मगच लोकांना त्या हुतात्म्याबद्दलची माहिती कळली. एव्हढेच नवे तर हेही कळले कि, हा थोर पुरुष आपल्याच नगरातला होता.
काही दिवस मजेत गेले.
एका पहाटे
कोणा चाणाक्षाला साक्षात्कार झाला कि त्या थोर पुरुषाच्या गळ्यात चुकून चपलेचा हार
घातला आहे, मग त्याने सर्वाना बोलावून झाल्या गोष्टीची प्रचीती दाखवली. काही
मिनिटातच लोकांची गर्दी पुतळ्याजवळ जमली. ही गर्दी एव्हढी होती कि, त्या पुतळ्याच्या
अनावरणासाठीही एवढे लोक जमले नव्हते. क्षणात
आणखी एक भाषण झाले. जोशाने झालेले हे भाषण संपताच एकदम दगडफेक सुरु झाली. दिसेल त्या वाहनावर आक्रमण झाले. लोक सैरावैरा
पळू लागले. ह्या निषेधकर्त्यांनी लहान मुले, स्त्रिया यांनाही न जुमानता दंगल
माजवली. ह्या सर्व दृश्याला तो थोरपुरुष (पुतळा) एकमेव साक्षीदार होता. थोड्याच
वेळात पोलिस फौज आली. लाठीमार, गोळीबार झाला. ७-८ निष्पापांचे जीव गेले. निषेध सभा,
बंद झाले व एकदाचे हे बंदच बंद झाले.
कालांतराने अशाच आणखी एका पहाटे त्याच नगरातील लहान मुलाने पहिले तर त्याला दिसले कि त्याच पुतळ्यावर दोन कावळे घाण करीत आहेत. झाले त्यानेही बोंबाबोंब केली. लोक जमले मग फतवा निघाले कि कावळ्यांवर दगडफेक करा. निषेध म्हणून कावळ्यांवर दगडांचा वर्षाव झाला. क्षणातच २-४ अबोल प्राण्यांचे जीव गेले. एवढ्यात एका सुज्ञ मनात विचार आला कि सगळे कावळे मारले गेले तर पिंडाला कोण शिवणार ? आणि क्षणात हा विचार सर्वांना भावला. मग ठरले कि, नगरातल्या देवालाच साकडे घालायचे. तोच ठरवेल योग्य काय ते. सर्वजण देवळात गेले. देवाने दृष्टान्त दिला. लोकांना विचारले, बाबारे ह्या कावळ्यांना का म्हणून मारता. त्यांच्यासाठी सर्व भूमी हा भूमंडळ एकच. कशावर घाण करायची एवढ कळायला तो मानव थोडाच आहे. देव पुढे म्हणाला, कि मी मनुष्यरूपी निर्माण केलेले अनेक कावळे समाजात आहेत. त्यातले बहुतेक मंत्रालयात आहेत. ते तर टाळूवरचे लोणी खातात. मी निर्माण केलेला कावळा हे करत नाहीत तर फक्त पिंडाला शिवतात. कोणाला नाहक मारत नाहीत, राजकरणात खेळत नाहीत. तेवढ्यात एका मंत्र्याने देवाला सांगितले कि, तरी पण आम्ही कावळ्याला मारणार. देव म्हणाला ठीक आहे मारा, पण उद्यापासून पिंडाला मंत्रीच शिवू देत.
एवढ्यात एका चाणाक्ष लहान मुलाने निष्पापपणे देवाला विचारले, देवा, हा मंत्री मेल्यावर ह्याच्या पिंडाला कोण शिवणार ? देव निरुत्तर झाला. आजही म्हणूनच मंत्रालयात विधानसभेत, विधानपरिषदेत कावकाव ऐकू येते.
- डॉ. हेमंत श्री. जोगळेकर
- मुलुंड (पूर्व), मुंबई-८१