Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

श्री

Marathi Culture and Festivals

Invitation to send entries for Diwali digital Magazine - 2018

Namaskar,

We invite you to send articles, travel experience, interview, recipe, event news, story, poem, Charolya, Diwali related jokes, or festival information to be published in the upcoming Diwali magazine. This is a good chance to showcase your talent to thousands of readers worldwide and a very good platform for bloggers and writers. Following are the guidelines:


1.  You can write in Marathi or English language and the word limit for the article is 1500 words.

2. You are encouraged to send original and copyright free pictures with your article.

3. If you have published the same article/ story in any media, do send your original copy [word document] and not the newspaper or magazine clips. We prefer the entries which are never published before.

4. You will be the sole proprietor/owner of the material/articles you send and subject to copyright laws.  Editors will not take any responsibility for the content in the articles and there is no payment for articles published in the e-Diwali ank/magazine.

5. Any article/poem sent to Marathi Culture and Festivals should not incite hatred for any religion or any person and jokes should not be targeted at any political leader or group.


6. Send your articles on [email protected] - Please write “ Diwali edition 2018” in subject line.

Last date of submission is July 30,2018


 We do have a limited space available for advertisements; if you want to advertise your business, please do contact us via email: [email protected]. The advertisements in the edition will be subject to approval from the editors.


We are accepting original  audio / videos of music, dance or a small skit. Make sure these are copyright free and have not been published before, and have not been uploaded on YouTube.


Kids Section: 

Hello young friends and their parents!

We are accepting entries form Marathi background NRI kids and young adults.

This can be a wonderful summer vacation project and a great opportunity for your children and young adults to share their talent on a global platform. Get ready to participate and have fun. You can express yourselves in many ways. You can send us an article, a short story,  a poem or travel experience/s about your favorite Indian festival such as Diwali. The entries could be in English or Marathi.

Age groups and suggested topics are as follows, however, feel free to send relevant material in any format.

 

Suggested age groups and presentation guidelines:

 

Up to 6 years - Digital photo of a drawing or painting.

Picture should be of a 300 dpi or better digital quality.

7-12 years- Short story, travel experience or a poem

13-17 years - Your involvement in any or many Indian festivals and cultural events, short story or a poem

The article or story should not exceed 500 words.

Editors will select the best available creations and their decision will be final.

 

Please send your digital pictures and /or articles to :

 

Mrs. Smita Dandekar  [email protected]

Mrs. Sheetal Rangnekar [email protected]

 

 

लेखकांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :

आपण आपले लिखाण मराठी अथवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेमध्ये लिहू शकता. सदर लेख, कथा पाठवण्यासाठी शब्द मर्यादा अंदाजे १५०० शब्दांची आहे, कृपया 1500 शब्द मर्यादेवर लक्ष असू द्या. या मर्यादेपेक्षा खूप मोठे लेख वगळले जाऊ शकतात.

 

 

तुमच्या लिखाणासोबत त्या विषयाचे काही फोटोज पाठवलेत तर ते स्वागतार्ह आहे, मात्र ते फोटोज हे तुमचे स्वतःचे असावेत. त्यावर कुठलाही कॉपीराईट नसावा याची मात्र दक्षता घ्यावी.

आपल्या लेखनाचा विषय शक्यतो संस्कृती, उत्सव, दिवाळी या विषयाशी निगडीत असावा. अर्थात ही काही अट नाही. संपादकीय मंडळाच्या अनुमतीने इतर विषयांवरील लिखाण सुद्धा प्रसिद्ध केले जाईल. आपल्या साहित्यातून कोणत्याही विशिष्ट धर्मीयांची टिंगल, टीका अथवा कोणत्याही व्यक्तीवर टीका असू नये. आपण दिवाळीचा निखळ आनंद घेणार आहोत त्यामुळे व्यक्तिगत अथवा धार्मिक टीका-टिपण्णी करू नये. निखळ मनोरंजन हा आपला कायम हेतू असावा.


जर आपले लिखाण याआधी कुठे प्रकाशित झालेले असेल तर त्या लिखाणाची मूळप्रत ( वर्ड फाईल ) पाठवावी. आधीच्या वृत्तपत्र अथवा मासिकातील लेखाची Pdf फाईल पाठवू नये.

या अंकात प्रसिद्ध झालेल्या सर्व साहित्याची तसेच त्यात व्यक्त केलेल्या मतांची संपूर्ण जबाबदारी ही त्या लेखकाची राहील. संपादक मंडळ कोणत्याही मतांची अथवा माहितीची जबाबदारी घेत नाही. आपण पाठवलेल्या साहित्याची मालकी ही सुद्धा त्या लेखकाचीच असेल.

