Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

येवडसं काई बोललं

की ह्या नाराज व्हतात

आन त्यांना मस्का लावन्यात

आपले दिवस खराब व्हतात! २

ह्याच्यावर तोडगा काडलाच पायजे

म्हुन देवाकडं गेलो

म्हनलं "अर बाबा, काय तरी सुचव

न्हाईतर मी जीवंतपनीच म्येलो!" ३

देव हंसला नि म्हनला "वत्सा,"

असा निराश व्हवु नकोस

अरं हा प्राब्लेम नविन न्हाइ बाबा

तुला म्हनलो व्हतो ना की

तु लगीन करु नको?" ४

मी म्हनलो देवा, "आता चुक जा॒लीच हाये

ती सुदारायची संधि दे

आन आत्ता काय करायचं?

त्याचा चांगला अडव्हाईस दे!" ५

देव ईचारांत पडला अन

थोड्या वेळानं बोलला

"भल्या मानसा, तु आता हापिसातुन सुट्टी घे,

आन येकलाच व्हेकेशनवर जा,

बाय़डीला येकटीला शांत होवु दे

काई दिस का व्हईना

तिच्या आयुष्यांतुन तु हो वजा" ६

मी म्हनालो " देवा, अरे हे काय सोलुशन जालं?

ह्यानं काय सादनार हाय?

प्राब्लेम जेवडा मोठा, तेव्हडं सोलुशन बी मोठं

असं काहीतरी मी ऐकलेलं हाय!

हे जालं टेंपरवारी, कायतरी पर्मनंट सुचव!

न्हायतर माज लाईफ होनार बग येकदम बेचव! " ७

देव म्हनला, "अरं बाबा अनुभवाचे बोल हायेत

मी बी असाच करतो

पार्वतीला कैलासावर ठेवुन

जगाचे प्राब्लेम सोडवीत फिरतो

अरे बाबा, डिस्टंस वाडलं की व्हॅल्यु वाडते

न्हाईतर आपल्याला कोन ईचारते?" ८

मी म्हनालो"अरे द्येवा तु म्हनजे

मॅनेजमेंट कंन्सलटंटच हायेस

आमाला जे आदीच म्हाईत हाये

ते तु नव्याने सांगतो हायेस

अरं अशानं तुजा कंसल्टींगचा

धंदा कसा बरं व्हनार?

राहु दे तुजा ॲडव्हाइस, आमच्या प्राब्लेमवर

आमीच तोडगा शोधनार!" ९

देव घाबरला नि म्हनला

"म्हनजे अरे तु नक्की काय करनार?

तुमचा तो डीव्होर्स का फिवोर्स

तो तर न्हाई ना घेनार?" १०

मी म्हनलो "अरे देवा,

असं वंगाळ बोलु नये!

घरलं तर चावतं

आन सोडलं तर पळतं

असं आमचं आयुष्यभर गनित हाये" ११

देव परत म्हनला

"अरं पन तु नक्की काय करनार हाये?"

मी हांसलो आन म्हनालो, "ते तु ईचारु नको

अरे ते आमचं सीक्रेट हाये" १२

देव थोडा थांबला, ’तथास्तु" म्हनला

आन लागोलाग निघुन गेला

पन मी सीक्रेट सांगितलं न्हाई

म्हनुन नाराज जालेला वाटला १३

तेव्हढ्यांत आली आमची घरधनीन

मनांत म्हनलो की आता हाच चान्स घेईन

म्हनलो " मिसेस, आय एम सॉरी बरं का?

आन यु आर आलवेज राईट बरं का?" १४

आता आमचं विंग्रजी बोलनं ऐकुन

घरधनीन येकदम खुष जाली

तिचा राग गेला निघुन

आणि येकदम गळ्यांतच पडली! १५

आता पुडचं काय तसं सांगन्यासारख न्हाई

अन आता डीटेलमंदी इचारायची पन गरज न्हाई

"आत्ताच्या आता माडीवर चला म्हनली

आपल्या भांडनाचा शेवट "गोड" करु असं बोलली" १६

खरं म्हनजे ह्या कवितेचा शेवट

इथच व्हनार व्हता!

पन तेव्हढ्यांत समोरच्या कोप-या-मदुन

खाकरन्याचा आवाज आला व्हता! १७

बगतो तो काय, देव मस्तपैकी हंसत व्हता

मी म्हनलो अरे देवा

अरे असं नवरा बायकोत येनं म्हनजे

आमच्या प्रायव्हसीचा भंग व्हता! १८

माफी मागुन का व्हईना

आता घरधनीनीचं नि आमचं सुत जमलं

आमचे येव्हढीच कंप्लेंट हाये की

मॅनेजमेंट कंसल्टटला आमचं ’सीक्रेट’ कळलं! १९

पन देवा येक सांगु, राग नको करु

अरे खाजगी म्हनजे खाजगी

आन प्रायव्हेट म्हनजे प्रायव्हेट

तु देव असला तरी

शिक बाबा थोडे एटीकेट्स २०

मॅनेजमेंट कंसल्टंट

शशिकांत पानट

४ जुलै-२०१४