011, Pune, Maharashtra, India (Aged 88)

  Pandit Bhimsen Gururaaj Joshi was a legendary Indian vocalist in the Hindustani classical tradition. He belonged to the Kirana Gharana and was known for his Khyal style of singing as well as for his famous renditions of Bhajans and Abhangs. He was widely known as the person behind the song 'Mile Sur Mera Tumhara'.

  He  received Bharat Ratna, India's highest civilian award in the year of 2008.

  Enjoy this video:

   Magh shuddha  Navami: Jan 28/2015 Dasbodh Jayanti  

   Introduction - What is Dasbodh?

   Dasbodh is a classic spiritual text that until recently has been largely unavailable in the West. The text was written in the 17th Century by the great Saint, Shri Samartha Ramdas in the Marathi language.  The book was originally written in a poetic style and is presented in the format of a conversation between a Guru and disciple. Many questions are answered and many doubts are cleared. In Dasbodh, Samartha Ramdas presents the essence of many Vedic texts. Dasbodh is truly a manual for life, in the highest sense. Dasbodh has been popular for many years in India and has only recently begun to receive recognition in the West. Dasbodh is somewhat unique among spiritual literature in that it not only expounds the classic themes of discrimination between the true and the untrue, and detachment commonly found in Vedic literature, but also provided is detailed instruction on how to function and excel in society from a place of deep spiritual understanding. Following are the websites in English and Marathi to read about it .

   let's read and understand  at least one stanza to celebrate Dasbodh jayanti.

  Samarth Vani - Sanjeev Abhyankar

  Lavani-- is this dance appropriate to be performed by little girls?- Aishwarya Kokatay

  Recently I attended a Makar Sankranti program. The program was basically all the kids performances. One performance was of a dance on a lavani song performed by 5-7 year old girls.

  After the  program, I was chatting with other people and questions raised on this subject as why these little girls were given a Lavani song for their performance? As obviously this dance form of Maharashtra categorized  under an adult entertainment. 

  We hear this issue all time.


  Let’s know all about this dance form : 


  Originating from the state of Maharashtra, the word Lavanya meaning Beauty which tries to put the various social aspects in an entertaining form. The Lavani Dance form is a combination of traditional songs and dances. It worked as a morale booster for the war soldiers in the 18th century.


   The dance reached peak popularity during the Peshwai rule which was the dynasty seated in Pune, during this period the dance was given royal support by the ruling elite. Lavani Songs, which are sung along with dance, are usually naughty and erotic in nature. It is believed their origin is in the Prakrit Gathas collected by Hala. The Nirguni Lavani (philosophical) and the Shringari Lavani (sensual) are the two types. The devotional music of the Nirguni cult is popular all over Malwa.


  Lavani developed into two distinct performances, namely Phadachi Lavani [ फडाची लावणी ] and Baithakichi Lavani [ बैठकी ची लावणी ] The Lavani sung and enacted in a public performance before a large audience in a theatrical atmosphere is called Phadachi Lavani. And, when the Lavani is sung in a closed chamber for a private and selected audience by a girl sitting before the audience, it came to be known as Baithakichi Lavani.


  The Lavani Dancers are dressed in bright colored Sarees, and bedecked in golden jewelry; the Lavani dancers usually get dressed graciously swayed their bodies to the beat of the dholaks enticing the audience.  Shringar Lavani is mostly sung and danced on the stage by a female and written by male. Lavani can also be termed as a romantic song sung by lady who is waiting for her lover to accept her, who longs for his love.


  I think because of the popularity of its rhythm and energy in the lavani songs, attracts a lot of people and may be that’s the reason they do include these songs for dance performances. The meaning and wordings of these songs are being overlooked over the nice beats and rhythm.

  So it’s all up to these parents, choreographers and organizers, they need to think and decide before giving these songs to small girls to perform.

  -Aishwarya Kokatay

  श्री. अमिताभ ह्यांनी मला विचारले " लोणचं वाला च बोलना हैं क्या ?"
  -निरेन आपटे.

  जाहिराती लिहिणे, त्या शूट करणे आणि त्याचं डबिंग करणे हा माझा पूर्णवेळ व्यवसाय आहे. सुरुवात मी केली होती "सामना" मधून. त्यावेळी अभय परांजपे उपसंपादक होते. त्यांनी पुढे "वादळवाट" सारख्या अनेक tv मालिका लिहिल्या. " तू चांगला लिहितोस. चल पत्रकार बन " अस म्हणून त्यांनी मला पत्रकार बनवलं. पुढे मी जाहिरात विश्वात प्रवेश केला आणि आता स्वताची firm चालवतो. 

  पुढे वाचा :

  A DAY IN PROVENCE By: Usha Malkerneker USA

   
  I put the book down "One year in Provence" by my favorite author Peter Mayle. Though I was driving to Starbucks, in my imagination I was already walking the hills of Provence. It was still very early, no cars or joggers. Dense fog had lazily draped the canyon this morning. I sipped warm chai savoring its sweet taste.

