मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

दिवाळी चा फराळ 


गोड शंकरपाळे(१ किलो)

साहित्य:१/२ किलो मैदा१ वाटी तूप१/४ किलो पिठीसाखर४ वेलच्यांची पूडमीठ चवीनुसारतळण्यासाठी तेल१ वाटी दुधपाणीचीरणीवेळ: १ ते १.३० तासकृती:सुवातीला तूप गरम करुन घेणे.2. मैद्यामध्ये तयार गरम तूप, पिठीसाखर, मीठ आणि वेलची पूड घालून संपूर्ण मिश्रण हाताने मळून घ्यावे.3. नंतर त्यात प्रमाणामध्ये पाणी व दुध घालून तयार पीठ व्यवस्थित मळून घेणे.4. मळलेले पीठ १-२ तास तसेच झाकून ठेवणे.5. पिठाला पोळीसारखे लाटून चीरणीने शंकरपाळ्याचा आकार द्यावा.6. शेवटी त्या गरम तेलात तळून घ्याव्यात.7. तयार झालेल्या शंकरपाळ्या सर्व्ह करा.नोंद:शंकरपाळ्या तळताना आच कमी-जास्त करावी. तेल जास्त थंड झाल्यास पदार्थ तेलकट होतात.मुंग्यांचा उपद्रव टाळण्यासाठी साठवणीच्या ठिकाणी कडूनिंब किंवा कापूर ठेवावे.
〰〰〰〰〰〰〰
खारे शंकरपाळे(१ किलो)

साहित्य:१/२ किलो मैदा१०० ग्राम तूप (किंवा डालडा)४ चमचे जीरेमीठ चवीनुसारतळण्यासाठी तेलपाणीचीरणीवेळ: १ ते १.३० तासकृती:सुवातीला तूप गरम करुन घेणे.मैद्यामध्ये तयार गरम तूप, मीठ आणि जिरे घालून संपूर्ण मिश्रण हाताने मळून घ्यावे.नंतर त्यात प्रमाणामध्ये पाणी घालून तयार पीठ व्यवस्थित मळून घेणे.पिठाला पोळीसारखे लाटून चीरणीने शंकरपाळ्याचा आकार द्यावा.शेवटी त्या गरम तेलात तळून घ्याव्यात.तयार झालेल्या शंकरपाळ्या सर्व्ह करा.नोंद:शंकरपाळ्या तळताना आच कमी-जास्त करावी. तेल जास्त थंड झाल्यास पदार्थ तेलकट होतात.
〰〰〰〰〰〰〰
शेव

साहित्य:४ वाट्या डाळीचे पीठ३ चमचे तिखट१/४ चमचा हळद१ चमचा मीठ१/४ चमचे हिंग३ चमचे तेलाचे मोहन१ चिमुट सोडा१ चमचा जिरे१/२ चमचा ओवा१०-१२ लसुन पाकळ्यावेळ: १ ते २ तासकृती:सर्वप्रथम जिरे, ओवा व लसुण मिक्सरमध्ये बारीक वाटावे.परातीत पीठ घेऊन त्यात हळद, तिखट, मीठ, हिंग, सोडा एक करावे.तेल कडकडीत तापवून पिठात ओतावे व एकत्रित करावे. नंतर त्यात वाटलेले लसुण, जिरे, ओवा एक करुन कोमट पाण्यात पीठ भिजवावे.शेवेच्या साच्यात पीठ भरुन कढईत तेल चांगले तापल्यावर मंदआचेवर शेव तळून घ्यावी.दोन्ही बाजूंनी शेव गुलाबी व कुरकुरीत झाली कि झाऱ्याने शेवेची चकती बाहेर काढून तेल निथळवावे व पेपरवर टाकावी.याप्रमाणे सर्व शेव करावी आणि नंतर हाताने कुस्करुन डब्यात भरावी.तयार शेव खाण्यासाठी सर्व्ह करा.
〰〰〰〰〰〰〰
अनारसे

साहित्य:१ कप तांदूळ१ कप किसलेला गूळ१ चमचा तूपखसखसतळण्यासाठी तूप किंवा तेलवेळ: १ तासकृती:४ दिवस सलग तांदूळ पाण्यात भिजवून ठेवावे. रोज पाणी बदलणे.४ दिवस झाले कि चाळणीत कपडा ठेऊन तांदूळ त्यात टाकावे. यांना व्यवस्थित सुकवावे आणि नंतर मिक्सर मधून काढून घेणे.गूळ किसून १ चमचा तूप त्या पिठात मळावे. घट्ट गोळा ५-६ दिवस डब्यात ठेवावा.सहाव्या दिवशी पीठ बाहेर काढणे. पिठाचे बारीक गोळे तयार करुन ते जाड लाटावे वरुन खसखस लावावी आणि तळण्यासाठी तूप किंवा तेल वापरुन त्यात खसखस असलेली बाजू वर ठेऊन तळावे.अनारसे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळावे.
〰〰〰〰〰〰〰
चकली(२ किलो)

