Devotional Singers group from Konkan
" Devotional songs means a music composition sung to generate positive energy and to get blessings of God."
Konkan or the Konkan Coast is a rugged section of the western coastline of India.
The precise definition of Konkan varies, it is roughly the land between the Western Ghats and the Arabian Sea, and between the Tapi river in the north and the Chandragiri river in the south. It includes the following districts of modern India: Thane, Mumbai, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, North Goa, South Goa.
Konkan has a lot of devotional groups who compose and sing those devotional songs in various groups, especially around Ganesh Chaturthi . These groups follow a special format to compose and sing these songs along with dance. Gan, Stavan, Abhang, Golan, Kavvali,
Bharud are popular formats which coincides in "Gajar".
As Ganesh chaturthi is around the corner [ Aug 29 ] and they have a lot of these devotional songs in store, we will upload selected ones for all the readers to enjoy.
कोकणातील भजन मंडळे
भजन म्हणजे भक्ती. या भक्तीत एकरूप होण्यासाठी टाळ-मृदंगाच्या साथीने रंगून जाणं, ही कोकणची खासियत. गणेशोत्सवात तर या भजनांना अधिकच रंग चढतो. गणेशोत्सवाच्या रात्री भजनाच्या साथीने सजतात, जागविल्या जातात. महिनाभर आधीच नवी गाणी, नवी बारी बसवण्यासाठी भजन मंडळांची तयारी सुरू होते. तबला, मृदंग सजवणार्या कारागिरांची लगबगही वाढते. चतुर्थीच्या रात्री गॅस बत्तीच्या उजेडात टाळ-मृदंगासह भल्या मोठ्या पायपेटीचं ओझं घेऊन लगबगीनं वावरणारी भजनी मंडळं बघितली की, या भजन कलेबद्दल अप्रूप वाटायला लागतं. कोकणात प्रत्येक वाडीवर आता भजनी मंडळं असतात. गावातील माहितगाराच्या मार्गदर्शनाखाली किंवा बाजारात येणार्या मान्यवर बुवांच्या कॅसेट ऐकून आपल्या भजन बार्या बसवल्या जातात.
मध्यंतरीच्या काळात काहीशी मागे पडलेली भजन कला आता वाढत्या स्पर्धांमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ही कला आता व्यावसायिक रूप घेत आहे. पूर्वी केवळ चतुर्थीतच ऐकू येणारी भजन बारी आता वर्षभर विविध कार्यक्रमांची रंगत वाढवताना दिसते. आता तर भजन कलाकार संघटितही होऊ लागले आहेत. कालानुरूप चित्रपटातील गाण्यांमध्ये बदल घडत गेले तरी पूर्वापार चालत आलेला भजनी साचा तसाच राहिला आहे. गण, स्तवन, नोटेशन रूपकामधला गजर, अभंग, गौळण, कव्वाली किंवा भारूड आणि शेवटचा गजर असं भजनाचं रूपडं तर गाणं म्हणणारा बुवा, मृदुंगमणी, चक्कीवाला (तालरक्षक) कोरस अशी भजनी मंडळी! 'जय जय राम कृष्ण हरी'ने सुरू झालेलं, उत्तरोत्तर कव्वाली, गजरात रंगत जाणारं भजन ऐकून मन तल्लीन होतं