  Fine mist of dew was silently settling on the patio table. Though strawberry farms had not woken up from their winter slumber, potted geraniums were very happy to oblige me with big pink blossoms. Small bells of flaming orange red honeysuckle were making love to a hummingbird; iridescent green of his feathers was barely visible.

  Legends say that hummingbirds float free of time, carrying our hopes for love, joy and celebration. Hummingbirds open our eyes to the wonder of the world and inspire us to open our hearts to loved ones and friends. Like a hummingbird, we aspire to hover and to savor each moment as it passes, embrace all that life has to offer and to celebrate the joy of everyday. The hummingbird’s delicate grace reminds us that life is rich, beauty is everywhere, every personal connection has meaning and that laughter is life’s sweetest creation.

  In silence I listened to the flutter of the hummingbird wings and occasional dripping of the dew drops from the eucalyptus tree above. The hawk was waiting again this morning on one of the eucalyptus branches, maybe he was watching me.


  Raag :  Brindabani  Sarang : Samuha Sargam Geet 
  Composer : Arun Saraf
  Singers : Shubhada Paranjape, Arnika Paranjape, Prachi Ranade
  Rhythm : Manesh Bulsara

  New Year Poem by : Govind Deshmukh Oregon US

  A very nice poem for new year written and sung by the poet.

  This in Marathi with English titles.

  Nav Sanvat 2015
  Govind Deshmuiy (Dash Disha)
  0:00/5:10

  Ravindra Deo composition LA

  Matawaaro Baadal Aaye Re
  Meera Bhajan "Matawaaro Baadal Aaye Re" Raag Kaushik Dhwani, Taal Keherwa Lyrics by Meerabai Music composed by Ravindra Deo Seema Hanamsagar, vocal Ravindra Deo, tabla Gopal Marathe, harmonium Vivek

  Madhuri Jadhav : Atlanta
  Introduction:

  Hindustani Classical and Semi Classical Singer
     Guru Dr. Haribhau Khandare (PhD in Music
  Approved artist of Nagpur Akashwani
  Zee Marathi Idea Sa Re Ga Ma Pa Finalist (2007)
  Performed at several concerts & occasions in US and India
   Runner-up of Raag Ek Rang Anek at Mumbai Doordarshan
  Finalist of Sansui Antakshari on ZEE TV Composed Sugam Sangeet for Nagpur Akashwani and poems for Pune Doordarshan
  Proficient Harmonium player
  Winner of Natya Geet Gayan Spardha at Vidarbha for two consecutive times
  Sings a variety of songs like Ghazal, Natya Sangeet, Kajari, Dadra, Hori, etc.
  Make notation of any song on the spot
  website https://sites.google.com/site/madhurijadhavpunekar/home

  Garba : Arun Saraf

  Lyrics : 'Gwala'
  Music : Arun Saraf
  Singer : Rahul Chitnis
  Album : Rang De O Shyam

  Mugdha Hasabnis Ganpati song 

  मानहानी : शशी पानट
  मी विनायक दामोदर सावरकर! अंदमानच्या ह्या तुरूंगातुन आज मी आपल्यासमोर थोडे मन मोकळे करण्याचा यत्न करतो आहे! रोज कोलू फिरवुन फिरवुन माझ्या अंगावरचा ’मी’ पणाचा वर्ख हळु हळु नाहीसा व्हायला लागला आहे. निगरगट्टपणाची ही पहिली पायरी आहे असे म्हणतात. पुढे वाचा :
  सर्दी आणि थंड पाणी : अतुल वेलणकर 

  थंड पाणी पिउन सर्दी बरी झाली अस कधी झालंय का? माझ्या बाबतीत झालंय ! नाशिकचा प्रचंड कडक उन्हाळा होता. मी माझा नाशिक दौरा संपवत होतो. अभियांत्रिकी दौरे थोडे विचित्र असतात. आख्खा दिवस कडक उन्हात एका टायर्स बनवणाऱ्या कंपनी मध्ये फिरत होतो. पुढे वाचा :

  मुरुडचे मयेकर गेले कुठे ? : निरेन आपटे 

  मुरुड हा सुंदर सागरी किनारा जेव्हा अजिबात गजबजलेला नव्हता तेव्हा पहिल्यांदा मुरुडला गेलो होतो. साधारण २० वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.
  मुरूडच्या समुद्र किनारी " किनारा" गेस्टहौस होतं. तिथे रूम बुक करून आम्ही सामान ठेवत होतो इतक्यात मागून आवाज आला.
  " भाऊ नाश्ता- जेवण लागलं तर सांगा...सकाळी पोहे, जेवणामध्ये पापलेट, सुरमई आणि सोलकढी…पाहिजे तर चपाती-भाजी आहे " पुढे वाचा :

  साडे नऊ हजाराचा सूड : अतुल वेलणकर 
  ऑफिस मधून निघताना आज जरा उशीरच झाला. साडेसहा वाजून गेले होते. मी बांद्रा कुर्ला कोम्प्लेक्स मधून माझ्या घरी अंधेरीला जायला निघालो. उशीर झाला म्हणून रिक्क्षा पकडली आणि निघालो. आधीच  निघायला उशीर ....त्यात पावणेसातच ट्राफिक...म्हणजे अंधेरी गाठायला अर्धा पाउण तास कुठेच गेला नाही, कदाचित जास्तच ..मला घड्याळात आठ वाजलेले दिसू लागले..मी गप्प बसून होतो रिक्क्षा मध्ये. पुढे वाचा :

  Earth Day April 22/2015

  By : Shobha Daniell 

  Our traditions teach us to worship all aspects of Nature and revere trees and plants, while oceans, rivers, lakes, mountains and forests were looked upon as abode of the gods.

