मराठी व हिंदी सिनेमातील आपल्या चरित्र भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलेल एक नाव म्हणजे ललिता पवार. आज ललिता बाईंचा 99 वा जन्मदिन. जुन्या काळात असा कोणताही चित्रपट नसेल ज्यात ललिताबाईनी काम केल नसेल. ललिता बाईंचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी नाशिक जिल्ह्यात झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यानी राजा हरिश्चंद्र ह्या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर प्रवेश केला. नंतर अनेक मूकपटात त्यानी नायिकेच काम केल. 1942 साली ''जंग-ए-आझादी'' ह्या फिल्मच्या चित्रीकरणावेळेस मास्टर भगवान ह्याना ललिता पवार ह्यांच्यावर थप्पड लागावण्याचा एक सीन होता,परंतु दुर्दैवाने मास्टर भगवान ह्यांच्या हातून इतकी जोरदार थप्पड ललिताबाईना बसली की त्यांचा डावा डोळा प्यारलाईज्ड होऊन कायमचा अधु झाला. जवळपास तीन वर्षाच्या अथक उपचारानंतर ललिताबाई पुन्हा उभ्या राहिल्या. पण ह्या चित्रपट सृष्टीत चेहरा हाच महत्वाचा असतो. त्या अधु डोळ्यामुळे त्यांच्या दिसण्यात एक रागीट भाव दिसू लागला, व त्याना मुख्य नायिकेच काम सोडून चरित्र भूमिका कराव्या लागल्या. ललिताबाई काही हार मानणार्या नव्हत्या. त्यानी हे आव्हान स्वीकारल व आपल्या डोळ्यांचा उपयोग करून खलभूमिका तितक्याच ताकदीने वठवल्या. मराठी मधील नेताजी पालकर, संत दामाजी, अमर भूपाळी, संत गोरा कुंभार ह्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या दमदार अभिनयामुळे कायम लक्षात राहिल्या. दाग, श्री 420, mr. & mrs. 55, नौ दो ग्यारह, अनाड़ी, सुजाता, हम दोनो, प्रोफ़ेसर, जिस देश में गंगा बहती हैं, जंगली, लव इन टोकियो, खानदान, आनंद, फिर वही रात, ससुराल, कोहरा, छाया, तुमसे अच्छा कौन है, खामोशी, पतिता, मेमदीदी, बॉंम्बे टू गोवा.......किती नाव घ्यावी.......ललिताबाईनी आपल्या 70 वर्षाच्या फिल्मी करियर मध्ये तब्बल 700 फिल्म्स मध्ये काम केलय. कडक, कजाग सासूच्या भूमिकेच तर त्यानी सोन केल. तसेच आनंद चित्रपटातील प्रेमळ नर्स(मेट्रन), श्री 420 मधील गंगा माइ ह्या भूमिका कोण विसरेल? दूरदर्शन वरील रामायण ह्या मालिकेतील मंथरा ह्या भूमिकेसाठी ललिताबाई शिवाय कुणाचाही विचार रामानंद सागरजी ना शक्य नव्हता. त्यांनी निभावलेली मंथरा ही अजरामर ठरली. 1959 साली ललिताबाईना अनाड़ी ह्या चित्रपटासाठी फील्मफेयर पुरस्कार प्राप्त झाला for best supporting actress....तसेच 1961 साली संगीत नाटक अकादमी तर्फे त्याना अभिनयासाठी पारितोषिक मिळाले.
अस म्हटल्या जात की ललिताबाईच्या खल व कडक साच्यातील भूमिकेमुळे नागरिकानि त्यांचा इतका धसका घेतला होता की त्याना वाटे की तो त्यांचा मूळ स्वभाव असेल, पण त्या अगदी होत्या उलट.... म्हणजे प्रेमळ व मायाळू, पण जरा जास्त शिस्तीच्या इतकच. त्या सर्वांशी मिळून मिसळून वागायच्या, पण लोक त्यांच्यापासून चार हात लांबच राहायचे, अशी एका मुलाखतीत त्यानी खंत व्यक्त केली होती. व हीच त्यांच्या अभिनयाची खरी पावती होती जी रसिकानि त्याना दिली.
24 फेब्रुवारी 1998 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी त्यांच पुण्यात निधन झाल. बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे जेव्हा पोलिसानि दरवाजा तोडला त्यावेळेस ललिताबाईचा मृत्यू हा दोन दिवसा अगोदर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरातील इतर सदस्य मुंबईला गेल्यामुळे त्याना वेळेवर उपचार मिळू शकले नाही व त्यांच्या मृत्यूची खबरही 48 तासानंतर जगाला समजली.
ललिता पवार बाईनी हिंदी व मराठी चित्रपटासाठी भरीव योगदान दिले आहे. चित्रपट सृष्टीच्या इतिहासात त्यांच नाव अव्वल स्थानी नेहमी राहील. आज त्यांच्या 99 व्या जन्मदिनी ललिता पवार ह्याना अभिवादन....!!
Rahul s. Dharmadhikari