Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

कालनिर्णयाच्या पानावर सहा तारखेकडे पुन्हा एकदा नजर टाकली .सकाळच्या कोवळ्या गरम उन्हात खुर्ची टाकून त्या अंगणात चहाचा कप घेऊन बसल्या…

अंगणातल्या बागेतल्या जांभळाच्या झाडाखाली वेताच्या टेबलावर त्यांनी चहाचा कप विसाव्याला ठेवला .पानांच्या सावल्यांच्या नक्षीतून कोवळी किरणे डोकावत त्यांच्या चेहऱ्यावर चमचमत होती. त्यातलं एक कोवळलासा कवडसा त्यांच्या सुरकुतलेल्या मनगटावर नाचू लागला,त्यांनी हळुच तो हातांच्या ओंजळीत पकडला. त्या उन्हाच्या हळ्दुल्या रंगाचा त्यांच्या गोऱ्यापान तळहातांवर इवलासा ठसा उमटला. त्या गमतीने हसल्या उन्हाला म्हणाल्या ,"चल,जाते आता ,चहा संपला बघ माझा"….

उन्ह थोडसं हिरमुसलं ,आज्जी मग आणखी हसल्या "अग बाई ,केव्हढा तो राग तुझ्या नाकावर" असं म्हणत,चहाचा कप उचलून घरात गेल्या. देव्हाऱ्यातल्या

माईच्या फोटोकडे बघून त्यांनी डोळे मिटले,एक खोल श्वास घेतला आणि फुलांच्या परडीतलि प्राजक्ताची ओंजळभर फुले माइंच्या फोटोशी ठेवली.

एव्हढ्यात खिडकीशी चिवचिवत चार चिमण्या आल्या .त्याना चार तांदळाचे दाणे टाकून झाले ,"अग्ग बायानो जरा हळू वेचा न दाणे आणी किती कलकलाट कराल बाई! " हसत हसत त्या गच्चीत गेल्या,ताटावरचे झाकण बाजूला करून त्यांनी ,त्यातले सांडगे हळु हातांनी सुलटे केले ,त्यातल्या रंगीत सांडग्यांचं रुपडं पहात मनोमन खुश झाल्या.

हळकुंडे दळून आणली,तिखट कांडून आणले,मेतकुट केले,भाजाणि केली,मनातल्या मनात त्यांनी झालेल्या कामांची उजळणी केली,अता फक्त सहा तारीख कधी येते आणि ……………

इरा ,त्यांची एकुलती एक पुतणी, दुर देशाहून येणार ,म्हणून त्यांनी कित्येक महिने तयारी सुरु केली होती . तिने तिकडेच मराठी मुलगा पसंत केला होता आणि आता लग्न करायला दोघेही भारतात येत होते. आजीनी तिचा दहा पंधरा वर्षात चेहराही पहिला नव्हता ,कशी दिसत असेल ती? ओळखेल का आपल्याला? पाहिल्या पाहिल्या ?…………

त्यांनी मग तो विचार बाजूला ठेवला ,कपाट उघडुन तिच्यासाठी घेतलेल्या साड्या,लग्नाचे दागिने पहात बसल्या.माई असती तर आपल्या लेकीसाठी तिने अश्याच घेतल्या असत्या साड्या ,तिच्या लेकीसाठी तिने जेव्हढ केलं असतं तेव्ह्ढ आपण करायचं ,कुठे कमी नाही करायचं ,त्यांनी मनोमन ठरवलेलं ….