  Read More:


  Only If I Could Fly : Usha Dhond Malkarnekar 

  I left the house at dawn, The Sun wasn't quite up yet but there was enough light. I didn't know where I was going or when I would return. Trail looked vaguely familiar but season had changed and with it the landscape, the lush green hills and fields filled with yellow mustard flowers were now dry and brown. Read More:

  अंधार भेदायचाय ....अमोल गायकवाड 
  "येळ रातीची , १-२ वाजलं आसंल, म्हंजी १२ ला आमी कारेक्रम संपून आन बिदागी उचलून निगलो हुतो. ४-५ येळा मी एयेल ए गोंधळाच्या कारेक्रमाला, आजीच धाडायची म्हणायची निसती बसून ऱ्हाती, जाय कि नाचाय पाच पन्नास रुपय तरी घावतील.

  पुढे वाचा:

  क्लटर- पक्षी : मनोगत - प्रीती बर्वे लॉस अन्जेलीस 

  आज किती दिवसांनी सगळी कपड्यांची क्लोजेट्स आवरली.चुर्गळलेल्या कपड्यांना इस्त्री केल्यावर (झाल्यावर) काय वाटत असेल?- तसं काहीसं मेंदूला वाटलं ! रेस्क्यू मिशनचा फोन येणं ,म्हणजे मला खरच एक मोटीवेशन असतं,

  पुढे वाचा :

  तेजस्वी फुले !! जागतिक महिला दिन [मार्च ८] विशेष ----निरेन आपटे 


  तुम्ही क्रांती स्वीकारा किंवा नाकारा, ती स्वतःच्या पावलाने येत असते !!...

  १८ व्या शतकात महिलांना शिक्षण नाकारणार्यांना हे माहित नव्हतं. पण सावित्रीबाई फुले ह्यांनी हे सिध्द करून दाखवलं. ज्याचे अनेक चांगले परिणाम आज महिलांना दिसून येत आहेत आणि देशालाही त्याचा लाभ होत आहे.

  पुढे वाचा :

  आठवडे बाजार : Farmers Market By : Sadhana Bendre & Joshi


  आठवडे बाजार हे प्रकरण फक्त भारतातच असावे असे मला आधी वाटत होते. पण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात पण

  पुढे वाचा : 

  स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर म्हणजेच आदरणीय तात्याराव यांना विनम्र श्रद्धांजली, माझी कविता समर्पित. सचिन कुलकर्णी 

  कलिंगडाचे डोहाळे    -निरेन आपटे

  बदलापूरमध्ये राहणाऱ्या सोनावणे ह्यांची पत्नी प्रेग्नंट होती. तिसरा महिना चालू होता. सोनावणे कामावरून नुकतेच घरी आले होते. चहा पिताना ते पत्नीशी गप्पा मारत होते.

  पुढे वाचा :

  आंगणेवाडी मालवण : सतीश चौकेकर 

  मालवणपासून १२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या मसूरे या गांवातील
  बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण
  श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच
  असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे.

  पुढे वाचा : 

  वेदना ते आनंदाची उपासना !!  _ A book review by Niren Apte


  " माणसाशिवाय कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू वाढत नाहीत. त्यामुळे प्रयोगासाठी फक्त माणूस हाच प्राणी पाहिजे. म्हणून आजवर कुष्ठरोगाची लस तयार झालेली नाही. " कुष्ठरोग तज्ञ डॉक्टर धर्मेंद्र ह्यांनी अशी अडचण व्यक्त करताच एकाने सांगितलं "माझ्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू सोडा आणि प्रयोग करा 
  पुढे वाचा :

  फळांमुळे cancer होतो...१००% !!!  -निरेन आपटे


  एक गाव होतं. कोणी शेती करे, कोणी मडकी तयार करत असे तर कोणी विहीर खणण्याच काम करत असे. 

  सगळे कष्टकरी होते आणि जे शेतात पिकेल ते खायचे.

  पुढे वाचा ; 

  लोणावळ्याचे हमाल... जे मरणाला शरण आणतात !! - निरेन आपटे


  "एक मरे, त्याचा दुजा शोक वाहे. अकस्मात तोही पुढे जात आहे "समर्थांचं हे वचन टाळू शकेल असा- जगी सर्वसुखी कोण आहे?

  पुढे वाचा :

  Toll की सरकारी दरोडेखोर ?नव्या सरकारला सलामी !!!-निरेन आपटे

  एक दरोडेखोर होता. रोज माळरानावर टपून बसत असे. जो येईल त्याला लुटून घेई. एकदा एक गावकरी घाईघाईत पलीकडच्या गावात चालला होता. नेमका दरोडेखोराच्या हातात सापडला. 