साहित्य:१ किलो तांदूळ१/४ किलो चणाडाळ१०० ग्राम मुगडाळ१०० ग्राम उडीद डाळ५० ग्राम पोहे५० ग्राम शाबुदाणे५० ग्राम जीरा५० ग्राम काळीमिरी१० ग्राम लाल मिरची पावडर५० ग्राम पांढरे तीळ१ छोटी वाटी गोडेतेलमीठ चवीनुसारतळण्यासाठी तेल (साधारण १ ते दीड किलो)पाणीवेळ: २-३ तासकृती:प्रथम तांदूळ, चणाडाळ, मुगडाळ, उडीदडाळ, पोहे, शाबुदाणे, जीरा, काळीमिरी १०-१५ मिनिटे कढईमध्ये भाजून घेऊन दळून आणणे.दळून आणलेले पीठ पातेल्यात मोजून घेणे.पिठाच्या निम्मे पाणी उकळत ठेवणे.पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात १ छोटी वाटी तेल टाकणे व पांढरे तीळ टाकणे.चवीनुसार प्रमाणामध्ये मीठ व मिरची पावडर पाण्यात टाकून पाणी खाली उतरावे.दळून आणलेले पीठ पाण्यात घालून मिश्रण हलवून घ्यावे व नंतर १० मिनिटे पिठावर झाकण ठेवावे.नंतर ते मळून चकलीच्या साच्याने चकल्या पाडाव्यात.१ किलो तेल तळण्यासाठी तापत ठेवावे.साच्याने पाडलेल्या चकल्या तेलात तळून घेणे.तयारझालेल्या चकल्या सर्व्ह करा.नोंद:चकल्या तळताना मंद आचेवर तळाव्या म्हणजे कुरकुरीत होतात. तळताना आच कमी-जास्त करावी. तळताना तेल थंड झाले तर चकली विरघळून तुटेल व तेलही जास्त ओढून घेईल.
〰〰〰〰〰〰〰
करंज्या(१ किलो)

साहित्य:१ किलो मैदा१/२ किलो पातळ वनस्पती तूप१ किलो रवा१/२ किलो सुके खोबरे किसून५० ग्राम खसखस३/४ किलो पिठीसाखर५० ग्राम वेलच्या१ जायफळ पूडचवीनुसार मीठ (१ चिमुट)५० ग्राम चारोळ्या५० ग्राम काजू५० ग्राम बेदाणे५० ग्राम सफेद तीळवेळ: ३ ते ४ तासकृती:सारण:आता सारण तयार करण्यासाठी रवा कढईत तूप घालून एक गुलाबी रंग येईपर्यंत भाजावे.सुके खोबरे किसून कच्चेच मिक्सरमध्ये कोरडेच बारीक करुन घ्यावे.नंतर खोबरे कोरडेच कढईत मंद आचेवर किंचित गुलाबी रंगावर भाजावे. जास्त गुलाबी भाजू नये.खोबरे भाजल्यावर ते भाजलेल्या रव्यात मिसळावे.खसखस गुलाबी भाजून ती रव्यात मिसळावी.रवा व खोबरे थंड झाल्यावर त्यात वेलची जायफळ पूड, मीठ व पिठीसाखर बारीक करुन मिसळावी.सफेद तीळ, काजू, चारोळी, बेदाणे सर्व मंद आचेवर तूप घालून गरम करून तयार झालेल्या रव्याच्या सारणामध्ये घालून मिक्स करून घ्यावे. सारण तयार झाले.
〰〰〰〰〰〰〰
बेसनचे लाडू(१ किलो)

साहित्य:१/२ किलो चणा डाळीचे जाडसर पीठ१ वाटी वनस्पती तूपदीड वाटी साखर५-६ वेलच्याथोडं जायफळ२ चमचे चारोळी१५-२० बेदाणेवेळ: १ ते २ तासकृती:सर्व प्रथम कढईत तूप तापवा.तूप तापल्यावर डाळीचे पीठ घालून सतत परतत राहा. परतताना चमच्याने पीठ दाबून पिठाच्या गुठया मोडत राहाव्यात.मंद आचेवर २०-२५ मिनिटे बेसन परतावे. बेसन भाजत आले कि बेसन मधून तूप सुटू लागते.परतताना तूप चमकू लागले व बेसन लाल रंगाचे होऊन खमंग वास सुटला कि बेसन ताटात ओतावे.बेसन थंड झाल्यावर साखर मिक्सरमध्ये दळून मिसळावी.तसेच वेलची-जायफळ पाउडर, चारोळी घालून बेसन हाताने मळावे व एकेक लाडूला एक बेदाणा लावून लाडू वळावेत.तयार लाडू खाण्यासाठी सर्व्ह करा.नोंद:कोणत्याही लाडवाचा भाजा भाजताना वनस्पती तुपा ऐवजी साजूक तूप घेतल्यास कमी लागते व लाडू खमंग होऊन मऊ राहतात.
〰〰〰〰〰〰〰
बाकरवडी

