श्री
सोचना की बच्चे के अपने लिये पैदा कर रहे हो या विदेश की सेवा के लिये:
बेटा एडिलेडमें, बेटी है न्युयॉर्क
ब्राईट बच्चो के लिये, हुआ बुढापा डार्क १
बेटा डॉलर मे बंधा, सात समुंदर पार
चिता जलाने बाप की, गए पडौसी चार २
ऑन लाईन पर हो गये, सारे लाड दुलार
दुनिया छोटी हो गई, रिश्ते हैं बीमार ३
बुढा-बुढी ऑंख मे, भरते खारा नीर
हरिद्वार के घाट की, सिडनी मैं तकदीर ४
तेरे डॉलर से भला, मेरा इक कलदार
रूखी-सुखी में सुखी, अपना घर संसार ५
कवि-अनामिक
वरील हिंदी कविता पुष्कळ कांही सांगुन जाते. समाजांत अशा अनेक घटना झालेल्या आहेत त्यावर हिंदी कविने आपले मन मोकळे केलेले आहे. ही कविता कुठेतरी मनाला स्पर्श करुन गेली. त्याचे मी स्वैर मराठीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.-शशी पानट
कधी कधी वाटतं आपली मुलं ही आपली नाही तर विदेशाचीच सेवा करायलाच जन्माला आली आहेत कां?
देश की विदेश?
मुलगा आहे लंडनमधे
मुलगी राहाते न्युयॉर्कला
प्रकाशांत आणायला मुलांना
म्हातारपणांत मात्र अंधार झाला १
मुलगा डॉलर्समधे बुडाला
साता समुद्रा पलीकडे
बापाच्या चितेवर गंगाजलाचे
शेजा-यांनीच ऊडवले चार शिंतोडे २
ऑन लाईनवरच चालते
मुलांच्या मनाची ऊभारी
जग आकसले गेले आहे
नाते पडले मात्र आजारी! ३
म्हातारा म्हातारी भरतात
डोळ्यांत खारे पाणी
हरिद्वारांतले श्राद्ध खेळते
अमेरिकेत छप्पापाणी ४
तुझ्या डॉलरपेक्षां
माझा मुलुख परवडला
अर्धपोटी राहिलो तरी
घराचा संसारच भला! ५
देश की विदेश?
वरील हिंदी कवितेचे स्वैर भाषांतर
शशिकांत पानट
shashi@panat.org