Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

फळांचा रस, नाचणी-ज्वारी-बाजरीची भाकरी, कांदा, काकडी असे भारतीय शेतकर्यांनी पिकवलेले पदार्थ सेवन केले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रत्येक भारतीय हातभार लावू शकतो. असे पदार्थ खाणे हा दुहेरी लाभाचा उपाय आहे. कारण या पदार्थांचे उत्पादक भारतीय शेतकरी आहेत. आपण हे पदार्थ विकत घेतले तर त्याचे अंतिम लाभार्थी सामान्य शेतकरी असतात. शिवाय हे पदार्थ पचवण्यासाठी सोपे असतात. ह्या पदार्थांमध्ये पुरेश्या प्रमाणात फायबर असतं. आपलं आतडं पोटात आलेला पदार्थ शोषण्याचा काम करतं. mixer सारखं दळण्याचा काम करत नाही. शेतात पिकलेले पदार्थ पाण्यासह पोटात येतात तेव्हा ते शोषून घेणं आतड्यांना सोपं पडतं. लाठ्ठपणा, डायबेटीस, हृदय विकार होण्याची भीती नसते. म्हणजे अस्सल भारतीय पदार्थ सेवन केल्यामुळे दुहेरी लाभ होतो. शेतकऱ्यांच्या मालाला मागणी येते आणि ते पदार्थ खाणार्यांना आरोग्य जपता येतं. पण पिझ्झा, बर्गर, नुडल्स आणि विदेशी पदार्थ व कोल्ड-ड्रिंक्स दुहेरी नुकसान करतात. पहिल नुकसान म्हणजे त्यांचा लाभ विदेशी कंपन्यांना होतो. जरी त्यांनी भारतीय शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेतला तरी त्यापोटी ते शेतकऱ्याला खूप कमी पैसे देतात. शेतकऱ्यांच आर्थिक शोषण करून त्यांना जास्त नफा कमावता येतो. शिवाय विदेशी पदार्थ पचवण्यासाठी कठीण असतात. त्यांच पोषण मुल्य जवळ जवळ शुन्य असतं. आणि ते अनेक आजारांना आमंत्रण देतात. म्हणजे भारतीय शेतकऱ्याच नुकसान आणि आपलही नुकसान. फायदा मात्र विदेशी कंपनीचा! त्या फायद्यातील खूप मोठा वाटा भारतात गुंतवला जात नाही. म्हणजे भारतीय ग्राहकांच आणि शेतकऱ्यांच नुकसान करणारी विदेशी कंपनी देशाच नुकसान करते.. आज नावश्रीमान्तांकडे आलेला पैसा विदेशी खाद्य पदार्थांवर खर्च होतो. म्हणून भारतात खूप संपत्ती असूनही शेतकरी आत्महत्या करतात. संपत्तीचा मोठा वाटा विदेशी कंपन्यांकडे जातो. भारतीय शेतकर्यांना लाभ होत नाही. पिकाच्या लागवडी इतकी किंमत मिळत नाही. त्याचवेळेस पिझ्झा, बर्गर, नुडल्स आणि कोल्ड-ड्रिंक्स विकणाऱ्या विदेशी कंपन्या प्रचंड लाभ कमावतात. एका कोल्ड-ड्रिंक्स विकणाऱ्या कंपनीने काही वर्षांपूर्वी भारतात मिळणार नारळ पाणी आणि लिंबू पाणी हे आपल्यासमोरील संकट आहे. जर सामान्य भारतीय नारळ पाणी आणि लिंबाचा रस पीत राहिले तर आपले कोल्ड-ड्रिंक्स कोणीही पिणार नाही असा संदेश आपल्या कर्मचार्यांना दिला. मग कोल्ड-ड्रिंक्स निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी एकीकडे देशी पेयांची बदनामी सुरु केली आणि कोल्ड-ड्रिंक्स चा जोरदार प्रचार केला. परिणामी भारतात, आपल्या कोकणात नारळाची असंख्य झाडे असूनही स्थानिक शेतकर्यांना फार लाभ मिळत नाही. वास्तविक नारळाचं पाणी कोणत्याही कोल्ड-ड्रिंक्स पेक्षा जास्त आरोग्यदायक आहे. पण नारळाचं पाणी फक्त आजारपणात पितात. गम्मत अशी कि चांगली आर्थिक स्तिथी असलेले नवं-श्रीमंत कोल्ड-ड्रिंक्स पिवून आजारी पडतात आणि आजारपणात नारळच पाणी पितात! आणि कोल्ड-ड्रिंक्स बनवणार्या कंपन्यांसाठी भरपूर पाणी आहे पण शेतीसाठी पाणी नाही!! कोल्ड-ड्रिंक्स पचवणं आतड्यांना कठीण असतं. त्यात भरलेली रसायन शोषण्याची क्षमता आतड्यांमध्ये नाही. उलट अशी रसायने आतड्यांचा नुकसान करतात. म्हणजे कोल्ड-ड्रिंक्स पिणारी व्यक्ती स्वताला आजारी करून घेते आणि भारतीय शेतकार्यांनी निर्माण केलेला शेतमाल न घेवून त्याला तोट्यात ढकलते. त्याचा तोटा इतका होतो कि शेत पिकवण्यासाठी, झाड जगवण्यासाठी केलेला खर्च विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त होतो. मग शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग शिल्लक राहत नाही. जर सर्व भारतीयांनी एक दिवस कोल्ड-ड्रिंक्स न पिता फक्त भारतीय पेय प्यायली तर एका राज्यामधील शेतकर्यांना-बागायतदारना एक महिन्याची कमाई करता येईल...फक्त एका दिवसात! मग त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ का येईल? शेतमाल कुठून खरेदी करावा? मॉल मधून भाजीपाला आणि धन्य खरेदी केलं तर त्यातही भारतीयांचं नुकसान होतं. जर ग्राहकांनी नाक्यावर बसणाऱ्या भाजीवालीकडून भाजी घेतली तर त्याचे पैसे थेट तिला मिळतात. पण मॉल मधून भाजी विकली जाते तेव्हा त्याचा लाभार्थी असतो एक भांडवलदार. एक कंपनी. हि कंपनी शेतकर्याकडून खूप कमी किमतीत शेतमाल घेते आणि जास्त किमतीत ग्राहकाला विकते. शिवाय रस्त्यावर मिळणारी भाजी शिळी असण्याची शक्यता नसते. कारण रस्त्यावरच्या, भाजी मंडयीमधील विक्रेत्याकडे शेतमाल जास्त दिवस टिकवून ठेवणारी यंत्रणा नसते. मॉल मध्ये तशी सोय असते. त्यामुळे मॉल मधील भाजी ताजी नसू शकते. म्हणजे मॉलचा ग्राहक स्वतच शारीरिक आरोग्य बिघडवून घेतो आणि शेतकऱ्याच आर्थिक आरोग्य बिघडवतो. भांडवलदार कंपन्या शेतमाल विकून प्रचंड लाभ कमावतात आणि शेतमाल पिकवणारे शेतकरी आत्महत्या करतात. हा "हिशोब" विचारात घेण्यासारखा आहे. ह्यापुढे खरेदी कराल तेव्हा ह्या हिशोबाचा विचार करा, तुम्ही केलेली खरेदी एका शेतकऱ्याचा, अन्नदात्याचा जीव वाचवू शकते. त्यासाठी खरेदी-साक्षर बना! - निरेन आपटे.