साहित्य:२ कप मैदा२-३ मोठे चमचे बेसन (चणा पीठ)चवीपुरते मीठ१ ते दिड चमचा तेल१ छोटा चमचा ओवासारणासाठी:१ मोठा चमचा बेसन१ छोटा चमचा तीळ आणि खसखस१ छोटा चमचा आले किसून१ ते दिड चमचा लसूण पेस्ट३ चमचे लाल तिखट१ ते दिड चमचा पिठी साखर१ छोटा चमचा गरम मसाला१ चमचा धणे पूड१ छोटा चमचा बडिशेप१ चमचा किसलेले खोबरे (सुके खोबरे)३-४ मोठे चमचे बारीक शेवमीठवेळ: १ तासकृती:मैद्याची पोळी:मैदा आणि बेसन एकत्र करून त्यात मीठ आणि ओवा घालावा.तेल गरम करून पीठात घालावे. आणि पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. आणि झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे.सारण:सर्व प्रथम तीळ आणि खसखस तव्यावर थोडी भाजून घ्यावी.सारणासाठी दिलेले सर्व पदार्थ एकत्र करून १ चमचा तेलावर थोडे परतून घ्यावे.बाकरवडी:सारण तयार झाल्यावर भिजवलेल्या मैद्याची एक पातळ पोळी करून १-२ चमचे सारण त्यावर समान पसरावे.आणि घट्ट रोल करावा.. (जर रोल घट्ट नाही झाला तर त्यातील सारण बाहेर येते.)सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावे.गरम तेलामध्ये गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत.बाकरवडया थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात
〰〰〰〰〰〰〰
रव्याचे लाडू(१ किलो)

साहित्य:१/२ किलो बारीक रवा१/२ किलो तूप१/४ किलोपिठीसाखर१ चमचावेलची व जायफळ पूड१/४ किलो सुखा किसलेला खोबरंशोभेसाठी मनुका किंवा काजूमीठ चवीनुसारपाणीवेळ: २ तासकृती:प्रथम खोबरं लालसर भाजून घ्या.१०० ग्राम तुपात रवा लालसर भाजून घेणे.भाजलेला रवा थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, जायफळ, वेलचीपूड, भाजलेलं खोबरं , मनुका आणि काजू घालून मिश्रण एकत्रित करावे.उरलेले तूप गरम करुन त्या मिश्रणात ओतावे आणि मिश्रण एक करावे.मिश्रण थोडे थंड झाल्यास लाडू वळण्यास घ्यावे.तयार झालेल्या रव्याचे लाडू सर्व्ह करा
〰〰〰〰〰〰〰
पोह्यांचा चिवडा(१ किलो)

साहित्य:१ किलो पातळ पोहे१/४ किलो शेंगदाणे१०० ग्राम चण्याच्या डाळीम्बी२ वाटी सुक्या खोबरयाच्या पातळ चकत्या१ वाटी सोललेल्या लसूण पाकळ्या२५ ग्राम राई२ चमचे हळद१/२ वाटी साखर१०० ग्राम हिरव्या मिरच्या (बारीक कापलेल्या)कडीपत्ता फोडणीसाठी२०० ग्राम तेलचवीनुसार मीठवेळ: १ ते १.३० तासकृती:सर्वप्रथम पोहे मंद आचेवर कुरकुरीत भाजून घेणे.नंतर भाजलेले पोहे चाळून घेणे.शेंगदाणे, खोबरयाच्या चकत्या व डाळीम्बी तेलात तळून घेणे.तळलेले शेंगदाणे, खोबरयाच्या चकत्या व डाळीम्बी भाजलेल्या पोह्यांमध्ये एकजीव करुन घेणे.कढईत तेल टाकून लसुण लालसर होईपर्यंत तळणे.तळलेल्या लसणीमध्ये मिरच्या, राई, कडीपत्ता आणि हळद घालून फोडणी तयार करा.ही फोडणी गार झाल्यावर त्यात हळद घालून वरील पोह्यांच्या मिश्रणात टाकून एकजीव करुन घेणे.नंतर त्यात साखर आणि मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करा.तयार मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.तयार चिवडा सर्व्ह करा.नोंद:पोह्यांचा चिवडा करताना तेल चांगले तापल्यावर गाळणीत थोडे थोडे पोहे घालून तळावेत म्हणजे चटकन फुलतात व तेलकटही होत नाहीत. कमी आचेवर पोहे तळू नका.


संकलन : श्री  प्रशांत वोर्लीकर , मुंबई