मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

सत्य घटना

ती एकुलती एक ताई. घरातील लाडकी...
बापाच काळीज जणू....
तळहाताच्या फोडाप्रमाणे बापाने जपली...
घरची परिस्थिती गरीबीची होती तरी ओव्हर टाईम
करून बापाने शिकवले..
मुलगी शिकतेय आणि तिचे भाऊ माञ बोंबलत फिरण्यात पटाईत..

बापाच्या रोज शिव्या खाणार ... काम नाही ..धंदा
नाही तरी हे भाउ उपाशी कधी झोपले नाहीत कारण
आई बाबा रागावले तरी ताई माञ गुपचूप जेवन आणून द्यायची..
अशी ही ताई . आभ्यासात हूशार... स्वयंपाकात
हुशार...आईच्या हृदयाच स्पंदन. बापासाठी जीव की
प्राण..ती वयात आली. स्थळ बघायला सुरूवात झाली.

एका ठिकाणी जमले. आणि सुरू झाली ताईच्या
लग्नाची गडबड...
बापाने कर्ज काढले... काही झाले तरी लग्न थाटात
झाले पाहिजे. भावांचा उत्साह सांगायला नको.
त्यांच्या ताईच लग्न होतना.... आईचा वरमाईचा
तोरा...काय सांगाव... लग्न थाटात पार पडले. ताई
नांदायला गेली...

बापाच सुख पोरीच्या सुखात. भावांचा आनंद ताईच्या
सुखात. आईच समाधान मुलीच्या सुखात. सगळे तीच्या सुखासाठी झटत होते.
ताईच्या लग्नाच कर्ज फेडायच. दोन्हीही मुले कामाला
जायला लागली. बाप काम करतच होता.
आठवण आली की सगळे ताईला फोन करायचे. आई बाबा दादा मी सुखात आहे अस तिच्या कडून ऐकल की काळीज सुपाएवढ व्हायच...

आणि एक दिवस....अचानक फोन आला. ताईने आत्महत्या केली. ताईने....
आत्महत्या ......केली ..... या तीन शब्दांचा तप्त
शिलारस कानात गेला ....

कोणाचा विश्वास बसेना...
बाप कोसळला.... आई स्तब्ध झाली... भावांना काही
कळेना.... लोक जमले... गाडी केली.. निघाले ....

ज्या पोरीच्या लग्नात अक्षदा टाकायला गेले होते तेच
आता शेवटच्या दर्शनाला निघाले .... पोहचले...गर्दी
झाली... समोर आपल्या लाडकीच प्रेत पाहिल...आईची कींकाळी फुटली... टाहो फुटला..काळीज चिरणारे ते दृश्य ...

ताई उठ ना. बाबा रागवले तर आता त्यांना शांत कोण
करणार ? ताई तु आम्हाला कधी उपाशी झोपू दिल
नाही...आणि आता तु कायमची झोपलीस...
बाळा उठ. अग आम्ही आलोय . बघ. तुझे बाबा....
तिरडी बांधली गेली. आणि ती लाडकी शेवटच्या
प्रवासाला निघाली ..
सर्वाना सोडून ..... आणि गेली ...कायमची सोडून गेली
....
ताई घरी नव्हती पण सासरला तर सुखात होती. या
भावनेने जगणारे ते कुटूंब आता माञ पुर्ण कोलमडून पडले..
आता आपली ताई आपल्याला कधीच दिसणार नाही
........
काही दिवसांनी तीने आत्महत्या का केली याच कारण
समजले.
तिच्या नवर्याला गाडी घ्यायची होती. तो म्हणत
होता एक लाख रूपये बापाकडून आण. पण त्या पोरीला बापाची अवस्था माहित होती . कर्ज काढून माझ लग्न केले .आता ते कर्ज फेडतायेत.
मी कसे पैसे मागू..

तीचा रोज छळ व्हायचा पण बाबांचा फोन आला कि
सांगायची मी सुखात आहे. आणि एक दिवस ........
आपल्या मुळे आपल्या बाबांना ञास नको. भावांना
ञास नको म्हणून त्या बहिणीने स्वतःला संपवले.
आत्महत्या केली .

का केली तीने आत्महत्या ?
तिला दुसरा मार्ग नव्हता का?
का संपवले आयुष्य ?
का देऊन गेली कायमचे दुःख ?
हाच प्रसंग नाही
असे हजारो प्रसंग आपल्या भोवती घडतात..
कित्येक मुल मुली महिला पुरूष अशा आत्महत्या करतात केवळ एका कारणांमुळे
एका दुःखाने हे अस करतात.
आपण आपल्याला आलेल्या
संकटाशी का लढत नाही
का लगेच हार मानतो.
आपले दुःख संकट एवढे मोठे आहे का की लगेच जीव द्यावा .

माझ्या मिञांनो
यासाठी शिवरायांच्या जिवनाविषयी अभ्यास करा
शिवचरित्र वाचा. मग कळेल
कसे लढायचे संकटाशी....
स्वराज्यावर चारही बाजूंनी संकट आले. आता स्वराज्य संपणार ..

लाखोंची फौज घेऊन शायिस्तेखान आबू तालिब लाल
महालाला वेढा घालून बसलाय..३ वर्ष
पन्हाळ्याला ४० हजार हशमांचा वेढा सिद्धी जौहरने
घातलाय ..चार महिन्यापासून
बहुतेक गडांना शञूंचे पहारे लागले .
आता काय कराव शिवाजी राजान..
आता सार संपल स्वराज्य संपल
आता
आता
काय करावे
पण तरीही यातुन शिवाजी सही सलामत बाहेर पडले....

तो अफजलखान आला
तो मिर्झाराजा जयसिंग आला
तो फत्तेखान आला
आता काय कराव शिवाजीने...
तरीही शिवाजी जिंकले

शञूच्या घरात.
शञूच्या समोर
हजारोच्या पहार्यात
मृत्यूची वाट बघण्यावाचून पर्याय नाही
काय कराव शिवाजीने...
तरीही शिवाजी आग्र्यातून निसटले.

वडीलांना ओलीस ठेवलय.
आईच कुंकू पुसल जाणार
आता सांग शिवाजी
वडील पाहिजे की स्वराज्य
काय कराव शिवाजीने...
तरीही यातून शिवाजी सुटले..

एवढी संकटे शिवरायांवर आली.
पण कधी मनाला विचारही शिवला नाही की
आत्महत्या करावी.

आम्ही उठता बसता शिवाजी - शिवाजी करतो. पण
त्यांचे गुण घेतो का?
संकट आले म्हणून शिवाजी कपळाला हात लावून बसले नाहीत. रडत बसले नाहीत. दुसऱ्याला दोष देत बसले नाही. आता मी काय करू ? आता माझ कसं होणार ? असे म्हणत कर्माला झोडत बसले नाहीत.
प्रत्येक संकटातून राजे शिकले. अनुभव घेतला . मार्ग
काढला. वाटा शोधल्या. नव्या वाटा निर्माण
केल्या.

यातुनच जन्म झाला छञपती

हे वृतांत श्री मयूर संडोकर ह्यांनी पाठविले आहे