  पुढे वाचा : 

  जय शिवाजी, जय वाडकर काका-निरेन आपटे 

  जय शिवाजी, जय वाडकर काका !!

  " सर, ताक घ्या ना. फक्त १० रुपये "
  फाटक्या कपड्यातील एक चिमुरडी माझ्या समोर ताकाचा ग्लास धरून उभी होती. तिच्याही तोंडी "सर" शब्द आला हे ऐकून वाईट वाटलं. 

  पुढे वाचा :

  सोबत वाडकरकाकांचा फोटो जोडला आहे.

  माझा धर्मग्रंथ- रेशन कार्ड !! -निरेन आपटे

  कोणाचा धर्मग्रंथ भगवतगीता आहे तर कोणाचा बायबल. आणि काहींचा कुरान. माझा धर्मग्रंथ आहे रेशन कार्ड. जो जन्मभर साथ देतो. खरं म्हणजे हा धर्मग्रंथ भारतातील प्रत्येक नागरिकाचा पहिला धर्मग्रंथ असायला पाहिजे. 

  पुढे वाचा:

  आरंभ केला गोरखगडापासून !!  -निरेन आपटे. मुंबई 

  " काका, गोरखगडावर जायला वाट कुठून आहे?"
  मुरबाडपासून आत असलेल्या देहरी गावात पोहोचलो तेव्हा समोर दोन सुळके आणि प्रचंड डोंगर दिसत होता. त्यातील नेमका गोरखगड समजत नव्हता. 

  पुढे वाचा :

  कैरीचं लोणचं ! By: Priti Barve Los angeles

  कैरीचं लोणचं !अशक्त हातानी आज्जीने हिरव्या उत्साहात करकरीत कैऱ्यांचे

  सुंदर लोणचे बनवले. एका छानशा बरणीत लोणचे मुरवत ठेवले. 

  पुढे वाचा : 

  कल्याण...देशातील सर्वात प्रगत शहर !! निरेन आपटे 

  कल्याण...देशातील सर्वात प्रगत शहर !!

  काही वर्षांपूर्वी कोकणचं California करण्याची घोषणा झाली होती. पण त्यानादात California चं कोकण होण्याची भीती असल्यामुळे तो बेत रद्द करण्यात आला. मग मुंबईचं सिंगापूर,bankbook वैगरे करायला निघाले. 

  पुढे वाचा : 

  शिवबाचं विज्ञान ..जे अंधारात आहे -निरेन आपटे 

  शिवबाचं विज्ञान ..जे अंधारात आहे !

  सामान्यपणे असं मानतात की विज्ञानाची सुरुवात पश्चिमी देशांमध्ये झाली. हो, हे खरं आहे की अनेक शोधांचे जनक पश्चिमी देशात जन्माला आले. 

  पुढे वाचा :

  सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ- जीवन हे क्षणभंगुर आहे

  मी एक सुंदर लेख आपल्यासोबत शेअर करत आहे
  जेणेकरून जिवनाचा खरा अर्थ सर्वांच्या लक्षात येईल....
  एका माणसाचं निधन होतं हे त्याच्या लक्षात येतं
  जेव्हा साक्षात भगवंत हातात सूटकेस घेऊन त्याच्या समोर प्रगटतात.
  भगवंत आणि त्या माणसा मधील संवाद
  भगवंत - वत्स, चल आधीच उशिर झालाय !
  माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत.
  मला आणखी खुप काही करण्याची इच्छा आहे.
  भगवंत - माफ कर, अगोदरच फार उशीर झाला आहे.
  माणूस - पण भगवंता, ह्या सूटकेस मध्ये काय आहे ?
  भगवंत - जे आहे ते तुझंच आहे !
  माणूस - माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे.....
  भगवंत - ते काही नाही कारण त्या सर्व भुतलाशी संबंधित आहेत.
  माणूस - माझ्या आठवणी ?
  भगवंत - त्या काळाशी संबंधित आहेत.
  माणूस - माझं क्रतुत्व
  भगवंत - नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे.
  माणूस - माझे मित्र आणि परिवार
  भगवंत - नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते
  माणूस - माझी पत्नी व मुलं
  भगवंत - ते तर तुझ्या ह्रुद्यात आहेत.
  माणूस - मग माझं शरीर
  भगवंत - नाही, नाही ते तर राख झालं
  माणूस - मग नक्की माझा आत्मा असेल
  भगवंत - वत्सा तु परत चुकलास तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे.
  माणसाच्या डोळ्यातून आता अश्रु येऊ लागतात.
  त्याने भगवंताच्या हातातून सूटकेस घेतली आणि मोठ्या आशेने उघडून बघितली
  तर काय .......
  रिकामी निराश होऊन डोळ्यातील अश्रु पुसत
  माणूस - म्हणजे माझं स्वता:चं काहीच नाही ?
  भगवंत - अगदी बरोबर, तुझ्या मालकीच कधीच काही नव्हतं.
  माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय ??
  जीवन हे क्षणभंगुर आहे
  फक्त. जगा प्रेम करा उपभोग घ्या

  तुम्हाला काय आहे... मुलगी-मुलगा? की रेसचा घोडा? 
  -निरेन आपटे 

  तुम्हाला काय आहे... मुलगी-मुलगा? की रेसचा घोडा?

  एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते. Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, " tell me , 

  पुढे वाचा : 

  Meeth मीठ short story by: 
  Raskhit Kamble Los angeles 

  About the writer: Rakshit Kamble is basically a shayar and writes shayaris in Urdu- Hindi. Expressions have no language bar, so enjoy this heart touching story in Marathi written by him. 

  मीठ

  आज फानल इअरचि हि शेवटचि पार्टि..

  गर्दि आणि कल्लोळ चहुकडे पसरलेला होता.

  कॉलेज  संपल्यावर आपली मैत्री अशिच टिकुन राहणार याचि  खात्री  प्रत्येक जण  एक  दुसर्‍याला १०० टक्के देत होता.

  पुढे वाचा :

  शिक्षण नावाची शिक्षा! निरेन आपटे, मुंबई 

  शिक्षण नावाची शिक्षा!

  हल्ली "सर्व शिक्षा अभियान" सुरु झाले आहे. पण आमच्या आधीच्या पिढीने ह्या अभियानाचे परिणाम आधीच भोगले आहेत. त्यांनी निमकी, पावकी,औटकी चे पाढे पाठ कर कर केले. आणि ते चलनातून बाद झाले. हे पाढे पाठ न केल्यामुळे खालेला मार वाया गेला. 

  पुढे वाचा : 

  झुणका भाकर : निरेन आपटे मुंबई 

  About the writer: Mr. Niren Apte started his career with the newspaper " samana " as a reporter and end up being a copywriter and journalist. 

  He will be sending his articles to Marathi culture and festivals so that all the readers can enjoy reading.


  About him in his own words:


  मी copywriter आहे. पूर्णवेळ....ponds , vodafone , airtel , godrej , सिप्ला, पार्ले, reliance , लावासा , वेस्टर्न union , icici, इतर अनेक बँक्स, मुंबई police अश्या अनेकांच्या जाहिराती लिहिल्या आहेत . अंदाजे ३०० पेक्षा जास्त products च्या tv , प्रेस इत्यादी भरपूर जाहिराती मी लिहिल्या आहेत. मी एड्स, cancer संबंधी खूप मोठं campaign केलं होतं. एका विशेष कामगिरीचा मी इथे उल्लेख करतो. लोकसभा निवडणुकीला मी एकाचवेळी BJP , कॉंग्रेस आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या जाहिराती लिहिल्या होत्या. अब कि बार...( BJP ), हर हात शक्ती(कॉंग्रेस) च्या प्रचारात सगळ्या मराठी जाहिराती माझ्या होत्या. श्री नरेंद्र मोदी ह्यांनी लोकसभा निवडणुकी आधी महाराष्ट्रातील गावागावात काही पत्रे पाठवली होती. ती सर्व पत्रे मी मराठीत लिहिली होती.

  --निरेन आपटे 

  झुणका भाकर खा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा!

  शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी स्वदेशी आहार हा दुहेरी लाभ असलेला उपाय आहे. झुणका भाकर, नारळाच पाणी, उसाचा रस, लिंबू पाणी, 

  पुढे वाचा :

  परमानंद चिवडा : ऐश्वर्या कोकाटे 

  परमानंद चिवडा रेसिपी

  घटक:

  १ वाटी प्रेम

  २ एक वाटी हास्य

  ३ एक वाटी कौतुक

  ४. एक वाटी मदत

  ५ एक वाटी क्षमा

  ६. अर्धी वाटी तेल [ फोडणी ला ]

  ७ एक चमचा स्वार्थ

  ८ एक चमचा ईर्ष्या

  ९ पाव चमचा द्वेष

  १० पाव चमचा राग


  कृती: 

  पहिले पाच घटक एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे . आता फोडणी च तेल तापत ठेवावं, तेल चांगलं तापलं आणि धूर सुटला कि त्यात बाकी चे चार  घटक सोडावे , उकळत्या तेलात हे घटक नाहीशे होतील , म्हणजे फोडणी तैयार समजावी , आता ही फोडणी भांड्यात जे मिश्रण आहे , त्या वर ओतावी आणि चांगले कालवावे.

  थंड झाल्यावर ह्या चिवड्याला एका डब्यात घट्ट झाकण लाऊन स्वयंपाक खोली च्या ओट्यावर ठेवावे .रोज  दुपारी , अगर संध्याकाळी कामावरून आल्यावर  चहा / कॉफी बरोबर १/२ वाटी खल्ला कि झोप फारच सुंदर लागते  आणि खरोखरच परमानंद ची प्राप्ती होते .

  बनवून आणि  खाऊन बघा आणि मला अभिप्राय नक्की कळवा !

  ऐश्वर्या कोकाटे

  पहिला पाऊस : नंदा मराठे 

  Celebrating rain by drinking third cup of tea in 3 hours.भजीपण खाल्ली असती, पण तो व्याप मलाच करावा लागेल, म्हणून तो विचार सोडून दिला.
  मोठा गाजावाजा करत अखेर, केव्हातरी पहाटे…उतरून मेघ आले …. ह्याचा आनंद आहेच. 