या दिवाळी ई-विशेषांकात कोणते साहित्य प्रसिद्ध करायचे आणि कोणते साहित्य नाकारायचे याचा अंतिम निर्णय हा सर्वस्वी संपादकीय मंडळाचा असेल.

ही वेबसाईट आणि हा सर्व उपक्रम उत्स्फुर्तपणे सादर कलाविष्कार आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही लेख, कविता, विनोद अथवा कोणत्याही साहित्याचे पैसे अथवा मानधन देत नाही.

या वेबसाईटवर जाहिरातींची गर्दी अजिबात नसते. खूपच कमी जागा जाहिरातींसाठी आहे. ही वेबसाईट चालवण्यासाठी येणारा खर्च भागेल इतक्याच रकमेच्या जाहिराती आम्ही स्वीकारतो. त्यामुळे आपण कोणती जाहिरात करू इच्छित असाल तर संपादक मंडळाला तसे कळवावे म्हणजे आपल्या जाहिरातीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. जाहिराती संबंधित चौकशी ह्या ई-पत्या वर पाठवावी : [email protected]


आपल्या इ दिवाळी अंकासाठी आम्ही ऑडीओ  / विडीओ पण सामील करणार आहोत. तेव्हा तुमचा स्वतःचा कुठेही प्रसिद्ध न झालेला संगीत, नाच किंवा एखादा छोटासा नाट्यप्रवेश असलेला व्हिडीओ किंवा ऑडिओ क्लिप आम्हाला जरूर पाठवा. सादर ऑडिओ/व्हिडीओ हा तुमचा स्वतःचा असावा आणि तो यु ट्यूबवर देखील प्रसिद्ध झालेला नसावा.

वरील सर्व साहित्य अथवा आपण [email protected] या मेल वरती पाठवाव्यात आणि विषय :  दिवाळी-ई-एडिशन २०१८ असे लिहावे.


लेख पाठविण्याची अंतिम तिथी जुलै ३०, २०१८                                                                             

तर तमाम मराठी बंधु-भगिनींनो मोठ्या संख्येने आपले साहित्य आम्हाला पाठवा आणि जगभरातल्या आपल्या वाचक वर्गाला यंदाच्या दिवाळीला आपण हा अत्यंत चविष्ट आणि विविध रसांनी युक्त असा साहित्य फराळ भरभरून देऊयात


बालविभाग:


चिमुकल्यांनो आणि कुमारांनो

 

मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स च्या दिवाळी २०१८ अंकात तुम्ही पण सामील व्हावे. अमेरिकेत आता उन्हाळ्याच्या सुट्या सुरु होतील आणि  ह्या सुट्टीत आपण काहीतरी रचनात्मक करूयात. ह्या दिवाळी अंकात आपलं गुण दर्शन करूया! चला तर मग , आपल्या आई -बाबंची , आजी -आजोबांची मदत  घ्या  आणि आम्हाला तुमचे लिखाण , कलाकृती इत्यादी पाठवा. या वर्षी आम्ही भारताबाहेर वास्तव्य असणाऱ्या बालमंडळींकडून साहित्य व कलाकृती  स्वीकारीत आहोत. वयो गट खालील प्रमाणे आहेत.


वर्ष ६ पर्यन्त कलाकृती

वर्ष ७-१२ कविता , कहाणी , पर्यटन

वर्ष १२-१७ तुमचा आवडता सण, वृत्तांत , मनोगत

 

वरील लिहिलेल्या विषयांव्यतिरिक्त पण काही वेगळाच विषय असेल तरी चालेल .

 

लिखाण - शब्द सीमा ५०० आहे.

चित्र - ३०० dpi अगर उच्च quality चे असावेत

संपादाकांचा निर्णय अंतिम असेल आणि त्या बाबत कुठलेही पत्र व्यवहार करू नयेत.

साहित्य पाठविण्याची अंतिम तिथी जुलै ३०,२०१८ आहे .

खालील इमेल वर पाठवावेत , तुम्हाला काही प्रश्न असल्यास सुद्धा ह्यांना संपर्क करावा:

 

सौ. स्मिता दांडेकर  [email protected]

सौ. शीतल वागळे   [email protected]



Thank you

MCF Editorial Team,

Diwali digital magazine  2018


Last year's magazine for your Idea:

DIWALI MAGAZINE 2017

https://issuu.com/marathicultureandfestivals/docs/diwali_ank_semi_final_copy_2017