Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

त्यांनी bulb पासून computer पर्यंत अनेक शोध लावले. पण ह्या शोधाचा अंतिम हेतू होता पैसे कमावणे...त्यामुळे त्यांनी आपल्या विज्ञानाच जोरदार "मार्केटिंग" केलं आणि विज्ञान हे अज्ञान दूर करण्यापेक्षा पैसे कमवण्याचं साधन बनलं.

विज्ञान फक्त पश्चिमी देशात जन्माला आलं हे एक अज्ञान आहे. भारतातही विज्ञान जन्माला आलं होतं. फक्त फरक असा की पैसे कमावणे हा त्याचा हेतू नव्हता. असाच एक विज्ञान समर्थक राजा होता- शिवाजी !! ज्यांनी विज्ञानाचा उपयोग केला स्वराज्यासाठी. सामान्यांच्या हितासाठी. अनेकांना प्रश्न पडेल की शिवाजी योद्धा होते, त्यांचा विज्ञानाशी काय संबंध? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कारण शिवबाचं विज्ञान नेहमी झाकून ठेवण्यात आलं.

विज्ञानाला सत्ताधारी साथ देतो तेव्हा ते जास्त उजळून येतं. सागरी आरमार उभारून महाराजांनी त्याकाळी marine science ची रुजवात केली होती. शिवबाने हातावरच्या रेषा पहिल्या नाहीत… मनगट पाहिलं. पिचलेल्या, अर्धपोटी, दरिद्री, धस्तावलेल्या मनगटात जोर भरला आणि हाती जे काही थोडाफार तंत्र होतं त्या आधारे स्वराज्य निर्माण केलं. गनिमी कावा हा युद्धाचा नवा प्रकार शोधला. आता जग war science पर्यंत आलं. शिवबाने ते आधीच सुरु केल होतं. अमेरिका जेव्हा युद्ध करते तेव्हा आपले सैनिक मोठ्या प्रमाणावर बळी पडणार नाहीत ह्याची काळजी घेते. युद्ध करण्याची अशी युक्ती शोधते की शत्रूची दाणादाण उडाली पाहिजे. महाराजांनी असं war science प्रत्यक्ष राबवलं होतं. इतिहासात एक उदाहरण असं सापडतं की शत्रूची प्रचंड फौज महाराजांच्या राज्यात घुसण्यासाठी आली होती. हेराने ही बातमी महाराजांना दिली. महाराजांनी युद्धाचं निराळं science योजलं. शत्रूच्या फौजेला थोडं खाली उतरू दिलं. शत्रू जंगलात आला आणि अचानक चारी बाजूने दगड-गोट्यांचा हल्ला सुरु झाला. शत्रूच्या हातात बलशाली तलवारी होत्या...तोफा होत्या. हत्ती आणि घोडे होते. पण टाळक्यात बसणारी दगडे सहन होत नव्हती. तलवार चालवायची तरी कोणावर? समोर कोणी दिसत नव्हतं. मग लपलेले मावळे अचानक समोर आले आणि कापकापिला सुरुवात झाली. मुठभर मावळ्यांनी शत्रूची दाणादाण उडवली. ते आल्या पावली परत पळाले.
शिवाजी राजाच्या आरमाराचं वर्णन करणारं ६ ऑगस्ट १६५९ तारखेचं एक पत्र आहे. त्याचा मजकूर असा- " शहाजींचे पुत्र शिवाजी ह्यांनी वसई आणि चौल येथील भाग ताब्यात घेतला आहे. भिवंडी, कल्याण आणि पनवेल येथील बंदरांवर त्यांनी आरमार उभं केलं आहे. दक्षता म्हणून आम्ही Portuguese कप्तानाला आदेश दिले आहेत की ही जहाजे तिथून निघू देवू नका, सावध राहा" शत्रू महाराजांच्या आरमाराला घाबरला होता.

कान्होजी अंग्रे ह्यांनी सागरी साम्राज्य निर्माण करण्यात मोठा हातभार लावला आणि त्यांना "सागरातील शिवाजी" नावाने ओळखल जावू लागलं. दुसर्या महायुद्धात अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर हल्ला करण्यासाठी जपानने सागरी मार्गाचा उपयोग केला. तिथून सागरी सत्तेचं महत्व अनेक देशांना उमगलं. सारे देश शिवाजी महाराजांचं कळत-नकळत अनुकरण करू लागले. जागतिक सागरी युद्ध शास्त्राच्या इतिहासाच्या पहिल्या पानाचे मानकरी आहेत आमचे महाराज !