  पुढे वाचा :

  MY JOURNEY FROM MALWAN TO GOA BY:  Usha Dhond Malkarnekar Irvine 

  I left Malwan an hour ago. Pristine, lush green landscape of Konkan was peaceful but rather than enjoying it, 

  Read More:

  Diwali दिवाळी By: Nanda Marathe L A 

  अंगणात एका कोपऱ्यात आंब्याच्या झाडाखाली मातीचा किल्ला तयार झालेला असायचा. पटकन उगवणाऱ्या मोहोरीच्या रोपांनी किल्ला हिरवागार दिसायचा. अगदी टोकावरच्या सपाट जागेवर शिवाजी महाराज सिहासनावर कसे रुबाबात बसलेले असायचे. 

  पुढे वाचा : 

  A very informative series of articles on Yoga by : Sharad Dandekar 

  He is a yoga instructor with Yoga Bharati Foundation.

  Poem: Shashi Panat कविता : शशी पानट

  सुख आहे तरी कुठे?

  एकदा सुख माझ्या स्वप्नांत आलं

  त्यानं मला हलवुन जागं केलं

  घसा खाकरुन मोठ्या रुबाबांत म्हणालं

  "सुख हवय, सुख हवय"

  पुढे वाचा :


  कविता: शशी पानाट
  Poem: shashi Panat

  मॅनेजमंट कंन्सल्टंट

  आयला ह्या बायकांना

  काय पायजे तेबी कळत न्हाई

  फळं आना की फुलं आना,

  त्यांची कळी कांही खुलत न्हाई! १

  पुढे वाचा :

  Poem : Guruprasad Jadhav 
  कविता : गुरुप्रसाद जाधव 

  काही उरले सुरले आता गाऊन घेतो
  कंठ कोरडा होता, स्वरात न्हाऊन घेतो

  गीत पुढे जाण्याचे तरळे ओठांवरती
  किती वळोनी मागे मी तरी पाहून घेतो

  शिकविले कितीदा पोहायाचे आयुष्याने
  तरी ओढ्यामध्ये तुझ्या ओढ़ीच्या वाहून घेतो

  रेंगाळून मी रोज चालतो कितीक रस्ते
  वळणावरती तुझ्या घराच्या धावून घेतो

  नजर लागण्याजोगे उरले नाही काही
  तीट तेवढी शब्दांना मी लावून घेतो

  कष्ट कशाला नियती माझ्या घरी यायचे?
  भेट अता मी व्यथा बिथांची जाऊन घेतो

  झिंगून सारे शब्दही फिरती गरगर गरगर
  आयुष्याचे पेग कुणी का याहून घेतो?
  -मी
  —गुरुप्रसाद जाधव   तापलेल्या मस्तकातून
  नरडयापर्यंत आलेल्या शिव्या
  सभ्यतेचे घोट घेत,
  जेव्हा मी परत पाठवतो शरीरात,
  तेव्हा माझा मीच होत असतो
  त्या शिव्यांचा खरा हकदार

  माझ्या रक्तातून वाहू लागतात
  त्या मीच मला दिलेल्या शिव्या.
  अगदी कार्बनडाय ऑक्साईडसारख्या!
  रक्ताला दूषित करत
  फिरत राहतात सैरभैर...
  तेव्हा खूप वाटूनही
  मी नाही अडवू शकत त्याना.
  कारण माझे दोन्ही हात
  गुंतलेले असतात,
  चेह-यावरचा सभ्यतेचा
  मुखवटा धरण्यात

  अशातच एखादी शिवी
  माझ्या ह्रुदयात पेटवते शेकोटी
  गरम डोक्यातून आलेल्या शिविला,
  संस्कारांच्या शवागरात
  वाढलेल्या माझ्या शरीरात
  ठंडी वाजणं स्वाभाविकच आहे.
  त्यात तिचा तरी काय दोष?

  उरलेल्या चार पाच शिव्या
  माझ्या पोटात
  सुरु करतात तांडवनृत्य...
  ओरडू लागतात
  अगदी भुकेने ओरडणा-या
  कावळ्यांसारख्या
  मी त्यांची गय न करताच
  सभ्यतेचे दोन घास गिळतो.
  आणि जीव घेतो त्या
  पोटातल्या चार शिव्यांचा.
  अशी शिव्यांची कित्येक प्रेतं
  सड़त चाललीयेत माझ्या शरीरात
  आणि मी मात्र
  माझा कफन स्वच्छ ठेवण्यासाठी
  धडपडतोय!
  मागून शिव्या घालणा-या
  लोकांच्या वस्तीत...
  -मी —गुरुप्रसाद जाधव 

