राजा-राणी
अहो राजे ...आपल्या प्रजेत फक्त जनावरच? किती दिवस आपण फक्त जनावरांवर राज्य करणार? मला मनुष्य जातीवर सुद्धा राज्य करायला आवडेल आणि मनुष्यांवर राज्य करून आपण सगळं जग पाहू शकू. लग्न झाल्यानंतर तुम्ही मला हे वचन दिलं होतं कि तुम्ही मला अख्या पृथ्वीची स्वामींनी करणार म्हणून.
राजा: हो राणी साहेब मी ते विसरलो नाहीये, ह्या वर्षी मी तुला नक्कीच विश्व् भ्रमण ला घेऊन जाईन. मी आपल्या सेनापती श्रीमंत वटवाघूळ ह्यांना निर्देश दिला आहे कि त्यांनी मनुष्य जातीवर कूच करायची तैयारी करावी.
पुढच्या महिन्यातच हि लढाई सुरु होणार, पहिले काही मनुष्यांना बंदीत टाकणार आणि त्यांच्या अंगावर अपनी गुप्त सेना लपवणार, मग काही दिवसांनी ह्या मनुष्यांना सोडणार. हि सुटलेली मनुष्य जेव्हा बाहेर पडतील तेव्हा आपली सेना गुपचूप दुसऱ्या काही माणसांवर कूच करतील, मग हि माणसं पुन्हा काही अंतरावर गेली कि आपली सेना त्या भागातल्या माणसांवर हल्ला करतील. हा चक्रव्यूह असा रचण्यात आला आहे कि कुणालाच आपण वार करताना दिसणार नाही पण मनुष्य जातीवर महान संकट येउन आणि पुष्कळ मनुष्यांना इजा होऊन काही मरण पावतील. पृथ्वीवर हाहाकार उडेल, मनुष्य जात नाहीशी होईल..तेव्हा मग आपण अख्या जगावर राज्य करू आणि तू जग-स्वामींनी होशील.
अहो राजे जर का मनुष्य जातीच राहिली नाही तर आपण राज्य कुणावर करू? आपली कामं कोण करणार ?
अरे हो खरंच कि ...राजा विचार करू लागला, आपण जर सगळ्या मनुष्य जातीला सम्पवलं तर आपली गुलामी कोण करणार?
मग श्रीमंत वटवाघूळ ह्यांना आदेश दिला कि आताच्या आत्ता सम्पूर्ण मंत्री मंडळाला बोलवा. सर्व मंत्री, सल्लागार एकत्र आले , बैठक झाली आणि निर्णय घेतला कि आपण लहान, तरुण आणि निरोगी अश्या मनुष्यांना फक्त थोडा त्रास देऊयात आणि वृद्ध, आजारी माणसांना मारूनच टाकुयात कारण हि माणसं आपल्याला काहीच उपयोगाची नाहीत.
सगळ्यांना हा प्रस्ताव खूपच आवडला.
आता हे काम सुरु करण्याची वेळ आली होती, ठरल्या प्रमाणे सेनापती वटवाघूळ हे प्रथम मानव जातीवर आपले गुप्तहेर पाठवणार होते, ह्या करता त्यांनी विचित्र देशाचे विक्षिप्त नागरिक निवडले आणि आपला पहिला वार केला.
अर्थातच त्यांना यश मिळालं आणि राणी ची स्वप्नं आता पूर्ण होतील असं तिला वाटू लागलं, आणि ती मनातल्या मनात पृथ्वी-स्वामींनी च मुकुट आपल्या डोक्यावर बघायला लागली.
पुढचा प्रवास खूपच कठीण होता, कारण मनुष्य जाती खूपच हुशार आहे, हि लोकं लवकरात लवकरच उलटवार करतील आणि आपण कमी पडू शकतो म्हणून हे काम वायू च्या वेगाने करणे गरजेचं होतं. म्हुणुन जे मनुष्य विमानाने प्रवास करतात त्यांचा बरोबर काही गुप्तसेना पाठविली तर हे
काम शीघ्र संपन्न होऊ शकतं, तसंच करण्यात आलं आणि योजना प्रमाणे अगदी महिना भरातच सगळीकडे आपली सेना पाठविण्यात आली.