हिरोजी इंदुलकर ह्यांनी महाराजांसाठी केलेलं बाधकाम असंख्य उन्हाळे-पावसाळे सहन करून आजही ताठ मानेने उभं आहे. आज architecture शिकवलं जातं. civil engineering शिकवतात. तरी इमारती फार वर्षे टिकत नाहीत. हिरोजींच्या architecture ची आज जास्त गरज आहे.
लोहगड किल्ल्यावर विंचूकाटा हा बुरुज आहे. तिथे एक माणूस हाती समान न घेता, कसाबसा पोहोचू शकतो. मग त्या बुरुजावरील दगडी बांधकाम कसं केलं? हा बुरुज बांधकाम शास्त्राला शिकवण्यासाठीच आज खंबीरपणे उभा आहे.

भारताने आणि इतर देशांनी सैन्यदल उभे करताना सैनिकांना फक्त युद्धकला नव्हे तर संकटकालीन स्थितीत देशाच्या कोणत्याही भागात तत्काळ मदत पुरवता येण्यासाठी रस्ते, पूल, घरे इत्यादी बांधकाम करण्याचं तंत्र शिकवले. शिवाजी महाराजांनी तानाजीला रस्त्याच्या बांधकामासाठी पाठवलं होतं असा उल्लेख सापडतो. "गड आला पण सिंह गेला" असं दुख महाराजांना होणे स्वाभाविक आहे. कारण हा सिंह प्रसंगी लोकांच्या हितासाठी हाती बांधकामाची अवजारेही धरत होता. म्हणजे सैनिकाची शक्ती फक्त लढण्यासाठी नव्हे तर देशाच्या अंतर्गत हितासाठी उपयोगी आणता येते ही संकल्पना महाराजांनी फार पूर्वी मांडली होती. तसेच आपली आणि शत्रूची राजकीय स्थिती पाहून महाराजांनी टाकलेले डावपेच हे खरं "political science " होय.
आम्ही शून्याचा शोध लावला. विमानाचा शोध लावण्याचा पहिला प्रयत्न इथे झाला. एका इंग्रज अधिकार्याने लिहील की एका खेडेगावात एक माणूस नाकाचा कापलेला शेंडा शिवताना मी पाहिला तेव्हा थक्क झालो. सुश्रुताने ६ व्या शतकात जाबमुखी वापरून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली होती. ५ व्या शतकात पाणिनीने केलेलं कार्य इंग्रजांनी वाखाणल.

विज्ञानाचा जन्म भारतातही झाला होता. फक्त त्याचं मार्केटिंग भारतीयांनी केलं नाही. कारण पैसा कमावणे हा हेतू नव्हता. पश्चिमी देशांनी मार्केटिंग करून विज्ञानाचा उदय तिथे झाला असा समज निर्माण केला. शिवबाने विज्ञानाला जसं राजसत्तेच पाठबळ दिलं तसं पुढे मिळालं नाही. परिणामी आमचे प्रतिभावान तरुण-तरुणी, वैज्ञानिक अमेरिकेत निघून गेले.
इकडे महाराजांचे गड-किल्ले भग्न अवस्थेत जात आहेत. पर्यटक फिरकत नाहीत. पिण्याचं पाणी आणि स्वच्छ toilet नसेल तर पर्यटक कसे येतील? त्यांना महाराजांचं science कळणार कसं? मंत्रालयात, मंत्र्यांच्या बंगल्यात उत्तम पाणी, वीज पुरवठा आणि toilet निर्मितीसाठी सरकारी तिजोरीमध्ये पैसे आहेत. पण गडकिल्ल्यांवर एक नळ बसवायला पैसे नाहीत. जे काही थोडे फार पर्यटक गडांवर येतात त्यांना नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर बसावे लागते. जिथे महाराजांनी विज्ञानाला राजाश्रय दिला तिथे असा अंधार आहे.

"तमसो मां ज्योतीर्गमयम"... प्रकाशामुळे अंधार दूर होतो...पण आम्ही, आमच्या सत्ताधीशांनी असा " प्रकाश पाडला" की साक्षात शिवरायांचं विज्ञान अंधारात सापडलं.
-निरेन आपटे.