  सामाजिक कीड : रवींद्र बेंद्रे 

  कवीच्या प्रतिभेचे पैलू समर्थ रामदासांनी अतिशय समर्थपणे शब्दांच्या साहय्याने व्यक्त केले आहेत, ते म्हणतात कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार,सकळ सिद्धीचा निर्धार तोही कवी. मराठी भाषेचे सौदर्य मनांत रुजवण्यात कवी श्री.रविंद्र बेंद्रे म्हणजेच माझेवडील यांच्या तरल कवितांचा फार अप्रतिम सहभाग आहे. कवीचं सूक्ष्म परीक्षण, भावनांचा ठाव घेणाऱ्या शब्दांची पखरण आणि त्या कविता ऐकताना ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्यालाही 'अरे मलाही हे सांगायचे होते' ! असे जाणुन घेणाऱ्याची सहजता अगदी हीच वैशिष्ठ्ये मराठी भाषेतील कवी. श्री बेंद्रे यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते.. लहानपणापासूनच तरल निरीक्षण क्षमता व मनातील भावना शब्दातून मांडण्याचा कसब आपल्याला त्यांच्या कवितेतून दिसून येतो. हा लिखाणाचा साज त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला . तरुण वयापासून कवितेच्या माध्यमातून अनेक भावनांची रूपे मांडली आहेत. त्यांच्या सर्व कवितांचे स्वरूप एकमेकांपासून भिन्न आहेत. सर्व रसाचं प्रकटीकरण त्यांत आपल्याला दिसून येते. प्रेमरस,भक्तिरस, विरहरस, हास्यरस, विडंबन रस आणि प्रतीकात्मक राजकीय सामाजिक घटनांचा वेध अशा अनेक पैलूंचं प्रतिबिंब आपणाला त्यांच्या कवितेत पाहिला मिळते. त्यांची प्रत्येक कविता तिचे वेगळेच स्वरूप दाखवते. त्यांच्या अनेक कवितांपैकी काही कवितांचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही. उदाहरणार्थ. ताजमहल , सामाजिक कीड, भक्ती, आई, तुला मत देणार नाही, स्त्री, वार्धक्यांतील एकांतात, जीवन आणि विचार. त्यांच्या कवितेतील शब्द-शिंपले वाचल्यावर त्यातील अनुभव आपल्यालाही आला होता अशी अनुभूती तुम्हा वाचकांना होईल आणि खूप पूर्वीच्या कविता वाचल्यावर असे वाटेल कि ह्या कविता खूप पूर्वी करूनही अगदी आजच्याच आहेत अश्या वाटतात. अश्या समर्थ शब्दांचा प्रत्यय कवी श्री रविंद्र बेंद्रे यांच्या कवितांचा दीर्घकाळ मनाला टवटवीत ठेवणारा शब्द फुलांचा हार आपल्या सारख्या जाणकार काव्य प्रेमींसाठी प्रस्तुत करीत आहोत.

  - साधना बेंद्रे 


  सामाजिक-कीड

  माणसाची जात उपजात

  जन्मावर ठरवतात

  तिथेच म्हणजे खरे

  सारे लोकं फसतात.|

  माणसाची जात

  काही जन्मात नाही

  तशीच ती काही

  घराण्यातही नाही |

  माणसाची जात मनातील

  विचारात असते

  ज्याच्या-त्याच्या

  कृत्यांवरून ठरत असते |

  उच्च किंवा नीच जात

  जेव्हां ठरविली जाते

  तेव्हां त्याच्या कृत्यांकडे

  डोळेझाक केली जाते |

  ज्या समाजात कुळावरून

   जात ठरविली जाते

  त्या समाजाची नेहेमीच

  अधोगती होते |

  हे सत्य समजत असून

  लोकं आंधळे झाले आहेत

  स्वार्थासाठी कुळावरून

  जाती ठरवत आहेत |

  ज्या समाजाची ही

  वृत्ती कमी होणार नाही

  त्याची प्रगती कालांतरी

  सुद्धा होणार नाही |

  जात अन धर्माची कल्पना

  आता बदलली पाहिजे

  समाजाला लागलेली ही

  कीड मारून टाकली पाहिजे ||  


  Sandeep Kulkarni Los angeles

  Sandeep Kulkarni won the BMM [ Brihan Maharashtra Mandal] Sa re ga ma 2015 first round from Los angeles area

  Everyone enjoyed when he sang Marathi movie Natrang song " khel mandala"  

  All about him in his own words:

   I am a singer, producer and voice-over artist living in sunny Southern California; SoCal as we like to call it.  

  I grew up in Mumbai (Bombay) and was part of the city's rock music scene from 1992-1999. In particular, I was the lead vocals for Mayhem - a  heavy metal band with a wide fan base. During my tenure with Mayhem, we regularly performed at major shows, such as, Independence Rock and IIT Mood Indigo to name a few. We also performed outside of Mumbai at various shows across the country. 

  Around the same time, I began singing with a few Hindi groups covering mostly Bollywood and other regional songs. I have been part of a few bands in the US as well while singing a variety of genres in different languages.

  I am constantly learning and have undergone some Hindustani Classical training in India, Denver and at present in Los Angeles. I keep training myself in Western vocals while watching many greats thanks to everything from cassette tapes to the internet. 