सगळीकडे महामारी- मृत्यू दिसायला लागली. मनुष्य जाती घरातच लपून बसायला लागली आणि आता मात्र गुप्तसेना पाठविण्यात अडथळा येऊ लागला.
राणी ने राजा ला सांगलीतलं कि तिला हे दृश्य बघायचं आहे ...तिला पृथ्वी भ्रमण करायचंय. ऐकून राजा म्हणाला : अजून आपलं काम फत्ते नाही झालंय आणि आत्ताच विश्व् -भ्रमण ला जाणं धोक्याचं आहे, पण राणी चा स्त्री हट्ट आडवा आला आणि राजा ला तिच्या पुढ्यात नतमस्तक व्हावं लागलं .
असो, ते निघाले...
एका देशावरून उडताना गोळ्यांचा आवाज ऐकून राणी म्हणाली जरा खाली जाऊन बघूया ...आणि पाहिलं तर त्या देशाचा राजा, ज्या मनुष्यांवर गुप्तसेना समभंवते, त्यांना तो ठार मारतोय, राणी थोडी घाबरली कि ह्या प्रमाणे आपले खूप सैनिक मारले जातील. पुढे जायला लागले आणि एका दुसऱ्या देशावरून उडताना
त्यांनी पाहिलं कि खूप संख्यामध्ये मनुष्य मेलेले पडले होते पण त्यांच्या आजूबाजू कोणीच नाही .. राणी परत राजाला म्हणाली जरा थोडं खाली जाऊन बघूया ....थोडं आणि खाली आल्यावर तिने पाहिलं कि काही मनुष्य आपल्याला पूर्ण पणे झाकून होती, मात्र ती रुग्णांची सेवा करत होती, हे बघून तिला थोड आश्चर्य वाटलं कि ईतर वेळी मनुष्य जाती आपल्याच लोकांशी युद्ध करत असते पण अशी पण काही लोकं आहेत जी ह्या रुग्णांना वाचवायचा प्रयत्न करतायेत ....तिचे डोळे भरून आले, पण तिला लगेच तिचा मुकुट दिसला आणि ती हे दुःख विसरली.
आता दुसया एका देशावरून जाताना राजा-राणी ला आढळलं कि हा खूपच समृद्ध देश वाटतोय, जास्त गर्दी नाही, खूप स्वच्छता, कुठेही कचरा नाही पण आणखी खाली जाऊन बघितलं तर भरपूर रुग्ण! तिला आनंद होतो आणि राजा तिला हसतच सांगतो कि ह्या देशाचा राजाला अति आत्मविश्वास नडला, नाहीतर खरं आम्हाला जरा भीतीच वाटत होती कि आपली सेना ह्यांच काही नुकसान करू शकेल कि नाही ...
आता दुसऱ्या एका देशावरून जाताना खूप धूर दिसला आणि खाली काही दिसेना ...तिने राजाला विचारलं कि हा कोणता देश आहे? आणि इतका धूर कां आहे? मला खाली जाऊन बघायचं आहे. राजा म्हणाला :अग, ह्या देशाचे लोकं संकटावर उपाय म्हणून होम-हवन आणि यज्ञ करातात आणि हा
धूर त्या यज्ञातून निघत आहे, आपण खाली जाणं धोक्याचं आहे. पण राणीने हट्टच धरला, आणि ती लोकं आणखी खाली आली ....
पण धूर इतका असह्य झाला कि दोघांनी हातात हात धरून एक उंच झेप घेतली, खूप वेळ आपण अस्तित्वातच नाही असं जाणवलं ....आणि बघतात तर एका वेगळ्याच दुनियेत येऊन पोहोचले होते ...तिकडून पृथ्वी मात्र एक छोटीशी वाटी सारखी दिसत होती. हा प्रचंड मोठा ग्रह वाटत होता आणि इकडची प्रजाहि रंग -बेरंगी होती, अंगावर अगदी तिच्या सारखे असंख्य हात पाय होते ... राणीचा विचार आता बदलला होता,
ती राजाला म्हणाली: इवल्याशा ग्रहाचे मुकुट मला नकोय, मला तर ह्या ग्रहाची स्वामींनी व्हायचंय.....
ऐश्वर्या कोकाटे
लॉस एन्जेलिस