सहा तारीख उजाडली,उत्सुकतेची परिसीमा !वाट पाहून थकलेले डोळे , त्या लौकर आवरून विमानतळावर पोचल्या ,काठी टेकत हळु हळु चालत त्या स्वागत कशाच्या बाहेर एका बाकावर बसल्या…. ,कोवळ्स उन त्यांना तिथेही भेटायला आलं,पण आज्जीना आता त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता ,आजू बाजूला नाचून ते निघूनही गेलं …

भावी जावयाच्या घरातली ही झाडून सगळी मंडळी जमा झालेली.सगळ्यनि आजींची विचारपूस केली,हळु हळु त्यांचा स्वत:चा अड्डाच तयार झाला आणि त्यांच्या आपापल्या गप्पा सुरु झाल्या एव्हढ्यात इरा आणि तिचा भावी नवरोबा यथावकाश मोठ्या मोठ्या ब्यागा घेऊन ,बाहेर आले…

सारे धावत जाउन त्यांना कडकडून भेटले,आज्जी काठी टेकत कशा बशा तिच्या पर्यंत पोहोचल्या ,दोघानी पटकन वाकून त्यांना नमस्कार केला.इराला मिठी मारतना आज्जिञ्चा बांध फुटला,किती वर्षांनी आपल्या लाडक्या लेकीसारख्या असलेल्या आपल्या पुतणीच्या उबदार हातात त्यांनी आपले हात दिले .त्यातला कोमट उन्हाचा हळ्दुल ठसा तिच्या हातात उमटुन गेला.

इरा काकू आज्जीच्या घरी आली . इराची चिव चिव ,तिला साड्या दाखवणं ,दागीने दाखवणं ,आज्जीच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता …………….

बघत बघता मुहुर्ताचा दिवस आला,नौवारी साडीतली इरा ,तिने निवडलेला तिचा गोड नकटा नवरा ,बोहोल्यावर चढले.

पंधरा दिवसात दोघांच्या परतीचा दिवस आला ,आज्जीनी सगळं सांडगे,मेतकुट,तिखट छान झिपलॉकच्या पिशव्या बंद करून बांधून दिलं ,इराच सासर एअरपोर्ट जवळ होतं त्यामुळे साहजिकच इरा तिकडूनच निघाली,आज्जी लग्नाच्या दगदागिने जराश्या आजारी पडल्या ,त्यामुळे तिला एअर पोर्ट वर पोचवायला त्यांना इराने सक्त मनाई केली .

त्यामुळं नाइलाजाने त्यांनी फोन वरतीच तिला हजारवेळा टाटा केलं …

आता ती पुन्हा परत यॆइल?

मी तर काय तिच्या दृष्टीने तिची लांबची काकू …माझं आईपण तिला पोहोचलं असेल?

केवळ फोन वरून होणारं बोलणं …तिची शिक्षणाची इतकी वर्ष…. त्यामुळे येत नाही आल तिला ,शिवाय आई वडिल नाहीत फक्त आपण एक एकुलत्या एक काकू ………।

पण हा बंध टिकेल ? ती संसारात रमेल… मुले झाली कि त्यांची आई होईल … आठवेल तिला? तिची काकू?

आणि आपला काय भरवसा …। आपलही वय आता… त्यांनी सुस्कारा सोडला….

घड्याळात नजर टाकली………. विमान उडुन गेले असेल.

अस्वस्थपणे त्या  देव्हाराशी गेल्या ,उगाचच तीन चारदा माइञ्च्या फोटोकडे पाहिलं ………….

अन एव्हढ्यात त्यांच्या लक्षात आलं………. समोरच्या शेल्फमधलं कैरीचं लोणचं तसंच तिथल्या तिथेच !अर्रे देवा इराचं आवडतं ,तिच्यासाठी केलेलं तसच उरलं,विसरलं ;तिला द्यायचं राहुंनच गेलं सगळ्या गडबडीत!

सकाळचं कोवळं उन्ह त्या बरणिवर पडल्याने आतलं लोणचं असं सुरेख दिसत होतं …………

इराच विमान दूऊऊऊऊऊऊऊऊऊउर आकाशात झेपावत होतं. नवरोबाच्या हातात हात घालून इरा भावी संसाराचं स्वप्न पाहत होती,काकू आज्जीच्या लोणच्याची तिला बिचारीला काहीच आठवण ,कल्पना नव्हती!