  His website: http://www.sandeepkulkarni.com/

  Enjoy this video:

  Bhairavi from Prabhat Rao London 

  A rare audio clip

  बालगंधर्व रंगमंदिर opening ceremony. 
  ४ दिग्गज लोकांनी, अवघाची संसार सुखाचा करीन, हा बालगंधर्वांचा अभंग सादर केला होता. 
  आज चौघेही हयात नाहीत. 
  रेकॉर्डिंग ऐकल्यावर, त्यावेळी या चौघांनी काय धमाल केली आहे, याची कल्पना येते.
  पं भीमसेनजी जोशी, पं वसंतरावजी देशपांडे, सुधीरजी फडके (बाबूजी) आणि पेटीवर अन प्रास्ताविक.. साक्षात् पु ल देशपांडे. 
  enjoy .......

  0:00/15:52

  Gopal Marathe 
  गोपाल मराठे 

  Very nice marathi gazal by: 
  Arun Saraf

  मंदशा वाऱ्याप्रमाणे वावरावे तू जरा शुभ्र निशिगंधाप्रमाणे दरवळावे तू जरा

  तुजसवे जवळीक करण्या बघ हवा सरसावली रेशमी काळ्या बटांना आवरावे तू जरा

  रामप्रहरी स्वप्न बघणे शौक आहे पाळला जाणुनी माझे इरादे बावरावे तू जरा

  श्वास रोखुन चालता पण लागते चाहुल तुझी पैंजणाच्या वाजण्याला थांबवावे तू जरा

  रात्र काळोखी पसरली चालता घे काळजी वाट दिसण्या, काजव्यांना बाळगावे तू जरा

  गीत : निशिकांत देशपांडे संगीत : अरुण सराफ संगीत संयोजक : संदीप कुमरौथ गायक : राजन शेगुंशी


  Poem: Shashi Panat 
  कविता : शशी पानट 

  आय़ुष्य!

  देवानं दिलेलं देणं कधी कमी होत नाही

  मधुनच थांबविला तर त्याला संकल्प म्हणत नाही!

  पराभवाला ऊद्दिष्टांपासुन दूर ठेवा जरा!

  विजयामध्ये विकल्पाला नसतो कधी थारा! १

  आयुष्यांत दोन गोष्टी तुटण्यासाठीच असतात

  आपण क्षणाक्षणाला घेतो तो श्वास

  आणि आयुष्यभर करतो तो सहवास

  श्वास ’संपला’ की माणुस फक्त एकदांच मरतो

  पण सहवास नसेल तर तो क्षणाक्षणाला मरत राहातो २

  जीवनांतला सर्वांत मोठा अपराध!

  आपल्यामुळे ईतरांच्या डोळ्यांत अश्रु येणं!

  आणि आयुष्यांतलं सर्वांत मोठं यश?

  आपल्यासाठी ईतरांनी अश्रु गाळणं! ३

  आयुष्य जगणं एव्हढं सोप कधीच नसते

  संघर्ष केल्याशिवाय मोठेपण येत नसते

  कारण घणाचे घाव पडल्याशिवाय

  दगडातुन देवाची मुर्तीही तयार होत नसते! ४

  आवश्यकता लक्षांत घेवुनच जीवन जागायला हवे

  हे हवं तेही हवं ह्या हव्यासाने नव्हे!

  कारण भिका-याची आवश्यकता पुर्ण होते

  आणि राजाचा हव्यासही, अपुरी ईच्छा बनुन राहाते ५

  सकाळ ते संध्याकाळ काम करुन माणुस जेव्हढा थकतो

  त्यापेक्षा कितीतरी अधिक राग आणि

  काळजीने क्षणभरांतच थकुन जातो. ६

  ह्या जगांत कोणतीही वस्तु,

  आपल्या स्वत:साठी तयार होत नाही

  कारण:

  समुद्र: स्वत: आपल;अं पाणी पीत नाही

  झाड: स्वत:च स्वते:चं फळ खात नाही

  सुर्य: स्वत:साठी प्रकाश निर्माण करीत नाही

  फुल: आपला सुगंध स्वत:साठी नाही ऊपभोगत!

  कारण माहित आहे?

  कारण दुस-यांसाठी जीवन समर्पित करणं,

  ह्यालाच जीवन ऐसे नांव! ७

  म्हणुन मागायचच असेल

  तर ते देवाला मागा

  त्याला म्हणा अरे

  तुझी फक्त कृपाच दे, नशिब नको

  आणी जगाकडून तर अजिबात मागु नका कांहीही

  कारण दिले तर ऊपकार असतील आणि

  नाही दिले तर सारे लाजिरवाणेच की! ८

  यश कधी ’चढु’ देवु नका

  आणिे निष्क्रीयतेला थार देवु नका

  कारण यशाने येते धुंदी, नि धुंदीतुन घमेंड

  आणि निष्कामता आणते अपात्री दया

  साथ? आणि तीही आयुष्यभर?

  अरे कुणीही देत नाही!

  प्रेतयात्रेत ताटीचा खांदा देखील

  सारखे बदलत असतात लोक! ९


  A very nice hindi poem, re-written in marathi  By: Shashi Panat शशी पानट
  बल्लाळेश्वर गणपती गाणं
  Ballaleshwar Ganapati Song